रक्त पिपासू

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
27 Oct 2015 - 1:39 pm

१९६० - ६५ मधले नाशिक आठवले. आता तिथेच काय, पण इतर शहरात देखील बहुदा, ढेकूण औषधाला देखील सापडत नसावेत. चांगलेच आहे म्हणा! पण साधारण दोन वर्षापूर्वी अमेरिकेत देखील ढेकणाचा (गावाचे नाव आठवत नाही) सुळसुळाट झाल्याची बातमी वाचली होती.
म्हणजे काय, हे चिवट प्राणी कुठेना कुठे दबून रहात आपले रक्त शोषण करीत असतात.
त्यां बोचऱ्या आठवणीसाठी शांता शेळके ह्यांची क्षमा मागून, एका गोड गीताचे विडंबन देत आहे.

ही वाट दूर जाते .......

ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा
क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा
ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा

येथे पिळापिळात, ढेकूण साचलेले
शोषुनी रक्तभारे, ते टंच जाहलेले
एक नख लावताची, त्यांचा फुगा फुटावा
क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा
ही खाट खूप खाजे,

रंध्रात बैसलेले, मत्कूण ते पहावे
एकेक करुनी त्यांना, सारेच चीरडावे
निद्रातळ खोल, तो शांतसा मिळावा
क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा

ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा
क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा

vidambanकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Oct 2015 - 10:33 am | पैसा

हा कोणता रस म्हणावा?

द-बाहुबली's picture

28 Oct 2015 - 2:39 pm | द-बाहुबली

स्लमडॉग्गमिलेनीअर मधेल रिंग रिंग रिंगा अवश्य चाळावे असे सुचवतो.

अमृत's picture

28 Oct 2015 - 2:54 pm | अमृत

ही ही.... अहो पण ढेकूण चिरडायचे नसतात. त्यांना पाण्यात बुडवून मारावे लागते.

चांदणे संदीप's picture

29 Oct 2015 - 6:59 am | चांदणे संदीप

मस्त झालेय विडंबन!!