जीवन नुसतं जगु नका!! त्याचा "उत्सव्"साजरा करा!

येडा खवीस's picture
येडा खवीस in जनातलं, मनातलं
7 Sep 2008 - 11:18 am

Life Should not only be lived, It should be celebrated!!!
मध्यंतरी नेटवर सर्फ़ करताना अचानकपणे "ओशो"चं हे एक छान सुभाषित दिसलं! किती सुंदर आणि स्पष्टपणे या गुंतागुंतीच्या जीवनाचे "आधारभुत" तत्व त्यांनी नीटसपणे मांडलय ना? आजवरच्या सगळ्या so called established संतांनी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा "गंभीर" दृष्टीकोन दिला पण, ओशो जीवनाला एक "उत्सव" म्हणुन बघतात. या एकाच वाक्याला अनेक कंगोरे आहेत, हिर्यासारखे अनेक पैलु आहेत आणि कॅलिडोस्कोप सारख्या अनेक सापेक्ष प्रतिमा आहेत. एखाद्या दारुड्याला हे वाक्य म्हणजे "आज्ञा"वाटेल, एखाद्या हरलेल्या कष्टी जीवाला हे वाक्य म्हणजे "नवी उमेद" वाटेल तर एखाद्या मुमुक्षु जीवाला हे वाक्य कदाचित पटणारही नाही!!!

होतं काय की आपण एका विशिष्ट संस्कारांच्या, श्रध्देच्या जोखडात स्वत:ला अडकवुन घेतो आणि हा जीवनप्रवास खुप "सिरिअसली" घेतो. "मला मोक्ष हवाय!! हा जन्ममरणाच्या फेर्यातुन सुटका हवीये" वगैरे वगैरे. "मोक्ष" हे अंतिम सत्य आहेच!! पण तोपर्यंत काय? परमेश्वराने दिलेला हा जन्म , हे जीवन जोपर्यंत "सुंदर" आहे असं आपल्याला वाटत नाही तोपर्यंत हा प्रवास सुखकर कसा होणार?

माझा दृष्टीकोन या वाक्याविषयी असा आहे...

प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना जीवनात कमीअधिक समस्या , problems आहेतच पण समस्यांचा विचार करत करत तणाव वाढविण्यापेक्षा एका वेगळ्या प्रकारे जर आपण जीवनाकडे बघयचं ठरविले तर तो "आनंदक्षण" ठरेल. आत्म्याचा प्रवास हा मुलतत्वाकडुन पुन्हा मुलतत्वाकडे वर्तूळाकार आहे. या प्रवासात अनेक उलाढाली होतात, गोंधळ उडतात पण प्रवास सुरु रहातो. या प्रवासालाच जर आपण "उत्सव" मानलं तर किती छान वाटेल!
निदान या अपरिहार्य प्रवासाचा रुक्षपणा तरी कमी होईल. ओशोंनी प्रत्येकाला जीवनाकडे बघण्याचा एक "क्रांतीकारी" मार्ग दिला "तू जसा आहेस तसाच जीवनाला सामोरे जा" सर्व संतांनी मार्ग आखले आणि त्यावरुन आपल्या "भक्तां"ना चालण्याची आज्ञ केली पण ओशोंनी कोणताच मार्ग आखला नाही जणु ते म्हणत," तु जिथे आहेस तिथुन हलुच नकोस!! पण एकदा प्रवासनिश्चिती झाली की नाकासमोर असेल ती वाट तुडवत जा. कारण प्रत्येक वाट ही "तिथे"च पोहोचते....किती सुंदर!!!

तुम्हाला काय वाटतय

सुभाषितेविचार