आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल
लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
प्रतिक्रिया
2 Oct 2015 - 11:08 am | पद्मावति
विनम्र अभिवादन.
2 Oct 2015 - 12:14 pm | गामा पैलवान
मनरंग,
शास्त्रीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है?' असा उर्मट प्रश्न अयुबखानाने १९६५ साली विचारला होता. शास्त्रीजींनी शांतपणे जाहीर केलं की भारतीय सैन्य पाकिस्तानी पंजाबमध्ये शिरेल. आणि अगदी तसंच झालं. असं सडेतोड उत्तर देणाऱ्या शास्त्रीजींची बटुमूर्ती आजही प्रेरणादायक आहे.
जय जवान जय किसान ही घोषणाही त्यांचीच. स्मृती जागवल्याबद्दल आभार. :-)
आ.न.,
-गा.पै.
2 Oct 2015 - 8:56 pm | रमेश आठवले
१९६५ च्या युद्धात पाकिस्तान ने काश्मीर हद्दीवर आपला फौज फाटा एकत्र केला होता आणि भारत फक्त तेथेच त्यांच्याशी लढेल असा त्यांचा अंदाज होता. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत लढेल असे त्यांना वाटले नाही. इतर देशांचाही तसाच तर्क होता. त्यांना ही असे वाटत होते की काश्मीरच्या वादग्रस्त भागातच हे युद्ध मर्यादित राहील. भारतीय फौजांनी, काशीर मधील पाकिस्तानी दबाव कमी करण्या साठी, आंतरराष्ट्री सीमा ओलांडल्यावर तत्कालीन ब्रिटीश पन्तप्रधान हरोल्ड विल्सन यांनी शास्त्री याना पत्र लिहून तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा का ओलांडली असा प्रश्न विचारला. त्या वर शास्त्री यांनी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जनरल ना विचारा असे लिहून कळवले होते .
2 Oct 2015 - 12:16 pm | प्यारे१
शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
आणखी एका थोर नेत्याला आज जनता विसरलेली दिसतेय. त्यांनाही विनम्र अभिवादन.
2 Oct 2015 - 12:33 pm | आनन्दा
+१.. हा धागा जर धागाकर्त्याने दोघांच्याही स्मृतीसाठी काढला असता तर जास्त आनंद झाला असता.
दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन.
2 Oct 2015 - 12:54 pm | _मनश्री_
२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती हे सहसा कुणी विसरत नाही ,
सगळ्या देशात गांधी जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते
पण ' लाल बहादूर शास्त्रीं ' ह्यांना बरेचदा विसरतात लोक म्हणून हा धागा
(
2 Oct 2015 - 12:38 pm | नाखु
अभिवादन. सरकारी पातळीवर कायम उपेक्षा आणि अनुल्लेख आलेल्या ह्या महामानवाला सलाम.
2 Oct 2015 - 5:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख अन उपेक्षा मी तरी म्हणाणार नाही नाखु साहेब कारण असे असता जागतिक स्तरावर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन (लोक प्रशासन) ह्या विषयाला वाहिलेल्या अत्युच्च प्रोफेशनल संस्थांपैकी एक अन भारतात आईएस सारख्या अतिशय उच्च बौद्धिक अन नेतृत्व गुण असलेल्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग साठी जी संस्था आहे तिचे नाव
"लाल बहादुर शास्त्री नॅशनल एडमिनिस्ट्रेशन अकादमी" उर्फ़ लबस्ना ठेवले गेले नसते, नाही का?
3 Oct 2015 - 1:53 pm | नाखु
पण एकूणात त्यांचे पेक्षा (लाल बहादुर शास्त्री) वकूबात आणि योअगदानात कमी असलेल्या लोकांना जास्त झुकते माप दिले गेले. नेहरूत्तर काळात. अर्थात जो पक्ष स्वतःच्या जुन्या पक्शाध्यक्षांना आणि प्रगतीशील पंप्रं(पी व्ही) ना अनुल्लेखत असेल त्यांच्या करीता हा राजकीय लाभ शून्य नेता काय कामाचा??
तरीही आपल्या मताचा आदर आहेच.
नाखु
"जय जवान जय किसान"
3 Oct 2015 - 10:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
तुमचा प्रतिवाद तितकाच तार्किक आहे बॉस! _/\_
2 Oct 2015 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
2 Oct 2015 - 5:50 pm | dadadarekar
अभिवादन
2 Oct 2015 - 10:08 pm | द-बाहुबली
सकाळपासुन फक्त 281 वाचने अन १० प्रतिसाद ...?
लाज वाटली, पण आज नथ्थुचा उदो उदो न झा(के)ल्याबद्दल बरेही वाटले.
2 Oct 2015 - 10:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सॉरी टु डिसपॉईंट यु सर.
लाल बहादुर शास्त्रींना अभिवादन आणि नथुराम गोडसेंना हि विनम्र अभिवादन. धन्यवाद.
वाद घालणार्यांसाठी पौड फाट्यावर ड्रॉप बॉक्स ठेवलेला आहे त्याचा सुयोग्य वापर करावा.
2 Oct 2015 - 10:57 pm | द-बाहुबली
यु डिसअपाँइंटेड धिस कंट्री बाय इग्नोरींग शास्त्रीजी... अँड यु डिसअपाँइंटेड मदर अर्थ बाय नॉट इग्नोरींग नथ्थु.
2 Oct 2015 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असो.
3 Oct 2015 - 6:31 am | dadadarekar
२ ऑक्टो. आशा पारेखचा बर्थडे विसरल्याबद्दल सर्वांचा निषेध.
3 Oct 2015 - 6:59 am | chetanlakhs
नमो शास्त्रीन्च्या स्मृतिस्थलावर न गेल्याबद्दल लोकमत ने लगेच बातमी केली..शेवटी नमोना FB वर post करावे लागले..मार्क कामी आला योग्य वेळी
3 Oct 2015 - 8:24 pm | रमेश आठवले
फेसबुक वरची मोदींची टिपणी पाहू शकलो नाहि. शास्त्री यांच्या सारख्या एकूण किती पन्तप्रधान व राष्ट्रपती यांच्या समाध्या दिल्लीत आहेत व त्यांच्या त्यांच्या पुण्यतिथीला वर्तमान पंत प्रधानांनी जायला पाहिजे याची माहिती कोणी देऊ शकेल काय ? ही एक पायंडा निर्माण करण्याची बाब आहे.
महात्मा गांधींची गोष्ट वेगळी आहे.
3 Oct 2015 - 8:34 pm | श्रीगुरुजी
मोदींनी गतवर्षी पंतप्रधान झाल्यापासून एक नवीन पायंडा पाडलेला आहे. यापुढे केंद्र सरकारतर्फे अधिकृतरित्या फक्त गांधीजी व सरदार पटेल यांच्याच जयंती/पुण्यतिथीला सरकारी सोहळा होईल. इतर कोणत्याही नेत्याच्या, माजी पंतप्रधानांच्या साठी अधिकृत सोहळा होणार नाही. त्यामुळेच मोदींनी अधिकृतरित्या शास्त्रींच्या स्मृतिस्थानाला भेट दिलेली नाही.
4 Oct 2015 - 8:57 am | dadadarekar
काँग्रेसमुक्त भारत करणार म्हणून कोकलणार्याना जयंती साजरी करायला दोनच व्यक्ती सापडल्या... त्याही काँग्रेसच्याच !
4 Oct 2015 - 9:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
उदात्त दृष्टी म्हणतात. एक गोष्ट सांगा हो द रेकर. नै म्हणजे ज्या पक्षात व्यक्तीचाटुगिरी अगदी रोमारोमात भरली आहे त्या पक्षाची तुम्ही भलावण कशी काय करता हो? ते जाउ दे एक साधी गोष्ट सांगा ना. ज्या योजनेमधे मलई असते त्या योजनेला गांधी परिवाराची नावं आणि जिथे प्रत्यक्ष कामाची वेळ येते तिथे दुसर्या लोक्सची नावं असं का हो? उदा: राजीव गांधी अमुक तमुक योजना.
आणि जिथे हागणदारीशी/ कचर्याशी संबंध आहे तिथे बरे गाडगेबाबा आठवतात? तिथे अमुक तमुक गांधी हादामुक्त योजना असं नावं दिल्याचं माझ्या माहितीमधे तर नाही. असेल योजना अशी तर सांगा, शब्द मागे घेइन.
4 Oct 2015 - 1:27 pm | गामा पैलवान
दादा दरेकर,
तुम्ही म्हणताय ती काँग्रेस केव्हाच इतिहासजमा झालीये. पूर्वी जिला इंदिराकाँग्रेस म्हणायचे तिचा सांप्रत अवतार समाप्त करायचे कार्य मोदींनी अंगावर घेतले आहे.
तस्मात जागे व्हा.
आ.न.,
-गा.पै.