नका घेऊ गळफास
किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!
जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!
छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!
हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 7:22 pm | विवेकपटाईत
कविता आवडली
26 Sep 2015 - 7:30 pm | शैलेन्द्र
गंगाधरजी, कविता अन दृष्टिकोण दोन्ही आवडले.
26 Sep 2015 - 8:01 pm | दिवाकर कुलकर्णी
हे चित्र पहा ते चित्र पहा
सातव्या आयोगाचा येऊ लागला रिपोट
बाबूच्या तनख्यामधी वाढ होणार तिप्पट
कांदा झाला महग त्याना कसा परवडावा
राजा बली अन् मग भिकेका न लागावा ? एक भुक्तक !!
26 Sep 2015 - 8:38 pm | निनाव
Mute Sir, tumchi pratyek rachana khoop kaahi sangoon jaate. Hey suddha kiti chhan lihile aahe...
13 Oct 2015 - 10:38 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!