शाळा आणि काॅलेजमधे असताना प्रत्येकाचा कुठलातरी एक आवडता विषय असतोच. मला दहावी पर्यंत इंग्रजी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल हे विषय आवडायचे तर ज्युनिअर काॅलेजमधे ईंग्रजीबरोबर अर्थशास्त्र, इतिहास हे विषयही आवडु लागले. गणिताची फारशी आवड केव्हाच नव्हती. संस्कृत हो स्कोअरींग विषय होता. दहावीपर्यंत विज्ञानातही बर्यापैकी गुण मिळायचे.
तुमचे आवडते विषय कोणते होते / आहेत???
प्रतिक्रिया
19 Nov 2015 - 8:20 pm | टवाळ कार्टा
गणित...अज्याबात पाठांतर नसायचे...१०-१५ मिनिटांत परिक्षेचा अभ्यास व्हायचा :)
19 Nov 2015 - 8:24 pm | नया है वह
आणि लिखान सुद्धा कमी!
19 Nov 2015 - 10:41 pm | पगला गजोधर
आम्ही तर तोंडी अभ्यास करायचो बिजगणिताचां (सूत्रं मात्र पाठ पाहिजे बरका )
पुढे गणिता बरोबरच इंग्लिश व इतिहास आवडीचे झाले.
19 Nov 2015 - 8:30 pm | मांत्रिक
सगळ्यात आवडता म्हणजे कार्यानुभव. एकतर अगदीच टैम्पास काहीतरी असायचं आणि त्या शिक्षिका पण इतक्या गरीब होत्या की कुणाला म्हणून कधीच रागवायच्या नाहीत.
19 Nov 2015 - 8:30 pm | आदूबाळ
मराठी आवडायचं नाही हे ओघाने आलंच ;)
20 Nov 2015 - 6:14 am | मिहिर
हाहाहाहा!! =))
19 Nov 2015 - 8:33 pm | मितान
मला शाळाच आवडायची नाही ! विषयांचा प्रश्नच नाही.
गणिताच्या विज्ञानाच्या मराठीच्या सुद्धा तासांना वर्गाबाहेर उभं राहून बदामावरचे मुंगळे मोजलेलं आठवतं!
19 Nov 2015 - 8:36 pm | मांत्रिक
प्रतिसाद ऑफ द डे!!!
+११११११
19 Nov 2015 - 9:29 pm | Maharani
+१००
अगदी अगदी...पण नववी दहावीत अचानक इतिहास,भुगोल आवडते विषय बनले...
19 Nov 2015 - 9:25 pm | अजया
मला विज्ञान त्यातही जीवशास्त्र आणि फिजिक्स.समाजशास्त्र आणि मराठी पण फार आवडायचं.घरातल्या पुस्तक कृपेने अवांतर वाचन भरपूर असल्याने पुस्तकात असतो तो विषय अभ्यास असला तरी त्या पलीकडे हे सर्वच वाचन अभ्यास फार आनंददायी आहे हे उमगले कधीतरी शाळेच्याच दिवसात.
19 Nov 2015 - 9:32 pm | भाऊंचे भाऊ
ते कोणता विषय कोण शिकवतं यावर अवलंबुन असायच.
21 Nov 2015 - 1:11 pm | अन्नू
ज्युनिअरला असताना आमचा हिंदी हा सब्जेक्ट खुपच फेवरिट झाला होता; कारण तो विषय शिकवणार्या मिस लैच चिकण्या दिसत होत्या! ;) ;)
21 Nov 2015 - 1:44 pm | टवाळ कार्टा
विषय भरकटवू नका...वेगळा धागा काढा...जास्त प्रतिसाद येतील ;)
19 Nov 2015 - 9:33 pm | सुबोध खरे
शाळेमुळे किंवा कॉलेजमुळे माझ्या शिक्षणात कधीही व्यत्यय आला नाही
20 Nov 2015 - 1:50 am | राघवेंद्र
+१
20 Nov 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा
खिक्क
19 Nov 2015 - 9:36 pm | जव्हेरगंज
गणित, अत्यंत आवडीचा विषय, त्यातल्या त्यात बीजगणित तर भयंकर आवडीचा. त्याखालोखाल मराठी .
इतिहास, भुगोल अजिबात आवडत नव्हते.
इंग्रजी तर दुश्मन नबर वन.
हिंदी भयानक किचकट वाटायचं.
बस!
19 Nov 2015 - 9:38 pm | समीर_happy go lucky
मराठी आणि इतिहास-नागरिकशास्त्र हे माझे प्रचंड आवडते आणि हमखास स्कोअरिंग विषय
19 Nov 2015 - 9:42 pm | रेवती
व्याकरण व नागरिकशास्त्र सोडता सगळे विषय आवडायचे हे सत्य माझ्या शिक्षिका पचवू शकल्या नाहीत व त्यांनी मला दरवेळी कमी गुण दिले. ;)
19 Nov 2015 - 9:52 pm | पैसा
लोकांची उत्तरे लै भारी आहेत! आता विचार केला तर शाळेत असताना माझा नावडता विषय असा कोणताच नव्हता. कॉलेजात इकॉनॉमिक्स जरा जास्त आवडायचे आणि अकाउंटन्सी. कॉस्टिंग शिकवणारे कमालीचे रटाळ पद्धतीने बोलायचे. तासाला झोप यायची. त्यामुळे तो एक विषय नावडता झाला होता. खरे तर थंडीच्या दिवसात सकाळी ग्राउंडवर कोवळ्या उन्हात बसणे आणि मग ९ वाजता जवळचे पैसे मोजून मैत्रिणीसोबत रेखाचा एक किंवा २ वडे जे परवडेल ते आणि चहा दोघींत मिळून मारणे हा सगळ्यात आवडता विषय होता!
19 Nov 2015 - 9:58 pm | त्रिवेणी
मला vidnyan आणि इतिहास हे विषय आवडयाचे. गणिताचा कंटाळा होता.गृहपाठ केला नाही म्हणून एकदा sarani आम्हा काही मुलींना वर्गाबाहेर काढले. मग आम्ही संधीचा फायदा घेत मस्त खेळून घेतले आणि ठरवले उदयापण नको karyala गृहपाठ म्हणजे परत वर्गा बाहेर काढतील आणि आपण खेलू. पण नशीब जोरावर नव्हते सो आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता sarani वर्गातच उभे केले.
19 Nov 2015 - 9:59 pm | एस
'विषय सर्वथा नावडो...' हे आमच्याकडून इतक्या वेळा घोकून घेतले जाई की कुठलाच विषय आमच्या आवडीनिवडीत जागा मिळवू शकला नाही. ;-)
19 Nov 2015 - 10:05 pm | ट्रेड मार्क
वर्गात एवढे बदनाम होतो की दुसऱ्या कोणीही काही गडबड केली तरी मी वर्गाबाहेर असायचो. आमच्या Floor Supervisor तर माझ्यावर विशेष प्रेम करायच्या आणि त्यांची केबिन आमच्या वर्गाशेजारीच असायची नेमकी. येता जाता माझ्यावर बारीक लक्ष असायचं त्यांचं. त्यामुळे बहुतेक सर्व विषयांचे तास वर्गाबाहेर घालवलेले आहेत. टवाळक्या हा आवडता विषय!
20 Nov 2015 - 3:26 am | स्रुजा
हाहा सेम सेम ! माझ्या शेजारी शांत मुलींना बसवुन पाहिलं तर त्याच एक दोनदा माझ्याबरोबर बडबड करताना पकडल्या गेल्या :D
त्यात आई त्याच शाळेत नोकरी करत होती , अस्मादिक घरी पोह्चायच्या आधी दिवसभरातले कारनामे पोहोचले असायचे ! वैताग नाही तर.
त्यामुळे गप्पांचा तास सगळ्यात आवडता . कमी नावडणारे विषय म्हणजे इतिहास, भाषा, आणि फिजिक्स. भयंकर म्हणजे काहीच्या काही आवडणारा विषय म्हणजे गणित !!
19 Nov 2015 - 10:35 pm | निवेदिता-ताई
भारी चाललय ...
मला मराठी खूप आवडायचे, विशेषतः कविता....ते शिकवणार्या बाई तल्लीन होऊन शिकवायच्या.
19 Nov 2015 - 10:35 pm | निवेदिता-ताई
भारी चाललय ...
मला मराठी खूप आवडायचे, विशेषतः कविता....ते शिकवणार्या बाई तल्लीन होऊन शिकवायच्या.
19 Nov 2015 - 10:39 pm | पियुशा
मला सगळेच विषय आवडायचे गणीताच्या तासाला आम्ही वाहितल्या गाण्याच्या भेंडया खेळायचो हिस्ट्रीला पिक्चर कुठला भारी आलाय / हीरो हिरोईनच्या चर्चा असे प्रत्येक तासाचे खेळ शोधून ठेवेले होते म्हणुन मला सगळे विषय आवड़ायचे ==)))
20 Nov 2015 - 12:33 am | रातराणी
भूगोलाच्या तासाला नकाशा नकाशा :)
20 Nov 2015 - 12:34 am | रातराणी
आणि ते नाव गाव फूल फळ प्राणी ते पण खेळायचो आम्ही खूप.
20 Nov 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा
हि हि हि....हे खूप म्हणजे खूपच केलेय...आणि मराठीच्या तासाला बुक क्रिकेट...कारण मराठीचे पुस्तक सग्ळ्यात जाड असायचे ;)
पेन फाईट्/कंपास-बो फाईट हे तर कधीही सुरु व्हायचे =))
20 Nov 2015 - 1:48 pm | टवाळ कार्टा
म्हणूनच भौतेक अज्जून दुश्ली ब मध्येच अडक्ली हैस =))
20 Nov 2015 - 11:33 pm | पियुशा
हां हां हां नाही रे टका ,शिकुन् सवरुन इंजिनीअर झाले मी :)
21 Nov 2015 - 11:28 am | टवाळ कार्टा
:)
20 Nov 2015 - 12:36 am | रातराणी
मराठी चित्रकला आणि कार्यानुभव :)
20 Nov 2015 - 1:08 am | शब्दबम्बाळ
मराठी चित्रकला म्हणजे बाराखडीपासून वगैरे चित्र तयार करायची का?? :)
20 Nov 2015 - 1:50 am | रातराणी
:)
20 Nov 2015 - 1:18 am | इडली डोसा
माझे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे विषय आवडते होते. पाचवी, सहावी सातवी फक्त शाशि. मग आठवित ईतिहास , भुगोल , संस्कृत आणि शास्त्र. नववित गणित, ईतिहास, ईंग्रजी मराठी, संस्कृत. आणि दहावित फक्त ईंग्रजी मराठी, संस्कृत याच विषयांच्या जोरावर दहावित चांगले टक्के मिळाले. सगळे श्रेय त्या - त्या वर्गात ते ते विषय शिकवणार्या सर बाईंना.
20 Nov 2015 - 1:23 am | जॅक द रिपर
बीजगणित आणि भूमिती अतीप्रिय!
त्याखालोखाल पदार्थविज्ञानशास्त्रं, रसायनशास्त्रं, भूगोल आणि इतिहास!
आणि सर्वात नावडता आणि संन्यास घेईन पण मेडीकलला जाणार नाही असं तीर्थरुपांना सांगून बारावीला अजिबात अभ्यास न केलेला आणि अतिशय तिटकारा असलेला विषय म्हणजे जीवशास्त्रं!
20 Nov 2015 - 6:42 am | संजय पाटिल
अतीशय आवडायचे. सर्वात नावडता विषय ईतिहास.:(
20 Nov 2015 - 10:15 am | शिव कन्या
संगीत. एक अंध शिक्षक होते.
आमचं ते नरडं.त्यांचा तो गळा!
कान तयार झाला.पण सूर कधी घावलेच नै.
20 Nov 2015 - 10:33 am | अंतरा आनंद
रटाळ तासांना नाव गाव / फुलीगोळा किंवा तत्सम खेळ खेळणं सर्वात आवडीचं. आठवीत भूगोलाच्या बाईंच्या समोर झोप काढायचे पण फार सज्जन बाई. कधी म्हणून त्रास दिला नाही मला उठवून. कधी कधी मीच लाज वाटल्याने, कंपास बॉक्स पाडून मला झोपेतून उठवायचे. अश्या वेळीही मी सगळं सामान गोळा करायला उठले की "नंतर तास संपल्यावर" असं म्हणून मी परत झोपेन याची काळजी घ्यायच्या. बाकी मला गप्प बसून कोणाचंही बोलणं ऐकून घ्यायचं म्हणजे झोपच येते. वाचन असल्याने इतिहास लक्षात रहायचा, भाषेतही तेच. त्यामुळे ते जरा जास्त आवडीचे. पण ज्या ज्या वर्षी जे विषय चांगले शिकवले जायचे ते त्या वर्षी आवडायचे.
20 Nov 2015 - 12:47 pm | मांत्रिक
ह.ह.पु.वा.
या धाग्यावर अगदी मनोरन्जक प्रतिसाद येताहेत.
20 Nov 2015 - 10:36 am | गॅरी ट्रुमन
मला गणित फार आवडायचे-- त्यातही algebra पेक्षा geometry जास्त आवडायचे. इतिहास तर गणितापेक्षाही जास्त आवडायचा आणि नागरिकशास्त्र त्याहूनही जास्त आवडायचे.भूगोल या विषयाशी मी स्वतः कधीच रिलेट करू शकलो नव्हतो.मी शाळेत असताना अर्थशास्त्र नव्हते. पण ते नव्हते ते एका अर्थी बरेच झाले. नंतर मी त्या विषयाची पुस्तके बघितली आणि कुठल्याकुठल्या पंचवार्षिक योजनांमध्ये कशावर किती खर्च झाला, बेकारीचा दर किती टक्के आहे वगैरे विदा त्या पुस्तकांमध्ये होता. असला प्रकार मला कधीच आवडला नसता.
विज्ञानात Biology शी माझे जन्माजन्मांचे वैर होते. कधीकधी वाटते की १२ वी मध्ये जर मला तो विषय असता तर मी अजूनही १२ वी मध्येच अडकलो असतो :) Chemistry शी कधीच जवळीक वाटली नाही. विशेषतः नववीत असताना Chemistry मधील एका धड्यात कधी न बघितलेल्या (आणि आयुष्यात कधीही बघायची शक्यता नसलेल्या) १२ की १५ केमिकलचे गुणधर्म आणि उपयोग, ते कसे तयार करतात वगैरे गोष्टी होत्या.ती गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळे या विषयाशी दुरावा निर्माण झाला तो कायमचाच. गणिताशी जवळचे म्हणून Physics आवडणारच अशी माझ्याविषयी अनेकांची अपेक्षा असे. पण तो विषय मला आवडला तो एकदाच--१२ वी मध्ये.
भाषांमध्ये मराठी हा शाळेतील एक विषय म्हणून एकदाच आवडला तो १० वी मध्ये कारण पुस्तकातील धडे खूप छान होते.
जुन्या आठवणी जागृत करणार्या या धाग्याबद्दल धन्यवाद.
20 Nov 2015 - 10:46 am | नितिन५८८
मुन्ना भाई MBBS मधला subject लई भारी
20 Nov 2015 - 11:22 am | जेपी
शाळेतील आवडता विषय>>>
वर्गाबाहेर टांगलेली घंटा.
माझ बारीक लक्ष असायच
20 Nov 2015 - 7:24 pm | मांत्रिक
जेप्या राॅक्स...
शाळा शाॅक्स...
20 Nov 2015 - 12:42 pm | नीलमोहर
आवडते विषय शिक्षक कोण त्यावर अवलंबून असायचे :)
इंग्लिश पहिल्यापासून आवडता विषय, शिक्षिकाही खूप छान होत्या आणि शिकवणं व्यवस्थित त्यामुळे इंग्लिश बर्यापैकी पक्कं आहे. त्यांची लांबसडक रेशमी पोनीटेल (खर्याखुर्या घोड्याच्या शेपटीप्रमाणे) असायची ते खूप आवडायचं.
मराठी सातवीपर्यंतच होतं त्यामुळे बर्यापैकी कच्चं राहिलं, ती कसर भरपूर वाचन करून भरून काढायचा प्रयत्न असतो. हिंदी आवडतं पण त्यात गुण जास्त पडायचे नाहीत.
संस्कृत शिक्षिका अतिशय सुंदर शिकवायच्या त्यामुळेच दहावीत ८४% वगैरे गुण होते, अजूनही आवडतं.
बाकी विज्ञान एवढं आवडत नव्हतं पण दहावीत सगळ्यात जास्त गुण त्यातच पडले होते, त्याखालोखाल गणितात
तेही विशेष आवडायचं नाही. इतिहास भूगोल इतर सर्व ओके-ओके.
चित्रकला पहिल्यापासून आवडते मात्र कला महाविद्यालयात जाण्यासाठी एलीमेंटरी, इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असणे सक्तीचे असते हेही माहीत नव्हते अशी आमची अक्कल, त्या परीक्षा देणे राहूनच गेले ही खंत नेहमी राहिल.
त्यामानाने आताची मुलं खूपंच स्मार्ट, आपल्याला पुढे काय शिकायचंय, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे
सगळी इत्यंभूत माहिती त्यांना असते.
मैथिली मिस म्हणून दक्षिण भारतीय शिक्षिका होत्या, एकदा गृहपाठ केलेला नसतांना ते सांगितलं नाही म्हणून त्यांनी ५वीच्या वर्गापासून स्टाफरूम पर्यंत माझी कान धरून वरात काढली होती ती शाळेतली पहिली आणि शेवटची शिक्षा..
मात्र नंतर त्यांना माझा मुंगेरीलाल स्वप्नाळू स्वभाव कळला, मग कधी शिकवण्यात लक्ष नाही असं दिसून आलं
की त्याच विचारायच्या day dreaming haan? ;)
अशा शाळेच्या रम्य आठवणी, आठवण काढली नाही की लगेच निबंध पण लिहून झाला.. :)
कॉलेजमधील विषयांचा निबंध अजून मोठा होईल तेव्हा ते नंतर कधीतरी ;)
20 Nov 2015 - 12:52 pm | बोका-ए-आझम
शाळेत - इतिहास
काॅलेजमध्ये - अर्थशास्त्र, राज्यशास्त्र
मास कम्युनिकेशनमध्ये - पोलिटिकल कम्युनिकेशन
कायदा शिकत असताना - दोन्ही प्रोसीजर कोड्स - सिव्हिल आणि क्रिमिनल.
एमबीए मध्ये - स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.
20 Nov 2015 - 1:13 pm | उगा काहितरीच
आवडते विषय सरनुसार बदलायचे पाचवीला मराठी , सहावी सातवीला गणित , आठवीला विज्ञान , नववीला इतिहास , दहावीला शिंग फुटले अन् अभ्यासात असलेले विषय सोडून इतर विषयात लक्ष द्यायला सुरूवात झाली.
20 Nov 2015 - 1:17 pm | पिशी अबोली
अल्जिब्रा आणि भाषा.
अर्थात या दोन्ही गोष्टी कन्सिस्टन्टली आवडल्या नाहीत आणि जमल्या पण नाहीत. पण जमल्या तेव्हा अतिच आवडल्या, नाहीतर तशाही आवडल्याच.
इकॉनॉमिक्स पण आवडायचं. दहावीला हा २० मार्कांचा अभ्यासक्रम भूगोलाच्या पेप्रात का घुसवला होता हे कधी कळलं नाही.
इतिहास भयंकर नावडता. शिक्षकांमुळे अर्थात.. अकरावीला इतिहासाला ऑप्शन पाहिजे म्हणून १५ मिंटांवरील कॉलेज सोडून दोन बस बदलून १.५ तास जावं लागणारं कॉलेज निवडलं होतं. अर्थात ते चांगलंच झालं..
पुढे इंग्रजीमधे ड्रामा आवडायचा आणि पोएट्री अजिबात नाही. फिक्शन तर टीपीचा विषय होता. संस्कृतच्या वर्गात मीमांसा आणि तर्कशास्त्र(जमलं नाही कधीच, उगाच आवडायचं). बाकी सगळ्याचा वैताग यायचा. अष्टाध्यायीपण आवडली होती. पण ते सगळे वरवर केलेले विषय आहेत.
20 Nov 2015 - 2:51 pm | आदिजोशी
काहीही अभ्यास न करता कायम ८० च्या वर मार्क्स असायचे.
20 Nov 2015 - 3:03 pm | टवाळ कार्टा
21 Nov 2015 - 11:30 am | टवाळ कार्टा
च्च च्च च्च...पूर्वीचे आदि जोशी राहिले नाहित आता
20 Nov 2015 - 7:20 pm | मीता
शाळेत असताना संस्कृत आणि मराठी आणि बीजगणित .
बीजगणित प्रचंड आवडायचं .
११,१२ नेमकं काय आवडायचं तेच आठवत नाही .
कॉलेज ते पोस्ट graduation फक्त आणि फक्त basketball आवडायचं .
दरवर्षी पास झाले हि देवाची कृपा .
20 Nov 2015 - 9:20 pm | चतुरंग
मराठी आणि गणिताची गोडी रसाळबाईंमुळे चौथीतच लागली.
सीनिअर घारे सरांमुळे चित्रकला हा आवडीचा विषय शिवाय घरी आई चित्रे काढायची त्यामुळे एलेमेंटरी आणि इंटरमीजिएट अशा दोन्ही परीक्षा दिल्या.
निंबाळकर सरांच्या वळणदार आणि सुवाच्य हस्ताक्षरामुळे आणि शिकवण्याच्या पद्धतीमुळे भौतिकशास्त्र आवडायला लागलं.
त्रिभुवन सरांच्या मुळे इतिहास. एसडी कुलकर्णींच्या तल्लीन होऊन शिकवण्यामुळे आणि अवांतर संदर्भपुस्तके देण्याच्या सवयीमुळे मराठीची गोडी दहावीत अधिकच वाढली. मल्लखांब आणि इतर खेळांमुळे मला नववीतून दहावीत जाताना संस्कृत मिळालं नाही कारण नववीत ८५%चा कटॉफ होता संस्कृत मिळण्यासाठी. मग १०० मार्कांचं हिंदी घेतलं. माझ्या बाबांचे एक जुने शिक्षक आडकर सर होते त्यांच्याकडे हिंदी शिकायला जायचो. काय शिक्षक होते!! म्हणजे मला संस्कृत मिळालं नाही याचा आनंद झाला इतके सुंदर शिकवायचे!! त्यांचा मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि फारसी या सर्व भाषांचा दांडगा अभ्यास होता. त्यांचा पीएचडीचा प्रबंध त्यांनी उर्दूतून लिहिला होता. मैथिलीशरण गुप्त, हरिवंशराय बच्चन, प्रेमचंद अशा कित्येक कवी आणि लेखकांची ओळख मला तिथेच झाली. संपूर्ण 'मधुशाला' तोंडपाठ होतं त्याचं. त्यांच्यामुळे मी धर्मयुगचे अंक उत्तम रीतीने वाचू शकायचो.
अकरावी आणि बारावी गणिताचे कुलकर्णी सर म्हणजे भन्नाट होते. एखादा प्रॉब्लेम त्यांच्याकडे नेलाय आणि त्यांनी तो सोडवला नाही असे झालेच नाही. कित्येकदा लगेच सुटला नाही तर आठवड्याने, पंधरवड्याने जेव्हा सुटेल तेव्हा बोलवून सांगायचे! इंग्लिशच्या देवकुळे मॅडम म्हणजे भारीच त्यांच्यामुळे इंग्लिश आवडलं.
रसायनशास्त्राचे आणि माझे का कोण जाणे पण अजिबातच सूर जुळले नाहीत. जीवशास्त्र त्यातल्या आकृत्या काढा या एका कारणासाठी आवडायचे परंतु बेडूक आणि झुरळ कापा वगैरे प्रकारांमुळे ते नकोसे वाटून मी सोडून दिले.
माझ्या बालमित्रामुळे इलेक्ट्रॉनिक्स आवडायला लागले ते वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच. त्याच्या घरी जाऊन ५५५ चे टायमर बनवणे, टचस्विच, रेनस्विच, बनवणे असले खेळ करत बसायचो. कपॅसिटर चार्ज करुन खोलीत येणार्याच्या अंगावर फेकायचा आणि तो झेलला की झटका बसायचा मग आम्ही खिदळायचो. वाट्टेल ते खेळ...
पुढे अभियांत्रिकीला ड्रॉइंग भयंकर आवडता विषय. ड्रॉइंगचे शेवडे सर म्हणजे अफलातून होते. नजर एवढी तयार की शीटवरच्या दोन रेघा समांतर नाहीत हे नुसते बघून ओळखायचे. अभ्यासाच्या बाहेरची ड्रॉइंगची विविध कोडी घालून आम्हाला त्यांनी तयार केलं. पर्स्पेक्टिव प्रचंड आवडता प्रकार!
मायक्रोप्रोसेसरची गोडी प्रो.नागेंद्र आणि प्रो.वाय.बी.माने सरांमुळे जी लागली ती आजतागायत! नागेंद्र पुढे इस्रोमधे गेले.
अफलातून शिकवायचे. इंटेलचा ८०८५ हा पहिला प्रोसेसर शिकलो. त्याचा इंस्ट्रक्शन सेट आम्हाला पाठ होता इतका की आम्ही पेपरवती प्रोग्राम न लिहिता थेट ऑपकोड्स वापरुनच किटवरती प्रोग्रामिंग करायचो!
त्यानंतर कुंभोजकर सरांमुळे ऑपरेशन्स रीसर्च हा विषय आवडला. अजूनही कधीकधी कॉलेजला जाऊन शिकावे असे वाटते.
बर्याच आठवणी जागल्या या धाग्यामुळे!! :)
-रंगा
20 Nov 2015 - 9:27 pm | टवाळ कार्टा
हैला ८०८५ चे प्रोग्रामिंग...लयच नॉस्टॅल्जिक केलेत :)
मला तो विषय एकदा वाचून डोक्यात फिट्ट बस्लेला :) इंस्ट्रक्शन सेट तर तोंडपाठ होता
20 Nov 2015 - 11:39 pm | स्रुजा
आईशपथ !!! ८०८५ आणि डिजिटल भयंकर आवडते !! फार च नॉस्टेलजिक करणारा विषय :)
बादवे, गणिताचे व्ही पी कुलकर्णी सर का?
21 Nov 2015 - 8:53 am | चतुरंग
व्ही पी केच! मस्तच शिकवायचे.
20 Nov 2015 - 9:58 pm | अजया
पन्नाशीनिमित्त कविता बाईंचा पाटी पेन्सिल आणि गणिताचे पुस्तक देऊन सत्कार!
20 Nov 2015 - 10:02 pm | कविता१९७८
धन्यवाद, सर्वांचे आभार
20 Nov 2015 - 10:38 pm | दिवाकर कुलकर्णी
माझा स्वत:चा अंकगणित हा बिषय हा आवडता होता,जून्या
एस् एस् सी ला मी १०० मार्काचं (आल्जिब्रा जॉमेट्री वेगळा विषय होता)अंकगणित घेतलं होतं ,
आमच्या शाळेत फक्त दोन चार मुलानीच अंकगणित (एकूण१५० विद्यार्थ्यात)घेतलं होतं , नवलाची गोष्ट
अंकगणित शिकवायला शिक्षक नव्हते, अभ्यास आमचा आम्हीच केला, पेपर त्यावर्षी अवघडात अवघड
निघाला,त्यावेळ्चया मानानी मला बरे ,पण आजच्या मानानी कचरा (१००पैकी७५)मार्क मला मिळाले,
त्या अंकगणितामुळं आयुष्यात कोणत्याहि हिशोबात मी कमी पडलो नाही नक्कीच,आणि व्यवहारात
त्यामुळं आत्मविश्वास आला,
20 Nov 2015 - 11:41 pm | मुक्त विहारि
१. संगीत (काय वाट्टेल ते लिहा, राग भैरवची माहिती मिया-मल्हारला लिहीली तरी पास.)
२. पी.टी. (ह्या पी.टी.चा लॉम फॉर्म अद्याप माहित नाही.काहीतरी पॅरेंट्स ट्रेनिंग असावे. ह्या लेखी परीक्षेत पण वाट्टेल ते लिहिले तरी चालते.हमखास पास.)
३. शिवण (आईने फार मदत केली...)
21 Nov 2015 - 8:02 am | बोका-ए-आझम
दाणीबाई होत्या का?
21 Nov 2015 - 4:15 pm | अजया
बोक्या =))
आणि शिवणाला साखरे बाई _/\_
21 Nov 2015 - 4:02 am | गामा पैलवान
.... आजूनही टिकून आहे! :-) अर्थात गणोबा गणपतराव गणपुले.
शाळेत बीग, भूमिती, सगळं आवडायचं. पुढे ११/१२ वीत गणिताचा विस्तार शालेय गणिताच्या मानाने बराच जास्त झाला. तेव्हाही सगळे भाग आवडायचे. खासकरून इंडक्शन, क्यालक्युलस, कोनिक सेक्शन्स. पुढे १३/१४ वीत इंजिनियरिंगला लाप्लास ट्रान्सफॉर्म, कॉम्प्लेक्स इंटिग्रल्स, सरफेस इंटिग्रल्स, डिफरन्शियल इक्वेशन्स, अनंतमाला, वगैरे आवडीचे. त्रिमितीय अवाकृत भूमिती (=3D differential geomerty) तर खास आवडीची. म्याट्रिक्स जरा बोअर व्हायचं, पण वेळ मारून नेता यायची.
निर्बुद्ध पाठांतरामुळे जीवशास्त्र आजीबात आवडायचं नाही. बारावीत असतांना वनस्पतीशास्त्राचा पेपर पुढे ढकलला गेला होता. त्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी चक्क ६ दिवस मिळाले. त्यामुळे जीवशास्त्र सुटलं. नाहीतर दांडी गुल व्हायची वेळ आली होती. बोर्डाच्या प्राणीशास्त्राच्या पेपरात गाळलेल्या जागा भरा हा पहिला प्रश्न आणि बेडकाच्या मेंदूची पानभर आकृती हा शेवटचा प्रश्न सोडवून तासाभरात (मित्रासंगे) कागद टाकला होता. लवकर घरी गेलो तर आईकडून उपट्या पडतील म्हणून रेल्वे स्थानकावर जाऊन कटिंग मारत बसलो त्याच मित्रासवे. जीवशास्त्र म्हणजे अगदी जीव(द्या)शास्त्र होतं माझ्यासाठी. मात्र असं असलं तरी त्याविषयी अवांतर वाचायला आवडतं.
१२ वीला गणित आवडीचं असल्याने भौतिकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात गणिती समस्या सोडवण्यावर भर असे. त्याचा वेळ वाचवण्यात मजबूत फायदा झाला. दोन तासांचा पेपर दीड तासांत लिहून होई. त्यामुळे किमान दोनदा तरी तपासून पाहायला मिळंत असे.
-गा.पै.
21 Nov 2015 - 11:43 am | अभिजीत अवलिया
केमिस्ट्री आणी जीवशास्त्र सोडून बाकीचे विषय बर्यापैकी आवडायचे. जीवशास्त्र ह्या विषयामुळे कदाचित बारावीत मी नापास होईन अशी मनात धाकधूक होती.
21 Nov 2015 - 1:37 pm | आदूबाळ
जरा अवांतर
आपण लिहिलेला पेपर तपासून बघणे आणि बाहेर आल्यावर पेपराची चर्चा करणे या गोष्टींचा भयंकर त्रास होत असे. आपण पेपरात केलेली पापं उघडी पडू नयेत म्हणून मी नेहेमीच सजग असे ;)