'देवा मी काही चुकलो असेल तर मला माफ कर,' असे राजू परमेश्वरा कडे रोज प्रार्थना करीत पण परमेश्वर काही त्याला पावत नव्हता.
आज त्याचे शिक्षण पुर्ण झाले असले तरी तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता , राजू लहान असतानाच त्याचे वडील मरण पावले ,मग त्याची आई बाहेर घरची कामे करून त्याला व दिपा ला लहानाचे मोठे केले व शाळा शिकवले.
पण आता त्याची आई थकलेले होती , घर चालण्यास पुरेसे पैसे मिळत नव्हते , लवकरच दिपा च लग्न करायचे होते, आशा अनेक समस्यांशी तो लढत होता.पण त्याला जाॅब मिळत नव्हता , तो या अपयशाने खचून जात होता, शेवटी तो परमेश्वरा ला दोष देत. कधी कधी त्याला रात्री झोप येत नसे, अनेक वाईट स्वप्ने पडत.
एक दिवस त्याच्यी आई त्याला सोडुन गेली त्या वेळी मात्र त्याला सर्व संकटे स्वतःवर कोसळले आसे झाले, मग तो काहीच दिवसांनी सायंकाळी स्मशानभूमीत गेला , रडत रडत तो आपली व्यथा एकटाच सांगून बडबडू लागला.
अचानक आकाशात एक विज चमकते व तो घाबरतो. काही क्षणात आकाशातून एक आवाज कानावर पडतो,
' हे पृथ्वी वासी आपली जी काही दुःखे आहेत ती एका कागदावर लिहुन ती गावातील मंदिरात ठेवा ,'
हे ऐकल्यावर राजू ला बरं वाटतं , त्याला परमेश्वर पावल्याचा आंनद होतो व तो आपले डोळे पुसत घरी जातो, व एका कागदावर स्वतःची सर्व दुःख लिहितो व मंदिराच्या दिशेने जाऊ लागतो.
मनामध्ये तो प्रार्थना करतो की ,' हे परमेश्वरा मी खुप दुःखी आहे, मला आनंदीत कर. मी ज्याला त्याला पाहतो तो सुखी व आनंदीत दिसतो, मला ही त्याच्या प्रमाणे सुखी कर,'
पुढे तो गावातून जात असतो त्याला वाटेत अनेकजण दिसले , सावकार, पंडित, राज घराण्याची माणसे, गावातील प्रमुख व्यक्ती व सर्व जन समुदाय तो पाहत होता.
त्यामध्ये त्याला दिसले ते म्हणजे काहीच्या हातात दुःखाने लिहिलेले कागदाच्या काही प्रती, तर काहीच्या हातात कागदाचे बंडल, तर प्रतिष्ठित लोकांच्या हातात दुःखाने लिहलेला चक्क वह्या राजू ला दिसल्या.
मंदिराच्या गाभारा मध्ये सर्व गाव करानी आप आपली लिहलेली दुःखे ठेवून मंदिरा बाहेर उभी होती व परमेश्वरा च्या पुढील आज्ञे ची वाट पाहु लागली, मध्य रात्र झाली होती सर्व गाव जागे होते , सर्वाच्या नजरा आकाशाकडे होत्या. अचानक विज कडाडते, व बारीकसा पाऊस चालु होतो.
अचानक आकाशातून आवाजा येतो, ' हे पृथ्वी वासी आता तुम्ही सर्वजण मंदिरात जाऊन तुम्हाला हवी ती चिठ्ठी घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या दुःखा पासुन तुम्हाला मुक्ती मिळेल, '
सर्वजण हे ऐकल्यावर गोंधळात पडतात,
व एक एक करीत मंदिरात शिरतात . त्या पाठोपाठ राजू ही मंदिराच्या आत जातो.
प्रत्येकजण मिळेल ती चिठ्ठी उचलुन वाचून फेकुन देतो. राजू ही मिळेल ते वाचत आसे ते वाचून तो खुपच दुःखी होतो कारण त्याच्या स्वतःच्या दुःखा पेक्षा कितीतरी भयंकर दुःखे लोकांची होती.
तो भयभीत झाला व स्वतःच्या दुःखाची चिठ्ठी शोधू लागला पण त्याला ती मिळत नव्हती. त्याचे डोळे भरून आले , तो त्या मंदिराच्या गर्दी मध्ये गोंधळून गेला.
' माझी चिठ्ठी ....माझी चिठ्ठी. ...,'
असे म्हणू लागला.
तेवढ्यात तीच्या आईचा हात कपाळावर पडतो, व राजू स्वप्नातून घाबरलेल्या स्थितीत जागा होतो.
आईला पाहून त्याचे डोळे भरून येतात.
********** ******** **********
प्रतिक्रिया
15 Sep 2015 - 12:15 pm | जेपी
ढॅंण...ढॅंण..
मी पयला .
आता वाचतो.
15 Sep 2015 - 12:21 pm | मांत्रिक
माई ह्यानं माझा नंबर घेतला बघा.
15 Sep 2015 - 12:38 pm | जेपी
मामोऑ-
अरे मांत्रिका,त्याचा कायमच पला प्रतिसाद असतो.ह्यांनी तर "मी पयला संघटनेचा उद्यास्त" पुस्तक पण लिहीलय.जरा शोध घे.बाई बाई,हे मेले नवे लोक काहि समजतच नाही-मामोऑ.
(डबल बॅरेलवाले येतेत आता)
15 Sep 2015 - 12:17 pm | जेपी
चांगलय..
15 Sep 2015 - 12:17 pm | मांत्रिक
सुंदर! मोहिते जी, पुनरागमनाबद्दल खूप खूप अभिनंदन!
कथेचा गाभा अतिशय उत्तम, बलवान आहे. कथेची मांडणी देखील आवडली.
पण तुमची स्पेशल स्टाईल खूप मिसतोय! :(
15 Sep 2015 - 12:32 pm | एस
वा! अप्रतिम!
15 Sep 2015 - 12:42 pm | द-बाहुबली
केवळ लेखकाच्या नावावर प्रतिसाद लिहतो आहे. जबरा लिखाण. सविस्तर प्रतिसाद धागा वाचुन लिहणेत येइल.
15 Sep 2015 - 12:43 pm | प्यारे१
मोजी द फिलॉसॉफर
मस्तय कथा.
15 Sep 2015 - 1:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
कथा छान आहे. पण खास मोजी टच नसल्याने मोजींचा आयडी हॅक झाल्याचा दाट संशय येत आहे ;)
15 Sep 2015 - 1:37 pm | अन्या दातार
खरंय. ती मजा नाही या कथेत. श्या!! :(
16 Sep 2015 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
अगदी हेच्च म्हन्तो!
मोजींची कथा हाय,पन कथेत मोजी नाय! :-/ दू दू दू :-/
23 Sep 2015 - 4:34 pm | gogglya
आता राहीले नाहीत. मोजी पण विपश्यना वगैरे करून आले की काय? [शेवटचा लेख ~ १०० दिवसांपुर्वी लिहिला होता म्हणून विचारतोय!]
15 Sep 2015 - 2:36 pm | थॉर माणूस
हे आमचे मोजी नाहीतच मुळी... मोजी आसे साधे सरळ लिहित नाहीत.
15 Sep 2015 - 3:08 pm | चांदणे संदीप
काहीतरी मिसिंग आहे हे खर!
कृपया याचा 'रिमेक' करा, मोजीटच देऊन, खूप आवडेल वाचायला (प्रतिक्रियांसकट).
15 Sep 2015 - 5:28 pm | इरसाल
मोजी मागचा आपली आधीची स्टाईल विसरलेला दिसतोय, वेंधळा, बावळट कुठचा !
15 Sep 2015 - 5:52 pm | मुक्त विहारि
जबरदस्त....
इनसेप्शन, आठवला........
मोजी भाई तुम लिखते रहो....
15 Sep 2015 - 6:40 pm | पिलीयन रायडर
चांगल लिहीलय की...
लिहीत रहा..
15 Sep 2015 - 10:15 pm | कवितानागेश
छान कथा.
15 Sep 2015 - 10:18 pm | आदूबाळ
चांगली आहे कथा. पण राँर्बर्ट, कैरी, का० मावशी वगैरे मंडळी नसल्यामुळे जरा निराशा झाली.
16 Sep 2015 - 8:58 am | नाखु
बरोबर वाचक त्याच अपेक्षेने आले होते.
काही प्रतीक्षीप्त प्रीतीक्रिया
"अरे जीवना असं सुसंगत आणि व्याकरण शुद्ध लिएहिलेस तर लोक फिरकणार नाहीत रे धाग्यावर, पण तू लिहित रहा, (दुसर्याच्या घरात येऊन) फुकाची कौले फोडण्यापेक्षा हे बरे असे आमचे हे म्हणतात"
सार्वकालीन माई.
"देवानेच दु:ख दिले आणी त्यातून बाहेर पड्ण्याचा मार्गही दाखविला, देव आहे यचा यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. जरा वेद वाचा म्हणजे कळेल"
कुठले वेद ते विचारू नका, मलाच ते माहीती नाहीत.
==स्वप्रकाशीत तुडतुडी
"ही कथा भगव्यांचा डाव आहे आणि गावकर्यांना देवळात गोळा करण्याचे कारस्थान आहे.याचा निषेध म्हणून मी पुढील ५ धाग्यांवर प्रतीसाद पिंक टाकणार नाही"
==हरीत उत्क्रांतीवीर मुद्दम घुसेन उर्फ @रेकर
16 Sep 2015 - 10:22 am | मांत्रिक
अरे देवा! मेलो हसून हसून!
मस्त ओ नाखुकाका!
23 Sep 2015 - 4:30 pm | gogglya
तर नदीत लाकडे !
ये जीवन है, इस जीवन का, यही है यहि है यही है रंग रूप...
16 Sep 2015 - 8:08 am | चाणक्य
.
16 Sep 2015 - 8:17 am | बोका-ए-आझम
मोजींच्या कथेवर पहिला प्रतिसाद देण्याचा मान तुमचा असतो ना?
लोलकथा आवडली.
16 Sep 2015 - 4:55 pm | नाव आडनाव
जीवन भाऊ, येत रहा.
पब्लिक आठवण काढतं कायम तुमची.
गोष्ट चांगली आहे, पण वर सगळे म्हणत आहे तशी आधीच्या गोष्टिंसारखी नाही :(
16 Sep 2015 - 6:52 pm | मोहनराव
मोजीभाई नमस्कार...
16 Sep 2015 - 7:52 pm | जेपी
चांगल आहे.
उगाच कथेत पुर्वीचा टच नाही असे म्हणत लेखकाला पुर्वीच्या भुमीकेत ढकलण्यात अर्थ नाही.
लेखकाला बर्याच कानपिकच्या मिळाल्या आहेत.
जर ते चांगले लिहु शकत असतील तर लिहु द्या.