कॅलरी

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
24 Nov 2015 - 8:43 am

पेर्ना गॅलरी

एक हात ढेरीवर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे, गॅलरीत!

तुझ्या झुलत्या एअरवॅाकर बरोबर
पाय दमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या ट्रेडमिलचा पट्टा पायाला!

नाही.....बारीक नव्हतोच कधी
गुटगुटीत होतो खूप म्हणून
कॅलरीज नाही उतरत
आजही!

मला नाही जमत पळायला,
त्या कॅलरीज जाळायला!
इतकं सारं पोहूनही
स्लिमबिम होणं नाही जमत मला !

पण....तू तिथे भजी बनवलीस कि
इथे माझा डाएटमोड होतो
एवढेच बारीक जाणवते!
अन, अवेळी उठून मी
एक हात ढेरीवर ठेऊन
उभा राहतो गॅलरीत
तू हाक मारेपर्यंत.....!

vidambanविडंबन

प्रतिक्रिया

रातराणी's picture

24 Nov 2015 - 8:54 am | रातराणी

परफेक्ट!

पगला गजोधर's picture

24 Nov 2015 - 9:09 am | पगला गजोधर

दमामी प्रा. लि.कडून आता लवकर एखादी कविता येणार नाही, नुकतेच संपादक मंडळात मोठे बदल झालेत नं…

पैसा's picture

24 Nov 2015 - 9:14 am | पैसा

=))

मितान's picture

24 Nov 2015 - 9:17 am | मितान

गमतीशीर :)

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 2:02 pm | पालीचा खंडोबा १

खुपच छान

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 2:04 pm | पालीचा खंडोबा १

मला माझि कवित इथे प्रकशिइएकरायचि आहे कशि करु

दमामि's picture

24 Nov 2015 - 3:09 pm | दमामि

;)जमलं म्हणायचे.

पद्मावति's picture

24 Nov 2015 - 2:11 pm | पद्मावति

मस्तं!

अजया's picture

24 Nov 2015 - 3:32 pm | अजया

मस्त!

दमामि's picture

25 Nov 2015 - 7:57 am | दमामि

धन्यवाद!