माझा मित्र सौरभ धडफळे याच्या विनंतीवरून हे प्रकाशित करत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात माझा किंवा मिसळपाव व्यवस्थापनाचा सहभाग नाही. त्यामुळे काही प्रश्न असतील तर थेट खाली दिलेल्या संयोजकांशी संपर्क साधावा. मागे एकदा छायाविष्कार पाहिलं होतं तेव्हा आवडलं होतं. मिपावरच्या छायाचित्र स्पर्धा गाजवणाऱ्या दिग्गजांनी छायाविष्कारातही मिपाचा झेंडा फडकावावा ही एक वैयक्तिक विनंती.
'छायाविष्कार' चे तिसऱ्या वर्षात दिमाखात पदार्पण !
पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती 'श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे' आयोजित करण्यात येणारी छायाचित्रण स्पर्धा व प्रदर्शन यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. छायाचित्रणामध्ये नैपुण्य मिळवलेल्या, या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या, तसेच छायाचित्रण ही कला छंद म्हणून जोपासणाऱ्यांना समॊर ठेवून मंडळाने सन २०१३ मध्ये या स्पर्धेची सुरवात केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून असा उपक्रम करणारे श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ हे एकमेव आहे.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वैभवशाली इतिहास बघता स्पर्धेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव हा विषय कायमस्वरूपी ठेवून, तसेच पुणे शहराशी निगडीत आणि सामाजिक संदेश देणारे विषय 'छायाविष्कार' च्या माध्यमातून मागील दोन वर्षात मांडण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीही 'सार्वजनिक गणेशोत्सव' व्यतिरिक्त 'पुण्यातील वाहतूक', 'वाईल्डलाईफ', 'स्कूल चले हम' हे विषय निवडून मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आहे.
या स्पर्धेच्या नोंदणीला सुरवात झाली असून नोंदणी २७ सप्टेंबर २०१५ पर्यंत चालू राहणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोबर असून या बाबतची अधिक माहिती व नोंदणीमंडळाच्या वेबसाईट (shreetambadijogeshwari.org) वर उपलब्ध आहे.या स्पर्धेसाठी परिक्षण प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. कुमार गोखले श्री. सौमित्र इनामदार ( photographers @ Pune संस्थेचे संचालक), आणि श्री. चैतन्य खिरे करणार आहेत.'छायाविष्कार' साठी आलेल्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन दि.१७,१८,१९ ऑक्टोबर २०१५ रोजी बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. चारुहास पंडित यांचे हस्ते होणार असून दि. १८ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा निकाल व पुरस्कार वितरण प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सतीश पाकणीकर यांचे हस्ते होणार आहे.
या स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी विनायक सामक ९९२३७९५०२१ आणि हृषीकेश ठाकूर ९०७५४२५२०७ यांच्याशी संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
20 Sep 2015 - 2:10 pm | बाबा योगिराज
स्पर्धेचा फ़क्त अस्वाद घ्यायचा असेल तर काय करावे लागेल?
या चांगल्या उपक्रमाबद्दल आम्हा बहेरगावच्या मिपाकरांसाठी एक विस्तृत लेख येऊ दया ही विनंती....
20 Sep 2015 - 6:32 pm | आदूबाळ
हाच प्रश्न मलाही आहे. मी फक्त मित्राकडून आलेला संदेश मिपा-छायाचित्रकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धागा काढला.