भय इथले संपत नाही.....

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
3 Nov 2015 - 11:02 pm

कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी-
गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते-
पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून-
काळ्याकपारीमध्ये दडलेले-
काहीतरी......

जे आहे फार प्राचीन
जे आहेदुष्ट क्रूर
अन वखवखलेले
ज्याचा आहे स्पर्श दाहक
ज्याचा विचारही भिववणारा

इथला आसमंत भारलेला
इथे कशाचीतरी हुकुमत
इथली शांताताही असहय
इथले आवाज तसेच भयानक
इथल्या सावल्या हलतात
इथली झाडे कुजबुजतात
इथले खडकही शहारतात

सततचे नाट्य इथले थांबत नाही
भय.....भय इथले संपत नाही.....

कविता माझीभयानककविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

4 Nov 2015 - 12:06 am | चांदणे संदीप

चला इथे झोपा...जीभ दाखवा..वेडावून दाखवल्यासारखी नको! सरळ बाहेर काढा. दीर्घ श्वास घ्या! हळूहळू सोडा. डोळे बघू. ट्प..ट्प..ट्प.... इथे दुखतय? इथे... इथे...इथे.. ओक्के! कधीपासून होतय असं??

हे अस वर लिहिल्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरलाच कधी विचारायला मिळालं तर? मज्जा!!

असो, कविता छानच!
मला स्वत:ला अशा टाईपात कविवर्य मंगेश पाडगावकर यांची,

"जुन्या वडाच्या झाडाखाली
अर्ध्या सुकल्या डोहाकाठी
पायघोळ छायांचा डगला
घालून फिरते काळी भिती..."

ही कविता खूप आवडते!

धन्यवाद,
Sandy

बाजीगर's picture

4 Nov 2015 - 11:50 pm | बाजीगर

चांगला प्रयत्न.
पण हिचकाॅक सारखी हाॅरर नाही.
जी.ए.च्या कथेसारखी भयाण नाही.
शेवट अंगावर येईल असेकाही लिहा.

प्यारे१'s picture

5 Nov 2015 - 2:24 am | प्यारे१

च्यायला, भय इथले ची आठवण ख फ वर काढली आणि इकडे येऊन बघतो तर त्याच नावाचं काही....
हे बीभत्स रसाचं उदाहरण काय डॉ.
भयंकर झाला, हा झाला आता उद्या नवीन. :)

प्यारे१'s picture

5 Nov 2015 - 2:24 am | प्यारे१

च्यायला, भय इथले ची आठवण ख फ वर काढली आणि इकडे येऊन बघतो तर त्याच नावाचं काही....
हे बीभत्स रसाचं उदाहरण काय डॉ.
भयंकर झाला, हा झाला आता उद्या नवीन. :)