धन्याम्होरं ती लांब उडून जायची
त्यो जाताच माज्या हातावर बसायची..
शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची
पावसात माज्या हाताआड हळूच लपायची..
आता लपण्याची गरजच राहिली नाय
हातावरली जागा आजबी रिकामी हाय..
धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला
बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला..
मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला
जाताना गाडीत दारुची बाटली उघडला..
सात दिवसानंतर छोटं धनी आलं
ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं..
हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल..
पर धनीला परत कोणं आणिलं?
प्रतिक्रिया
7 Sep 2015 - 4:13 pm | बबन ताम्बे
.
7 Sep 2015 - 6:46 pm | शब्दानुज
शंभर जणात कमीतकमी तुम्हाला तरी आवडली...
7 Sep 2015 - 6:56 pm | एस
ही बुजगावण्यावरची कविता आहे का? बर्याचदा वाचूनही नीट कळली नव्हती म्हणून प्रतिसाद दिला नाही.
7 Sep 2015 - 7:02 pm | शब्दानुज
बुजगावणच बोलत आहे