चेहर्यावर टवटवी नाही
वाटते,माझी छवी नाही
दूरवर नुसतेच रण आहे
माणसांना पालवी नाही
बालकांचे अर्भकांचेही
हास्य आता लाघवी नाही
हाक देवाला नका मारु
भाव त्याचा वाजवी नाही
तू कधी येशील तेव्हा ये
ही प्रतिक्षाही नवी नाही
हा कुणाचा चेहरा आहे
आज काही चौदवी नाही
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
13 Oct 2015 - 10:07 pm | चांदणे संदीप
गजल मस्त!
आवडल्या गेली आहे!
(दोन्ही थंब्स वर)
14 Oct 2015 - 8:13 am | drsunilahirrao
आभार संदीपजी !
13 Oct 2015 - 10:44 pm | एकजटा अघोरी
+१११
14 Oct 2015 - 8:12 am | drsunilahirrao
खूप खूप धन्यवाद.
13 Oct 2015 - 11:08 pm | पैसा
कविता आवडली. ही गझल आहे का?
14 Oct 2015 - 8:10 am | drsunilahirrao
हो, ही गझल आहे. खूप खूप आभार.
13 Oct 2015 - 11:28 pm | मांत्रिक
मस्त!!!
14 Oct 2015 - 8:17 am | drsunilahirrao
खूप खूप आभार मांत्रिकजी!
14 Oct 2015 - 8:33 am | सौन्दर्य
छान लिहिली आहे. अगदी वस्तुस्थिती आहे.
14 Oct 2015 - 1:23 pm | drsunilahirrao
धन्यवाद सौंदर्य!
14 Oct 2015 - 9:55 am | मदनबाण
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
14 Oct 2015 - 1:37 pm | drsunilahirrao
खूप खूप आभार !
14 Oct 2015 - 1:43 pm | एस
डॉक्टरसाहेब, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन आभार मानण्यापेक्षा एकच प्रतिसाद लिहून त्यात सर्वच वाचकांचे व प्रतिसादकांचे एकत्रितच आभार मानले तर ते जास्त योग्य वाटते. तसा नियम नाहीये, पण आंतरजालावरील एक संकेत आहे असे म्हणणे योग्य ठरेल.
बाकी कविता छान आहे.
14 Oct 2015 - 3:35 pm | वेल्लाभट
क्लास! मस्त जमलीय.
वैयक्तिक मला मराठी रचनेत हिंदी/उर्दू शब्द रुचत नाहीत त्यामुळे छवी, चौदवी... सोडून बाकी ग़ज़ल छान
14 Oct 2015 - 8:48 pm | शिव कन्या
हेच नि असेच म्हणायचेय.
15 Oct 2015 - 10:49 am | drsunilahirrao
@एस, आपल्या सुचनेचे मनापासून स्वागत आहे :) धन्यवाद
वेल्लभट जी, छवी हा शब्द मराठीत बर्यापैकी प्रस्थापित आहे.मात्र चौदवी हा शब्द नक्कीच खटकणारा वाटू शकतो. खूप खूप धन्यवाद.
शिव कन्या, आभार !
15 Oct 2015 - 11:43 am | वेल्लाभट
छवी नाही; पण छबी ऐकलाय मी मराठीत. असो.