नक्षत्राचं देणं..(शतशब्द कथा ) २.०

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
23 Sep 2015 - 10:56 am

भाग १.० http://www.misalpav.com/node/32359
================================================================================
चालु पंधरवाड्यात पाऊसकाळ चांगलाच झालता.शिवारात वितभर उंचीच पिक डोलत होत.
विठ्या आणी त्याची बायका पोर शेतातल्या कामात बुडून गेलते.
दिस मावळतीला झुकताना विठ्या तात्याला म्हणाला,"तात्या हे नक्षत्र चांगलच बरसल की रे!."
तात्या त्याच्याकड पहात म्हणाला,"पोरा आभाळातील नक्षत्र येतील अन जातील,बरसतील अगर नाही,ती त्यांची मर्जी हाय,
पर हि जी माणस हायतन..",
विठ्याच्या बायकोपोराकड बोट दाखवत म्हणाला,"हि माणस बी नक्षत्रासारखीच हायती,अन ह्या नक्षत्रांच देण या जल्मी तरी
फेडता यायच नाही.त्यांच्यासाठि तरी आभाळातील नक्षत्राची पर्वा आपल्याला उभ राहयला पाहिजे,अन जमेल तेवढ यांच देण
फेडल पायज."
विठ्या क्षणभर थांबला अन तात्याकडे पाहुन हसला.
त्याला नक्षत्राचा नवा अर्थ समजला होता.

(समाप्त)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

खेडूत's picture

23 Sep 2015 - 11:17 am | खेडूत

आशय मस्त आहे - ( @जेपी :आगाऊपणे रिपेर करण्याचा प्रयत्न केलाय !)

***

चालु पंधरवड्यात पाऊसकाळ चांगलाच झालता.शिवारात वितभर उंचीच पिक डोलत होतं .
विठ्या आणी त्याची बायकोपोरं शेतातल्या कामात बुडून गेलते.
दिस मावळतीला झुकताना विठ्या तात्याला म्हणाला,

"तात्या हे नक्षत्र चांगलच बरसल की रं !."
तात्या म्हणाला,"पोरा आभाळातील नक्षत्र येतील अन जातील,बरसतील अगर नाही,ती त्यांची मर्जी हाय, पर ही जी मानसं हायतनं .."

विठ्याच्या बायकोपोराकड बोट दाखवत म्हणाला,"ही मानसंबी नक्षत्रासारखीच हायती,अन ह्या नक्षत्रांच देणं जलमभर फेडता यायच नाही.त्यांच्यासाठी तरी आभाळातील नक्षत्राची पर्वा न करता आपल्याला उभं राहयला पाहिजे,अन जमेल तेवढ यांच देणं फेडलं पायजे ."
विठ्या क्षणभर थांबला अन तात्याकडे बगून हसला.
त्याला नक्षत्राचा नवा अर्थ समजला होता !

धन्यवाद खेडुत साहेब.प्रकाशित करता काहीतरी गडबड झाली वाटत.
पुन्हा एकदा आभारि आहे.

dadadarekar's picture

23 Sep 2015 - 11:30 am | dadadarekar

छान

प्रचेतस's picture

23 Sep 2015 - 1:13 pm | प्रचेतस

झकास रे जेपी.

मांत्रिक's picture

23 Sep 2015 - 1:18 pm | मांत्रिक

मस्त, हलकी फुलकी...

पद्मावति's picture

23 Sep 2015 - 1:42 pm | पद्मावति

खूपच सुंदर. नक्षत्राचा खरा अर्थ भावला.

DEADPOOL's picture

25 Nov 2015 - 9:37 pm | DEADPOOL

मस्त लिहिलय!