टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
राधा
प्रेषक फुलवा ( शनी, 09/06/2008 - 14:31) .
कळलेच नाही मजला
जडला कसा जिव्हाळा
मन चिंब भिजवुनी हा
जणु कृष्णमेघ गेला
थेंबात प्रीत जागे
स्पर्शास ओढ लागे
कळले कधी न जुळले
आतुर मनांचे धागे
सर्वस्व ये फुलुनी
जणु केवडा फुलावा
हातात चांदण्यांचा
जणु ताटवा मिळावा
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


वा!
वा!
क्या बात
क्या बात है !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
खुप
खुप छान...

प्रिय सख्याच्या भेटीची, अंतरीची तळमळ उत्कटरीत्या मांडलेली आहे...
खुप
खुप छान
आवडले
=D>
वा !!!! खुप
वा !!!!
खुप सुरेख!!!!!!
अप्रतिम
खुपच सुंदर.....
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
या ओळी विशेष आवडल्यात.
-अभिमन्यु
(चक्रव्युहात अडकलेला)
मस्त
छान कविता आहे.
मीनल.
मस्तच ग,
फुलवा,
सुंदर कविता,
थेंबात प्रीत जागे
स्पर्शास ओढ लागे
कळले कधी न जुळले
आतुर मनांचे धागे
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
हे तर खासच..
हातात
हातात चांदण्यांचा
जणु ताटवा मिळावा
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
वावावा! हे सगळ्यात जास्त आवडले. मस्त!
(आस्वादक)बेसनलाडू
सुरेख
कविता, अतिशय आवडली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कविता आवडली.
मस्त लिहिली आहेस...
वाह !!
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
अतिशय सुरेख !!
व्वा..
सर्वस्व ये फुलुनी
जणु केवडा फुलावा
हातात चांदण्यांचा
जणु ताटवा मिळावा
व्वा..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
छान..
छान.. सुंदर!
कळलेच नाही मजला
जडला कसा जिव्हाळा
मन चिंब भिजवुनी हा
जणु कृष्णमेघ गेला
हातात चांदण्यांचा

जणु ताटवा मिळावा
हे विशेष आवडले.
कृष्णमेघ.. काय सुंदर उपमा दिलीत मुकुंदाला! वा..खूप सुंदर!
येऊ द्यात अजून
मुमुक्षू
सुभान
सुभान अल्लाह!
वा!
सुरेख..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नविन प्रेमानुभव वाटते
कविता उत्तम साकारली आहे- कवीचे नविन नविन प्रेम प्रकरण असावे असे वाटते..
हर्षद आनंदी...
>>कवीचे नविन नविन प्रेम प्रकरण असावे असे वाटते..
इथे कवितेबद्दल ,त्यातील भावाबद्दल बोलणे अपेक्षीत आहे. अनोळखी व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल अशी उथळ शेरेबाजी करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.
निदान माझ्या बाबतीत तरी माझा याला आक्षेप राहील.
मस्त!
हातात चांदण्यांचा
जणु ताटवा मिळावा
आणि..
ओल्या मिठीत धुंद
तू सावळा मुकुंद
राधा तुझी मी झाले
तोडून सर्व बंध
हे फार आवडले..
स्वाती
मस्त
कविता अतिशय आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश