स्कूटर होती माझ्याकडे,
हवा कमी झालेली,
हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े,
सुट्टे नव्हते,
म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं,
२-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो,
आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन,
सुट्टे असून पैसे न देता,
घाइत होतो,
अर्थात दुर्लक्ष करत,
मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून,
त्या गोष्टीला आता दीड दशक होईल,
अजुन ही जातो आता सैंट्रो असते,
कर्ज वाढत चाल्लैय!
तो रुपया अजुन दिलेला नाहिये,
२-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो,
खंत अजुनही होती मनात,
पण दूकान नव्हतं ते,
निराश झालो!
वेळ असून वेळ गेलेली,
आयुष्यभर सतावणार ती हवा!
अजुन ही जेव्हा जेव्हा तो हवेचा पाइप हातात घेतो,
एक रुपया आठवतो तो!
न दिलेला...
एक रुपया
श्या... वेळीच परतफेड करा रे! वाट नका बघू...
नाहीतर प्रत्येक पाइचं न फिटणारं कर्ज फेडावं लागतं...
ते पण आयुष्यभर!
#सशुश्रीके | १६ नोव्हेंबर २०१४ । रात्रीचे १.१२
प्रतिक्रिया
16 Nov 2015 - 9:43 pm | माम्लेदारचा पन्खा
हे प्रकरण झेपलं नाही
16 Nov 2015 - 9:49 pm | जव्हेरगंज
सशुश्रीके= याचाही लॉंगफॉर्म येऊ द्या!!!
16 Nov 2015 - 9:51 pm | स्पा
=))
16 Nov 2015 - 10:11 pm | नाव आडनाव
अजुन ही जेव्हा जेव्हा तो हवेचा पाइप हातात घेतो,
म्हणजे तुम्हीपण पंचरवाले काय? नाहीतर तुम्ही कशाला घेताय हातात पाईप.
प्रत्येक पाइचं न फिटणारं कर्ज हे मी
प्रत्येक पाइपचं न फिटणारं कर्ज
असं वाचलं.
बाकी कविता जबरदस्त.
#नाव आडनाव | १६ नोव्हेंबर २०१५ । रात्रीचे १०.१०.१०
16 Nov 2015 - 10:49 pm | दिवाकर कुलकर्णी
हे कर्ज नव्हे याला उधारी म्हणतात .आणि तुमच्या भाषेत क़र्ज़ फेडलच नाही तर
फिटणार कसं?
मी एकदा कुठल्याच्या रांगेत असता सुटा १ ₹ नव्हता ,परत देणार नाही या बोलीवर( पुनः न भेटू त्यास्तव)मागीतला,
अनेकानी देवू केला. मनाला टोचणी नाही.
हवा वाल्याला न देण्याचा हवाला दिला असतात,तर हवं तसं त्या रस्त्यावरून हवं तर जाउ हवं तर येवू शकला असतात.