'आन्ना' वय वर्ष ४५

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
8 Nov 2015 - 1:25 pm

'आन्ना' वय वर्ष ४५
त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला... काळा वर्ण पांढरी दाढी, पट्टेरि हाप चड्डी, इतर वेळी फूल पांढरा मळका शर्ट, कामाच्या वेळी फूल बनियान, पांढऱ्या निळ्या स्लीपर्स, गळ्यात रुमाल, दात पुढे, आणि त्याची दोन मुलं, सेम टू सेम त्याच्या सारखीच दिसायला आणि वागायला ही, एखादं काम सांगितलं की नाही असं कधी ऐकलच नाही आम्ही.

हल्ली जेल लावून (तारे जमीं पर मधल्या आमिर अठवा) कसे 'यो' दीस्तात! तशी सेम हैरस्टाइल होती आन्नाची, फ़क्त जेल ऐवजी चापडून तेल लावयचा, चहा प्यायला पायऱ्यांवर बसला की अक्ख्या गावच्या खबरा सांगत हातातली कपबशी मधला चहा पटापटा संपवायचा भुरके मारत, कोळी स्टाइल कधी कधी लुंगी पण घाटलेला पाहिलाय मी, लांब जाऊन ब्रिस्टल ओढायचा की काम सुरू...

हे सगळ वर्णन १९९०च्या अलीकडलं... तेव्हा तो ४५वगैरे चा असणार, आता ६५+ चा नक्कीच, आक्षीचं घर/जागा सर्व विकलं ६-७वर्षापूर्वी, नंतर कधी भेटता आलं नाही, आणि कधी ती वेळ येईल असं वाटत नाही.

आन्ना सारखे खुप चेहरे अजुन त्याच 'वयात' फ्रीझ झालेले आहेत, ते तेव्हढेच तरूण आणि मी ही तेव्हढाच लहान आहे अजुन, 'माइचा पोरगा ना रे तू' 'आप्पांचा नातू ना रे तू' अश्या लोकांच्या हाका अजुनही रास्त्यावर जिवंत आहेत, इंदुमतीचं दूकान, बपटांचं घर, चिटणीसांची वाडी, दातारांचा टीव्ही, गणपतीचं देऊळ, त्याच्याच डाव्याबाजूला असलेला फोरिनरनी विकत घेतलेलं घर, त्याचा समोर भीड्यांचं अर्ध पडलेलं/पाडलेलं घर, गोळा वाला राजू भैया, कुल्फी वाला, पोस्टमन काका... हे सगळे अजुन ही दिसतात... सगळे आठवतात!

आन्ना त्यांच्या पैकीच एक... वय वर्ष ४५


#सशुश्रीके

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

8 Nov 2015 - 2:09 pm | बाबा योगिराज

बंधू, थोड विस्ताराने येऊ द्या. थोड तुटक तुटक झालय. अजून मस्त खुलवता आल अस्त.
पुलेशु.

प्रभाकर पेठकर's picture

8 Nov 2015 - 2:59 pm | प्रभाकर पेठकर

व्यक्तीचित्रण तिथल्यातिथेच पायात घुटमळत राहीलं. पुढे सरकलंच नाही.

आदूबाळ's picture

8 Nov 2015 - 3:13 pm | आदूबाळ

+१

सहमत आहे. "सांगण्यासारखे काही" व्यक्तिचित्रात सापडलं नाही.

आदूबाळ's picture

8 Nov 2015 - 3:13 pm | आदूबाळ

+१

सहमत आहे. "सांगण्यासारखे काही" व्यक्तिचित्रात सापडलं नाही.

बाबा योगिराज's picture

8 Nov 2015 - 5:19 pm | बाबा योगिराज

सूंदर लिहिलय.
ऐसा और भी आने देओ.

जेपी's picture

8 Nov 2015 - 5:26 pm | जेपी

चांगल लिहीत आहात.
हळुहळु कामथे काका पर्यंत पोहचाल.

जेपी's picture

8 Nov 2015 - 5:58 pm | जेपी

कामथे काका कोण?
कामथे काका कोण???

.
.
.
.
.
.
.
.
.
काय नाय गंमत केली.

बाबा योगिराज's picture

9 Nov 2015 - 12:03 am | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या

अक्षीचे गधेगाळ तुम्ही पाहिले का हो?

अक्षीचे असून तुम्हाला नाही माहीत का?

अक्षीच्या मुख्य रस्त्यावरील मंदिराच्या जवळच असलेल्या सरकारी कचेरीच्या पुढ्यात एक शिळा आहे. त्यावर कोकणचक्रवर्ती, पश्चिमसमुद्राधिपती केशिदेवराय शिलाहार ह्याचा महाप्रधान भईजू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कवली धान्य मोजून दिले हे दान जो मोडिल त्यास महालक्ष्मीची आण घातलेली आहे. हा गधेगाळ डॉ. तुळपुळे यांचे मते महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मराठी लेख मानण्यात येतो.

तर दुसऱ्या गधेगाळाची शिळा मंदिराचे उजवी बाजूस रस्त्याच्या पलीकडे गटारावर असून त्यावर रामदेवराय यादवाचा सेवक श्रीजाईदेव याचा पुत्र इश्वरदेव क्षत्रिय याने अक्षी गावातील देवी श्रीकालिकादेवी हिच्या ब्राह्मणास १ गद्याण दिला ह्याच्या उल्लेखाचा आहे. व खाली शापवचन आहे.
गद्याण म्हणजे ४८ गुंजांच्या भाराचे सोन्याचे नाणे.
उपरोक्त शिलालेख इ.स. १२९१ चा आहे. तर आधीचा केशिदेवाचा लेख इ.स.१०३९ चा मानण्यात येते.

ह्या व्यतिरिक्तही नागाव येथील भीमेश्वर देवळाचे पायरीचे बाजूस कोकणाधिप हंबिररावाचा इस. १३४० चा शिलालेख आहे. हयात विविध दानांचा उल्लेख आहे. ह्यातली काही दाने ही मुसलमानांनाही दिलेली आहेत हे विशेष.

टवाळ कार्टा's picture

8 Nov 2015 - 8:08 pm | टवाळ कार्टा

यात कुठेही गधेगाळ म्हणजे काय याचा उल्लेख नाही =))

प्रचेतस's picture

8 Nov 2015 - 8:10 pm | प्रचेतस

तू गप रंव रे. वशाड मेलो.

टवाळ कार्टा's picture

8 Nov 2015 - 8:17 pm | टवाळ कार्टा

घ्या बोलून...तुम्च्या मुस्क्या आवळ्ळ्याजाण्याचे दिवस दूर नैत ता =))

ह्या एकोळी लेखात, बर्‍याच गोष्टी सामावलेल्या दिसतात.