गुन्हा - 'तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक'

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 1:07 pm

आयुष्यात खुप खटल्यांना समोरा गेलो,
खुप आहेत, अजुनही चालू आहेत, पण हे अपराध...
नाही हो, कोण असतो परफेक्ट मला सांगा.

माझ्या वरचा एक नेहमी ठोकला जाणारा आरोप म्हणजे
'समीर फार तोंडातल्या तोंडात + फ़ास्ट बोलतो'

मी मान्य केलं, कशाला कोर्ट कचेरी!?
आपलं आपल्यात बघून घेउ ना...
सत्यमेव जयते पर्यन्त कशाला जाताय!

बरं, गम्मत तर ऐका, एकदा काय झालं,
कॉल्लेज च्या वेळचा किस्सा, मी आणि सुरश्री,
दोघे मेडिकल स्टोर मध्ये शिरलो,
तीला काहीतरी औषधं घ्यायची होती.

मी त्या मेडिकल स्टोर मध्ये इथे तिथे बघत बसलो,
कुठल्याही स्टोर मध्ये घुसलो की काही ना काहीतरी घ्यायचंच
ह्या हेतूने / सवईनी / कर्तव्याने दुकानदारास एका गोष्टीची मागणी केली...
त्याने 'निष्कामकर्मयोग' चेहरा ठेउन मला 'स्टेफ्री'चं प्याकेट काढून दीले!

मी सुरश्री कड़े पाहिलं...
सुरश्रीने माझ्या कडे पाहिलं...
आणि त्या प्याकेट कडे बघत कधी नं हस्ल्या सारखी 'म्यूट' मध्ये,
पण घोडा उधळल्या वर त्याचा अभिनय करताना जो काही अमानवीय अंगविक्षेप होतो तसा करत हसायला लागली!

मग मी.. मी काय...
मी आणि तो दुकानदार, एकमेकांकड़े बघत स्लो मोशन मध्ये, माझी मुंडी 'नाही-नाही' चा जप करत...
माझ्या मुखातुन... स्लो खरच... अगदी कर्ज घेउन हळु हळु फेड्ल्या सारखे.. ३शब्द + एक वाक्य बाहेर काढले

वाक्य होते...
'स्ट्रे-प्सि-ल्स मागितले होते हो मी!'

आता सांगा ह्यासाठी खटला कशाला?
मान्य करतो ना...गुन्हा - मी तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक करतो.
हाय काय न नाय काय!

#‎सशुश्रीके

विनोदप्रकटन