निरोप दे आता
या आधी मी मला आवडलेल्या काही इंग्लिश कवितांच्या/ गीतांच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न केले होते. (Desiderata, First things first, The Last Thing on my Mind, The cab ride I will never forget, I give you the morning)
आज इटालियन कवि Umberto Saba यांची एक कविता सापडली (खरं तर त्याचा इंग्लिश भावार्थ वाचायला मिळाला, मला इटालियन येत नाही!) कविता आवडली म्हणून मराठीत रुपांतराचा प्रयत्न करावासा वाटला तो खाली देतोय. कविता छोटीशीच आहे, पण अखेरच्या ओळीतली आर्तता खूप भावली (ती मला शब्दांत पकडता आली नसली तरी).
त्या निष्पर्ण वृक्षावरील पान पहा एकुलतं आयुष्य संपलंय, पण अजून आहे डुलतं मीही तसाच, पण विसर मला, निरोप दे आता नको बालिश बडबड, ना वयाची चिंता सांगायला नको, पण मरणभयाचं कसलं रडू? जगणं सहज सोडेन मी, तुला कसं सोडू?
त्या निष्पर्ण वृक्षावरील पान पहा एकुलतं आयुष्य संपलंय, पण अजून आहे डुलतं मीही तसाच, पण विसर मला, निरोप दे आता नको बालिश बडबड, ना वयाची चिंता सांगायला नको, पण मरणभयाचं कसलं रडू? जगणं सहज सोडेन मी, तुला कसं सोडू?
मूळ इटालियन काव्य खाली आहे (इथे नक्कीच कुणीतरी इटालियन जाणणारे वाचक असतील, कृपया भावानुवादात काही चुकलं असेल तर नक्की सांगा) :
Io sono come quella foglia - guarda -
sul nudo ramo, che un prodigio ancora
tiene attaccata.
Negami dunque. Non ne sia rattristata
la bella età che a un'ansia ti colora,
e per me a slanci infantili s'attarda.
Dimmi tu addio, se a me dirlo non riesce.
Morire è nulla; perderti è difficile.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
इटालियन समजो न समजो...
विषेश भावली नाही.
अत्यंत परिणामकारक. शेवटची ओळ
अहाहा, अप्रतिम, सुंदर.
वाह !!
सुंदर!
मस्तच!
नाईस
काही इंग्लिश भाषांतरे
छान
सुंदर. मूळ कवितेतलं जेवढं
इटालियन कळत नाही. पण तुम्ही