चिमुकल्या कविता...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
28 Oct 2015 - 2:44 pm

मराठीतला सर्वात छोटा, परिचित आणि सर्वाधिक लोकप्रिय काव्यप्रकार म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी तर एक संपूर्ण पिढी नादावली होती. ते काव्य अर्थात आवडलं होतं. पण त्याहून वेगळ्या काही कविताही आवडल्या आहेत.
प्रविण दवणे यांची बोन्साय ही अशीच एक कविता. म्हटलं तर आवडली, म्हटलं तर अजिबात आवडली नाही. ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा चौकट राजा या चित्रपटातले काही प्रसंग डोळ्यासमोर तरळले होते.

बोन्साय

चिमुकल्या झाडा,
तुला करीन आळं,
घालीन खत
देईन पाणी
एकच कर,
वाढू नकोस...

अशीच आवडलेली ही सुपरिचित रचना..

कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही...
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !!

लाखमोलाचं शहाणपण मोजक्या शब्दात देणाऱ्या, बहुतेक कोकणी भाषेतल्या म्हण स्वरूपातल्या एका उक्तीचा असाच कुठेसा वाचनात आलेला हा अनुवादही खूप आवडून गेला...

चुली चुली तू शंभरांचे शिजव
शंभरांचे अन्न हजारांना पुरो
चुलीपाठीमागे हंडाभर उरो

तारूण्यात पदार्पण करतानाच्या वयातल्या या ओळी अशाच समर्पक...

कुठून येतं फुलपाखरू
कुठे निघुन जातं
चिमटीत उरतो रंग तेव्हा
रंगात फूलपाखरू दिसतं
भिरभिरणारं कोवळं वय
हळूच तिथं फसतं
हे वयच असं असतं,
हे वयच असं असतं...

नखांना रंग लावणाऱ्या नखरेल मुलीवर भाळलेल्या कोणा एकाची ही आणखी एक छोटीशी रचना...

नखांना रंग लावणाऱ्या नखरेल मुली
आपल्याला बुवा आवडतात
आपल्या नखांची ऐट जाऊ नये,
म्हणून का असेना
त्या कोणाच्या स्वप्नांना
नख तरी लावत नाहीत.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

नखांना रंग लावणाऱ्या नखरेल मुली
आपल्याला बुवा आवडतात
आपल्या नखांची ऐट जाऊ नये,
म्हणून का असेना
त्या कोणाच्या स्वप्नांना
नख तरी लावत नाहीत.

अप्रतिम!

पद्मावति's picture

28 Oct 2015 - 3:20 pm | पद्मावति

अप्रतिम.

मित्रहो's picture

28 Oct 2015 - 6:36 pm | मित्रहो

तुम्ही खजिनाच उघडा केलाय

कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही...
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !!

एकदम पटले

माधुरी विनायक's picture

29 Oct 2015 - 12:10 pm | माधुरी विनायक

मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा...
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे

एका समंजस सावध क्षणी
माझ्या मनानं मला निर्वाणीचं बजावलं...
खरं म्हणजे खडसावलंच...
होणार नाही कोणी दिवा
मिळणार नाही उबदार हात,
तुझी तुलाच चालावी लागेल
पायाखालची एकाकी वाट...
मौज एकच...
हे त्यानं सांगितलं
आणि मलाही पटलं
तेव्हा वाट जवळजवळ संपली होती

या काही स्व-रचना. साधारण २००० -२००२ च्या काळात शुभेच्छापत्रांसाठी लिहिलेल्या...

असं का होतं???
आरशात मी पाहिलं तरी
प्रतिबिंब तुझं दिसतं
असं का होतं...

लोकं म्हणतात
आरशासारखा मित्र नाही
मी म्हणेन,
तुझ्या मैत्रीसारखा आरसा नाही

धागा आणि प्रतिसाद दोन्ही छान!

घर हे दोघांचं, दोघांनी सावरायचं
एकाने पसरलं तर दुस-याने आवरायचं.

माधुरी विनायक's picture

30 Oct 2015 - 11:38 am | माधुरी विनायक

विं. दा. करंदीकरांची ही कविता माझी विशेष आवडती...

"विठ्ठल"

पंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल..
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो, असेल 'विठ्ठल '

यावरुन मिपावर लै दंगा झालाय. लिंक द्या रे कुणीतरी.

चांदणे संदीप's picture

30 Oct 2015 - 1:37 pm | चांदणे संदीप
प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 1:41 pm | प्यारे१

हेच ते हेच ते!

माधुरी विनायक's picture

30 Oct 2015 - 2:36 pm | माधुरी विनायक

विठ्ठल... विठ्ठल...विठ्ठल... विठ्ठल...विठ्ठल... विठ्ठल...

प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 2:56 pm | प्यारे१

पांडुरंग पांडुरंग!

जातवेद's picture

30 Oct 2015 - 2:57 pm | जातवेद

वा. सुंदर!