ये कैसी अजब दास्ता हो गयी है

संदीप ताम्हनकर's picture
संदीप ताम्हनकर in जनातलं, मनातलं
8 Oct 2015 - 1:31 pm

सुरय्या जमाल शेख ने 'ये कैसी अजब दास्ता हो गयी है' हे गाणं गायलं आणि त्यावर अभिनय केला तेव्हा ती साधारण 34 वर्षांची होती. 'रुस्तुम आणि सोहराब' (रुस्तुम ऐ सोहराब - 1963) ही तिच्यासाठी आजच्या भाषेत कमबॅक फिल्म होती. नायक पृथ्वीराज कपूर आणि प्रेमनाथ असे बुलंद नट होते. अजून एक माहिती म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक 'विश्राम बेडेकर' होते.

हिंदी सिनेमामध्ये अनेक सुंदर चेहऱ्याच्या नट्या झाल्या, अनेक अभिनय संपन्न नट्या झाल्या, अनेक सुरेल गायिका झाल्या पण या तिन्हीचा सुवर्ण संगम म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे गाणं आवर्जून बघा. नटीच्या चेहऱ्याचा एवढा टाइट क्लोज-अप लावून केवळ डोळ्यांनी केलेली एक्सप्रेशन्स, अतिशय बोलके डोळे आणि अभिनय याला आज पर्यंत तरी दुसरी जोड नाही. गाण्याचे टेकिंग अप्रतिम. एवढ्या ताकदीने काळजात घुसणारं दुसरं गाणं नाही, सुरय्याला तोड नाही.

महान रुस्तुम झाबूली आणि राजकन्या तहमिना यांची पहिली भेट होते तेव्हा ताकदवान आणि बुलुंद देहयष्टीचा रुस्तुम राजकन्येच्या वाटेत पडलेलं झाड लीलया उचलून बाजूला करतो. सैन्यातील नोकरीची ऑफर धुडकावून आणि नंतर बक्षीस म्हणून दिलेली सोन्याची मोहोर केवळ दोन बोटात अंगठ्याने दाबून वाकवून परत राजकन्येच्या अंगावर फेकून रुस्तुम आपल्याच मस्तीत निघून जातो. राजकन्या त्याच्यावर भाळते, रुस्तुमला आपल्या राजमहालात आणण्यासाठी सेवकांकरवी त्याचा प्रिय घोडा पळवून आणते.

घोड्याच्या शोधत महान रुस्तुम पर्शियाच्या कैकावूस राजाच्या दरबारात येतो. त्याला शांत करून आगत स्वागत करून महालात विश्रांतीसाठी पाठवले जाते. तेव्हा राजकन्या तहमिना दासीच्या वेशात आपला चेहरा घुंगटने झाकून, हार्प वाद्य छेडत आपल्या भावना या गाण्यातून व्यक्त करते. केवळ स्वर्गीय अनुभव. आपणही जरूर पहा. गाण्याचे टेकिंग, शब्द, संगीत इत्यादी गोष्टी अप्रतिम आहेतच. त्यावर लिहिण्यापेक्षा अनुभवाच कसे.

https://www.youtube.com/watch?v=97otjre1psI

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

भैड्या's picture

8 Oct 2015 - 9:15 pm | भैड्या

भकास ,

अजिंक्य विश्वास's picture

8 Oct 2015 - 9:31 pm | अजिंक्य विश्वास

माझे आवडते गाणे आहे. सज्जादची जी काही गाणी आली त्यातले हे एक आवडते. दुसरे ये हवा, ये रात, ये चांदनी , आणि नूरजहानचे बदनाम मुहोब्बत कौन करे ही आहेत. बाकी माजंदरा माजंदरा हे सुद्धा छान आहे.

पैसा's picture

8 Oct 2015 - 10:14 pm | पैसा

सुरैय्याची काही काही गाणी आवडतात. हे त्यातलं एक आहे. मात्र ती स्क्रीनवर फार कधी आवडली नाही.

पद्मावति's picture

9 Oct 2015 - 1:31 am | पद्मावति

सुरैय्या या गाण्यात खरोखरंच सुरेख दिसतेय. अत्यंत बोलके, सुंदर डोळे.
धन्यवाद हे गाणं शेअर केल्याबद्दल.
अवांतर- सुरैय्या आणि देवआनंदची ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी एकेकाळी गाजली होती.

नंदन's picture

9 Oct 2015 - 12:59 pm | नंदन

लेख आवडला. हे गाणं ऐकायला अतिशय आवडतं.