द गडू शेट द गडू शेट
भरले का हो तुमचे पेट?
तुम्ही म्हणे उडवून लावता
भल्या भल्यांचे जम्बो जेट?
इकडून सूड तिकडून अभ्या
बॅट्या टक्या किसन प्यारे
उचकायाचा मामिला
उगा का रे लावता नेट?
व्यासपीठ हे विरंगुळ्याचे
मामू , मामे, फरक काय?
पदर खोचून उभा/भी आहे
तुमच्या समोर मामि थेट.:)
काय सांगू कस्सं सांगू
खरं काय खोटं काय
कधी तरी कुठेतरी
कट्ट्यामध्ये होइल भेट.
( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
प्रतिक्रिया
27 Oct 2015 - 8:26 am | चांदणे संदीप
"व्यासपीठ हे विरंगुळ्याचे" यात विरंगुळ्याऐवजी "घरचे" का नाही लिहिलेत द मामि?
27 Oct 2015 - 8:32 am | सुमीत भातखंडे
आवडले :)
27 Oct 2015 - 8:34 am | प्रचेतस
अगागागागागा.
मेलो मेलो द-मामि. =))
27 Oct 2015 - 10:13 am | किसन शिंदे
कळलं का बे दगडू? पोट भरलं असेल तर आता शांत बस जरा.. उगा द-मामिंना छळू नकोस.
27 Oct 2015 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा
याचीच होती कमी
.
.
.
.
.
.
उरली सुरली The मामि! :-D
27 Oct 2015 - 9:52 am | नाखु
नानुडी-माईंना सदेह पाहू शकलो नाही किमान हा "अवतार" तरी दिसावा ही आकाशातल्या बाप्पाकडे आणि इथल्या "कट्टाप्पा"कडे प्रार्थना
नाखु एकलमार्गी
27 Oct 2015 - 10:09 am | कंजूस
आम्ही कसचे कवी वा शाहीर ।
आम्ही तर जेबिएलचे स्पिकर. ।।
शतकी यशस्वी कवने फुकाची ।
हाइ फाइ ती पोपटपंची ।।
टकळी आणि दमामि दुक्कल ।
जात होती हसत खिदळत ।
अध्यात्म-विज्ञान ऐकोनी ।
पुसतसे नादखुळ्यासी ।।
श्रवण कराया ती अनुभूती ।
सत्वर जाती माडीवरी ।
सुबोध अभिजात ती मराठी ।
मस्साला दुधाशी स्पर्धा करी ।।
जोवरी इथे प्रभाकर आणि विवेक ।
यनावाला दिवाकर आणि अरुण ।
हिमालय वा चित्रकूट ।
चिंता कशाची ।।
निश्चय करीती मनाशी ।
विडंबनाची करू ऐशितैशी
सूड सोडूनी मुळामुठेशी ।
होऊ आता मुक्तविहारि ।।
27 Oct 2015 - 4:01 pm | दमामि
वा!:)
27 Oct 2015 - 11:07 am | रामदास
एक स्पेशल दमामी -ग्रेट भेट कट्टा आयोजीत करा बॉ.ज्याम उत्सुकता लागून राह्यली आहे.
27 Oct 2015 - 11:22 am | दमामि
नमस्कार सर! मिपावरच्या माझ्या अत्यंत आवडत्या साहित्यात आपला अग्रक्रम आहे.
दंडवत स्विकारावा!__/\__
27 Oct 2015 - 12:40 pm | टवाळ कार्टा
खि खि खि
ख्या ख्या ख्या
खु खु खु
आव्ल्डी ;)
27 Oct 2015 - 1:46 pm | अरुण मनोहर
पदर खोचून उभा आहे?
काय म्हणताय?
27 Oct 2015 - 1:48 pm | प्यारे१
एक डाव धोबीपछाड मधला सुबोध भावे आठवला. ;)
27 Oct 2015 - 4:50 pm | अस्वस्थामा
हा हा हा..
पर्त्येक्श मूर्ती समोर आली.. दमामिशासहीत.. ;)
27 Oct 2015 - 5:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दक्षिणेकडचे लोक्स =))
27 Oct 2015 - 5:24 pm | सूड
दक्षिणेकडचे मराठी लोक्स मेल्या....
तुजो शर्ट...तुजो प्यांट!! =))
27 Oct 2015 - 2:29 pm | सूड
तुजला मिपा दिधलेसे आंदण। विजयाजया घालिति पांघरुण॥
सुज्ञें जावें समजून। गौडबंगाल यामाजिं॥
27 Oct 2015 - 3:15 pm | बॅटमॅन
प्राणपणे पाडिले पीठ | चीत केले जनां अचाट |
अश्विनीकुमार जणो चोखाट | ही काय बला ||
चहूकडे मारिता तोंड | दमावे, मोडिता खोड |
मी मी म्हणिता वाड | आहे कशी बला ||
अनायासे आले कळोन | ही काय बला म्हणोन |
तारिखेवारी लागण | दुरुस्तपणे पाहिली ||
टप्पि टप्पी किती टप्पी | आखंड मारिल्या उड्या |
हे दिसे लक्षणीं मूळ | तसे कन्फर्म जाहले ||
मिपाते दिधल्या आंदणी | तेथेही सुज्ञजनांनी |
येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ||
27 Oct 2015 - 3:42 pm | बबन ताम्बे
पण यात "विजापूरचा सरदार निघाला आहे" टाईप लपलेला मेसेज मी शोधत होतो. तसा काही आहे का? :-)
27 Oct 2015 - 3:47 pm | बॅटमॅन
हम्म्म्म काञ की बा. ;)
27 Oct 2015 - 3:50 pm | दमामि
क्या बात!
आवडेश!:)
27 Oct 2015 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
हशा आणि टाळ्या =)) =))
27 Oct 2015 - 6:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हाह!! खाटुकम्यान पेटेश =))
27 Oct 2015 - 3:29 pm | सस्नेह
अजून हव्यास मिटलेला नाही तर......!!
27 Oct 2015 - 3:49 pm | टवाळ कार्टा
म्हणजे तुम्हाला आधीपासून माहीत आहे तर ;)
27 Oct 2015 - 3:55 pm | दमामि
+1111
27 Oct 2015 - 3:55 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट !
हेच विचारयला आलो होतो .
27 Oct 2015 - 4:26 pm | सस्नेह
तो तुमचा भ्रम आहे....अत्मकुंथन !! =))
27 Oct 2015 - 5:25 pm | टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ
27 Oct 2015 - 3:56 pm | प्यारे१
हव्यास म्हणजे काय ओ तै?
27 Oct 2015 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
27 Oct 2015 - 7:02 pm | जव्हेरगंज
:-D
27 Oct 2015 - 7:40 pm | पैसा
आधी सांगून ठेवा. म्हणजे मी पण भेटायला येते!
28 Oct 2015 - 8:54 am | नाखु
भेट कार्यक्रमात पार्श्वसंगीतात खालील गाणे लावण्यात येईल.
जीवा लागली आस