साहेब साहेबच आहेत. साहेब असे तसे नाहीत. साहेब म्हणजे साखरेचा लाडू. साहेब म्हणजे बर्फाचा गोळा. साहेबांचे धिप्पाड व्यक्तिमत्व, साहेबांचा बाणेदारपणा, साहेबांचा दरारा, साहेबांचा आवाज. साहेबांचे येणे. साहेबांचे जाने. सामान्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकने. हात उंचावणे. हातजोड़ने. चार लोकांत कार्यकर्त्यांना नावानीशि ओलखने. दरवर्षी गावच्या मंदिराला भेट देने. साहेब एक नंबर आहेत. साहेब म्हणजे फ़क्त साहेब, साहेबांना तोड़ नाही. ऐतेहासिक पुरुषांचे अंगावर काटे उभे करणारे प्रसंग ऐकावेत तर फ़क्त साहेबांच्या तोंडुन. ते रक्ताला सळसळायाला लावतात, मरगळलेल्या जनतेत स्वाभिमान भरतात. धर्म रक्षणासाठी हातात काठी घ्यायला शिकवणारे तसेच आपल्या जातीवर कसा अन्याय झाला याचा शोध लावणारे साहेबच. जातीचे अस्तित्व मिटू नये म्हणून अहोरात्र झटनारे साहेबच यायला हवेत. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. तेच आपले कैवारी. मागच्या वेळी ते काही करू शकले नाही याची त्यांना खंत आहे पण यावेळी त्यांनी चंग बांधलाय. तसे ते विराट सभेत बोलले ही "या वेळेस प्राण गेला तरी हरकत नाही पण आपल्या समाजासाठी ठोस असे काहीतरी करणार" हे 'ठोस' म्हणजे काय हे जरी ते सध्या सांगू शकले नसले तरी ते 'ठोस' होणारच. साहेब बोलले म्हणजे होणारच. कमानी, पुतळे पाहिले की हुरुप येतो. आणि एकदा हुरूप चढला की तरुण काहीही करू शकतो. म्हणूनच साहेबांनी आपल्यासाठी शाळा, कॉलेज काढण्याऐवजी कमानी, पुतळे बांधन्याचा निर्णय घेतला आहे. साहेब म्हणतात "शिकु त् आजकाल कुनिबी ऱ्हायलैं अण त्यासाठी आरक्षण बी हाय." साहेबांच्या मते माणूस पोटासाठी शिकतो म्हणजे खान्यासाठी. म्हणून ते म्हणतात स्वाभिमानी व्हा. ताडकन तुटलात तरी चालेल पण लचकायचं नाही हा साहेबांचा नारा. साहेब बी तसेच वागतात. हा अता तुम्ही म्हणाल की साहेब त्यांच्या साहेबांपुढे तर ते आपल्यासाठीच असते. साहेब तिथे झुकले नाहीतर मंत्री कसे होणार? आणि मंत्री झाले नाहीत तर आपल्यासाठी 'ठोस' कसे होणार.
तर पावसाचा अंदाज घेत घरात बसु नका. पाऊस येणार नाही. साहेबांनी भरपूर गाड्या दिल्या आहेत कुठल्याही गाड़ीला लटका. साहेबांचा मोबाईल वर बोलतानाचा फोटो छान आलाय तो जिकडे तिकडे लावा. छोटे साहेब तयार आहेत माल घेऊन काटा बकरे. शेवटी ज्याचे जास्त कटतील तोच निवडून येणार.
प्रतिक्रिया
25 Oct 2015 - 12:53 am | एस
हे कशाचे विडंबन आहे हे समजावल्यास बरे होईल.
25 Oct 2015 - 9:50 am | आनंद कांबीकर
....