छायाचित्र क्र. ४ चे परिक्षण

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
29 Aug 2008 - 12:22 am

छायाचित्र परिक्षण वाचण्याआधी मुळ चित्र येथे पहावे

==============

ही नजर की बाण हा, घायाळ करते जीवा
त्या मुठित लपविले, घायाळ माझ्या जीवा

ते लटकलेले कानचे, की आशा माझ्या मनीची
स्वत:संगे झुलविले, घायाळ माझ्या जीवा

ती वक्रगती कटीका, की रस्ता माझ्या मनीचा
त्या झटक्याने फसविले, घायाळ माझ्या जीवा

ती कमरसाखळी हो, की इच्छा माझ्या मनीची
त्या विळख्याने भुलविले, घायाळ माझ्या जीवा

सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची
तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा

-ऋषिकेश
(रात्री १२ ची वेळ असल्याने छंदाच्या अपेक्षा माझ्यासारख्या स्वचंदी माणसाकडून तुर्तास नको ;) . सुचलं ते लिहिलं)

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Aug 2008 - 12:27 am | विसोबा खेचर

सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची
तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा

मार डाला!

ऋषिकेशा, तुझ्यातल्या शीघ्रकवीला आणि रसिकाला सलाम...! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2008 - 1:09 am | बिपिन कार्यकर्ते

खल्लास्स्स्स्स.....

सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची
तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा

ऋषिवर, सादर प्रणाम स्वीकार असावा. मानलं....

बिपिन.

रामदास's picture

29 Aug 2008 - 1:17 am | रामदास

आस हा शब्द जरा खटकला.

महेश हतोळकर's picture

29 Aug 2008 - 9:53 am | महेश हतोळकर

ऋषिकेश,
मला छायाचित्राच्या पानापाशी पोहोचण्याची मुभा नाही. चित्र काढले आहे का? कवीता सुरेख आहे. छंद पण छान जमला आहे. अपेक्षा नको का म्हणतोस?
महेश

ऋषिकेश's picture

29 Aug 2008 - 9:59 am | ऋषिकेश

मुळ छायाचित्र तुर्तास तात्यांच्या खरडवहीमधे आहे ते पहावे.
अभिप्रायाबद्दल सार्‍यांचे अभिप्रायाबद्दल

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

29 Aug 2008 - 3:06 pm | विसोबा खेचर

काही अपरिहार्य कारणास्तव मूळ चित्र मिपावरून अप्रकाशित करावे लागले, ते सर्वांना आमच्या खरडवहीच्या सुरवातीलाच पहता येईल. ऋष्याने कविता छानच केली आहे. तिचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर इच्छुकांनी वर दिलेल्या दुव्यावर जाऊन ते चित्र अवश्य पहावे...

गैरसोयीबद्दल दिलगीर आहे...

तात्या.