जेष्ठ अभिनेत्री श्री.जयश्री गडकर यांचे आज पहाटे निधन झाले.
या चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3420004.cms
रत्नागिरीकर
जेष्ठ अभिनेत्री श्री.जयश्री गडकर यांचे आज पहाटे निधन झाले.
या चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3420004.cms
रत्नागिरीकर
प्रतिक्रिया
29 Aug 2008 - 10:49 am | विसुनाना
बातमी वाचून अत्यंत दु:ख झाले.
त्यांना आदरांजली.
29 Aug 2008 - 10:53 am | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते.
माझीही श्रद्धांजली.
29 Aug 2008 - 10:55 am | मनस्वी
मराठी कृष्ण-धवल चित्रपट स्मरताना त्यांचा चेहेरा अगदी सहजतेने समोर येतो.
तसेच रामायण मधील कौसल्याही आठवते.
त्यांचा सहज साधा सरळ अभिनय स्मरणात राहतो.
ऐरणीच्या देवा आणि माळ्याच्या मळ्यामंदी गाणी चटकन डोळ्यासमोर येतात.
या मराठी चित्रसृष्टीच्या सम्राज्ञीला माझी आदरांजली.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
29 Aug 2008 - 11:29 am | राघव१
:(
माझीही त्यांना आदरांजली.
राघव
29 Aug 2008 - 10:57 am | नंदन
सोज्वळ, खानदानी मराठमोळं सौंदर्य म्हणजे काय, असं विचारल्यावर ज्यांचं उदाहरण द्यावं, अशा मोजक्या अभिनेत्रींत जयश्रीबाई असाव्यात. ऐरणीच्या देवाची आठवण होणे अपरिहार्यच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Aug 2008 - 10:59 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
29 Aug 2008 - 12:09 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो
माझीही श्रद्धांजली
- ऋषिकेश
29 Aug 2008 - 11:10 am | मृगनयनी
पहाटे ३ वाजता, प्रदीर्घ आजाराने ६८व्या वर्षी "जयश्री गडकर" यांचे निधन झाले.....
सांगते ऐका, मोहित्यांची मंजुळा, लव-कुश, सुगंधी-कट्टा, खिचडी.... अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा चित्रपटसृष्टीत उमटवला....
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
*****____/\____*****
29 Aug 2008 - 11:37 am | जयमोल
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
29 Aug 2008 - 12:05 pm | सुनील
जयश्री गडकरांचे नाव घेताच माझ्या डोळ्यासमोर त्यांचा "बुगडी माझी सांडली ग..." ह्या गाण्यातील चेहरा डोळ्यासमोर येतो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Aug 2008 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर
मराठी चित्रपट सृष्टीत जयश्री गडकर ह्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेकानेक चित्रपटांमधून सकस अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. तसे म्हंटले तर ६८ हे काही फार वय नाही. देवाने त्यांना अजून आयुष्य द्यायला हवे होते. असो.
29 Aug 2008 - 12:32 pm | श्रीमंत दामोदर पंत
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
29 Aug 2008 - 2:37 pm | II राजे II (not verified)
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना......
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
29 Aug 2008 - 3:33 pm | मनीषा
चित्रपट पाहिले आहेत...
त्यातला सुद्धा साधी माणसं आणि त्यातील "माळ्याच्या माळ्यामंदी.." आणि "ऐरणीच्या देवा तुला .." ही गाणी आणि त्यातील जयश्रीबाईंचा अभिनय ..
29 Aug 2008 - 4:49 pm | विकास
बातमी वाचून वाईट वाटले.
असे जेंव्हा कधी न भेटलेल्या, सध्याच्या काळात अजिबात सोनेरी पडद्यावर/प्रकाशात नसताना, मध्यंतरी एकही त्यांचा चित्रपट न पहाता देखील जर बातमी वाचून जेंव्हा अनेकांना वाईट वाटते, धक्का बसतो, तेंव्हा त्याचा अर्थ अनेक जण जे चांगले होते ते कुठेतरी "मिस" करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण त्याचा विचार करत नाही. पण अचानक असे व्यक्तिमत्व जेंव्हा निघून जाते तेंव्हा कुठेतरी मनाच्या कोपर्यात त्याची जाणीव होते.
साधी माणसं , सांगत्ये ऐका, मानिनी आदी अनेक आपल्यातील (माझ्यासकट) अनेकांच्या जन्माच्या आधीचे/वेळ्चे चित्रपट सजीव करून लक्षात ठेवायला लावणारे अभिनय करणार्या या अभिनेत्रीस माझी श्रद्धांजली.
29 Aug 2008 - 4:58 pm | शितल
बातमी दुखःदायक आहे.
कोल्हापुर येथील केशवराव नाट्यगृहात त्यांना आणि मराठीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना जवळुन पाहण्यांची संधी मिळाली.
त्यांच्या चेहर्यातील गोडवा हा कायमचा मनात घर करून गेला. त्यांच्या अभिनया बद्दल काय बोलावे शब्दच नाहीत. :)
29 Aug 2008 - 6:21 pm | चंबू गबाळे
माझी आवडती अभिनेत्री!
माझीही त्यांना आदरांजली
मराठी स्त्री म्हटले की नजरेसमोर येते ती नऊवारी साडीतील जयश्री गडकर यांची प्रतिमा..!
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
29 Aug 2008 - 7:26 pm | केशवराव
जयश्री गडकर - धुरी गेल्याचे कळले, खुप खुप वाईट वाटले. समजायला लागल्या पासून मराठी चित्रपट पहातो आहे. 'गाठ पडली ठका ठका ' पासून जयश्री बाईंना पहात आहे. बुगडीने तर कहरच केला होता.' जयश्री गडकर - सुर्यकांत ' ही जोडी कित्येकांची आवडती जोडी होती.
जयश्री बाईंना विनम्र आदरांजली!
29 Aug 2008 - 8:33 pm | सर्वसाक्षी
हरपले. जयश्रीबाईंना श्रद्धांजली
29 Aug 2008 - 9:24 pm | गनेश राजे
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
29 Aug 2008 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली
29 Aug 2008 - 10:47 pm | अनिरुध्द
मराठी मनांवर राज्य करण्या-या त्या चतुरस्त्र अभिनेत्रिला माझीही श्रध्दांजली.
-अनिरुध्द पेंडसे
29 Aug 2008 - 10:50 pm | श्रीकृष्ण सामंत
"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे"
हे गाणं आणि जयश्रीबाईंचा तो पापभिरू चेहरा का कुणास ठाऊक आज ही दुःखद बातमी ऐकून माझ्या मनाला सतावत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 Aug 2008 - 7:09 am | विसोबा खेचर
माझीही श्रद्धांजली....!
30 Aug 2008 - 7:24 am | अनिल हटेला
भावपूर्ण आदरांजली !!!!
( बूगडी माझी सांडली चा पंखा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..