एकदाची सोम्याजवळ चिट्ठी दिली, घरी येऊन जेवण केलं अन गच्चीवर जाऊन चंद्र-तारे पाहत निवांत पडून राहीलो. पर मनात धाकधुक चालूच. जर तिला आवडलं नई अन ति बापाला घेऊन घरला आली त? आपल्या बापाचं जाउद्या, तिचा बापच फोडून काढिन. त्याची मिशि पाहुनच पार गळपटायला हुतं. तेवअख्ख्या गावांत इज्जत घालल. च्याला भलतीच् भानगड़ करुण बसलोय. सोम्याला फ़ोन करुण नकु दिउ म्हणाव त् वरुण तेवच् फाटली का म्हनल. जाउद्या होउ दया काय होइचं ते. खाली गेलू. दप्तर घेतलं. आये ला दिन्याच्या घरी अभ्यासाला चाललू सांगितलं अन घरामागं आलू. दत्तूअण्णा शेतात रहायला गेलेला. त्याच्या पत्र्यावरून फिरसे गच्चीवर येऊन निजलो.
सकाळी उठलो तव्हा चंद्र जाउन सूर्य आलेला. घड्याळात साडेसहा वाजलेले. चिट्ठित लिव्हल्यावाणी, "रोज सकाळी 7 वाजता तुला मंदिरात जाताना, बालवाडी जवळच्या लिम्बाखालुन जिव लाऊन बघतो. तू पण बघत जा." म्या बराबर 7 वाजता लींबाखाली हवा.
खाली यिउन फट्दिशी अवरले. आय, 'हेव दिन्याच्या घरी गेलता गच्चीवरुण कसा आला' ह्या विचारात तव्हर म्या लिंबाखाली. वान्याचा आशा तीथं हजरच. हेचा पण तिच्यावरच डोळा. हिकडं कसा विचारलं त् म्हणतु 'आलतू दर्शनाला.'पारस्या तोंडान् ह्याच्या आज्यानं दर्शन घेतलं हुतं?
ग्रामपंचायतच्या कोपऱ्यावर ति दिसली. चिट्ठित लिहिल्याप्रमाने, " तू गुलाबी डिरेस मदे झक्कास दिसतेस. एकदम गोड. रोज तेवच डिरेस घालत जा." ति गुलाबी डिरेस घालून आली. जवळुन जाताना ति चिट्ठितल्यावाणी बारीक हसली. कपटी आशा म्हनला 'तुह्या नाकाला लय पावडर लागलीय म्हणून हसली'. म्या त्याच्याकडं ध्यान दिलं नई. ति दर्शन घेऊन गेली. म्या नाक चोळत घरी आलू.
वर्गात तिना बरेचदा माह्याकडं पाहुन बारकं हसु फेकलं. चिट्ठीची जादू दुसरं काय. पर खड़ूस पोरं म्हणली तू आज इन केलिस मनून सगळेच हसताय. म्या फकस्त तिलाच हस्ताना पाइलं. सगळीच पोरं एकजात बावळट. सोम्या हुशार पर तेव आज वर्गात आला नव्हता. चिट्ठित लिव्हल्यावनी ति सांच्याला दुकानात गेली. म्या बी गेलु. म्या हळूच तिच्या हाताला शिवलु. ति मला एडपट मनली. म्या डोक्याला तान दिला तव्हां ध्यानात आलं, दुकानदार बघत हुता मनुन ति मला एडपट मनाली. मंग निवांत झोप लागली.
सातला पूनः लिंब गाठला. आशा तिथं माह्या आधि हजर. सोम्या पण. ति आली. चिट्ठित लिव्हल्यावनि आज बी गुलाबी डेरेस घालून. म्या लए खुललो. तिला बघुन सोम्यानं खिशातहात घातला अन एक कागदाचं लगदाळ माह्या हातात ठिवित मनला 'च्याला! त्या दिशी चिट्टी दयाला इसरलु. मयींन पैंट धुतालि हेव बघ सगळा लुगदा झाला.'
मह डोकं फिरलं. सोम्या गधड़ा. सगळ्या वर्गात सोम्या गधड़ा.
प्रतिक्रिया
1 Nov 2015 - 11:52 pm | रातराणी
लोल :)
2 Nov 2015 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे
=))
2 Nov 2015 - 1:22 am | बाबा योगिराज
ख्या ख्या ख्या.....
2 Nov 2015 - 7:51 am | जव्हेरगंज
:-D
मस्त!
2 Nov 2015 - 8:23 am | आनंदराव
झकास
2 Nov 2015 - 9:39 am | धोणी
लय भारी
2 Nov 2015 - 9:41 am | धोणी
लय भारी
2 Nov 2015 - 9:42 am | नूतन सावंत
लफडंच आहे.
2 Nov 2015 - 9:51 am | नाव आडनाव
:) लै भारी लिवलंय.
2 Nov 2015 - 10:00 am | पियुशा
हा हा हा जमलय जमलय :)
2 Nov 2015 - 10:13 am | नाखु
सगळा लुगदा !!!!
2 Nov 2015 - 10:13 am | नीलमोहर
शो श्वीट !!
2 Nov 2015 - 10:47 am | मुक्त विहारि
आवडली...
2 Nov 2015 - 11:33 am | बोका-ए-आझम
तुज्या पिरतीचा हा इंचू मला चावला...
2 Nov 2015 - 12:00 pm | एस
ठसका लागला शेवट वाचून हसताना!
2 Nov 2015 - 12:03 pm | आदूबाळ
एक नंबर लिहिलंय!
2 Nov 2015 - 1:48 pm | निलम बुचडे
लई भारी ः-))
2 Nov 2015 - 2:18 pm | जातवेद
पारस्या तोंडान् ह्याच्या आज्यानं दर्शन घेतलं हुतं? =))
2 Nov 2015 - 2:34 pm | पैसा
=))
2 Nov 2015 - 2:49 pm | प्यारे१
हाण्ण्ण!
2 Nov 2015 - 2:55 pm | बॅटमॅन
हाहाहा, एकच नंबर!!!!
2 Nov 2015 - 3:22 pm | टवाळ कार्टा
=))
2 Nov 2015 - 4:13 pm | तुषार काळभोर
भाषा पण, गोष्ट पण, 'ती'पण अन् सोम्या पण!
2 Nov 2015 - 4:43 pm | उगा काहितरीच
जब्राट !
2 Nov 2015 - 4:44 pm | जगप्रवासी
एक नंबर
2 Nov 2015 - 4:53 pm | चांदणे संदीप
लय भारी लफड!
2 Nov 2015 - 6:02 pm | प्रभाकर पेठकर
उत्कंठावर्धक लिखाणाला कलाटणी देणारा शेवट आवडला.
2 Nov 2015 - 6:37 pm | अभ्या..
खतरनाक. आवडले भौ.
2 Nov 2015 - 7:16 pm | नया है वह
.
2 Nov 2015 - 7:20 pm | अजया
`अर्रर्र!! लैच भारी !
2 Nov 2015 - 8:00 pm | अद्द्या
हाहाहाहाहाहा
लहान मुलांची मस्त गोष्ट
2 Nov 2015 - 8:31 pm | चाणक्य
मस्त
3 Nov 2015 - 1:08 pm | आनंद कांबीकर
....
3 Nov 2015 - 8:42 pm | स्वप्नज
मस्तच
4 Nov 2015 - 4:42 am | दत्ताभाऊ गोंदीकर
जाम आवडलं.....
4 Nov 2015 - 5:51 am | दीपा माने
सुरवात, मध्य, आणि शेवट छान जमलाय. लिहीत रहा.
5 Nov 2015 - 5:57 am | अभिजीत अवलिया
अर्रर ....
5 Nov 2015 - 10:28 am | सुमीत भातखंडे
भारीये लफडं
5 Nov 2015 - 3:25 pm | अन्या दातार
मस्तच. =))
6 Nov 2015 - 3:52 pm | भाऊंचे भाऊ
धाग्यावरील निर्मळ निखळ निरागस मनाच्या तमाम मिपाकरांच्या निखालस प्रतिक्रीया फारच वाचनीय.
6 Nov 2015 - 6:00 pm | बबन ताम्बे
लफडं मस्तच खुलवलय :-)
6 Nov 2015 - 6:18 pm | यशोधरा
मस्त! =))
24 Nov 2015 - 6:01 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
फ्यान्द्रि सरखा वाटाला
24 Nov 2015 - 6:09 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
मस्त !!
24 Nov 2015 - 6:23 pm | मृत्युन्जय
हाहाहा. मस्त. मजा आली वाचताना.
24 Nov 2015 - 9:22 pm | आनंद कांबीकर
'लफडं' अवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.