राखी पोर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.श्रावण महिन्यातील पौर्णिमा हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात. हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या (जर सख्खा भाऊ नसेल तर नात्यातील भावाच्या) हातावर राखी बांधावी. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करते. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्ष मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटावर राखी बांधून आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या पुरुषावर अथवा भावावर टाकतात.
यावरील कथा पूर्वीच्या काळी दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्रास युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक धागा इंद्राच्या हातावर बांधला. त्या धाग्याच्या (राखीच्या) प्रभावाने इंद्राला युद्धात विजय मिळाला. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.
प्रतिक्रिया
29 Aug 2015 - 12:42 pm | चौथा कोनाडा
29 Aug 2015 - 1:25 pm | मांत्रिक
छान माहिती.
29 Aug 2015 - 1:34 pm | द-बाहुबली
सर्व बहिण भावांना राखिपोर्णीमेच्या शुभेछ्चा.
29 Aug 2015 - 2:37 pm | दिव्यश्री
29 Aug 2015 - 6:21 pm | सुधांशुनूलकर
सर्वांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा.
29 Aug 2015 - 6:26 pm | द-बाहुबली
यात बहिण भावाचा काय संबंध येतो ?
भाउ की पती ? गोंधळ उडतोय साध्या भोळ्या समाजाचा.
29 Aug 2015 - 6:36 pm | पैसा
मी गोष्ट वाचली होती त्यात शचीने नव्हे तर देवगुरू बृहस्पतीने इंद्राला राखी बांधली होती.
माझी आई सांगते की ती लहान असताना राखी बांधणे हा फक्त उत्तर भारतीयांचा उत्सव होता. मराठी लोकांत त्याचे प्रस्थ हल्ली वाढत चालले आहे. आपला मराठमोळा सण म्हणजे नारळीपौर्णिमा. या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात आणि मग पावसाच्या दिवसात थांबवलेली मासेमारी पुन्हा सुरू करतात.
1 Sep 2015 - 11:10 am | समीरसूर
अगदी खरे!
शनिवारी दादाकडे गेलो असतांना रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला. दादाच्या मुलांना त्यांच्या बहिणीने राखी बांधली. वहिनीनी त्यांच्या भावाला राखी बांधली. एक मला परिचित नसलेली मुलगी होती; तिने दादाला राखी बांधली. मी त्या मुलीला फारसा ओळखत नसल्याने मी काही तिला राखी बांधायला म्हटले नाही. पण मनात शंका होती की तिला म्हणावे का. मग मी वहिनीना विचारले; त्या म्हणाल्या की तशी काही आवश्यकता नाही. अशा वेळेस फार गोंधळ उडतो. मानलेला भाऊ आणि मानलेली बहिण या संकल्पनेवर माझा काडीमात्र विश्वास नाही. लहानपणी शाळेत जबरदस्तीने मुलांना मुलींकडून राखी बांधली जात असे. दिसायला आकर्षक नसलेल्या मुलींकडून आम्ही अगदी बिनधास्त राखी बांधून घेत असू. तेव्हाच सख्ख्या भाऊ-बहिणीच्या नात्यातील या सोहळ्याखेरीज कुठल्याही मुलीने कुठल्याही मुलाला राखी बांधणे या प्रकारातला फोलपणा लक्षात आला.
मग गप्पा करतांना आईला विचारले की तुम्हाला तुमच्या भावांकडून काय ओवाळणी मिळत असे. आणि मला अगदी अनपेक्षित उत्तर मिळाले. आई म्हणाली की त्याकाळी हा सण आम्हाला माहित नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावांना राखी बांधण्याचा प्रश्नच नव्हता. त्या सात बहिणी होत्या आणि त्यांना चार भाऊ होते. त्यांच्यापैकी कुणीच त्यांच्या भावांना आजपर्यंत राखी बांधलेली नाही. भाऊबीज हा एकमेव भाऊ-बहिणीचे नाते दृढ करणारा सण त्याकाळी प्रचलित होता.
गेल्या ३०-३५ वर्षात रक्षाबंधनाचे पद्धतशीर मार्केटिंग झालेले आहे. चोकलेट्स पासून तर महागड्या मोबाईलपर्यंत भेटवस्तूंची मजल गेलेली आहे. आणि अधिकाधिक खरेदी व्हावी म्हणून बाजाराने इतर डेजप्रमाणे रक्षाबंधनाला उत्सवाचे स्वरूप देणे सुरू केले. आज रक्षाबंधन हा एक मार्केट-ड्रिव्हन इवेंट झालेला आहे. उत्तर भारतातील लोकं उत्सवप्रिय असल्याने आणि त्यांची जीवनशैली मुळात आक्रमक आणि थोडी दिखाऊ स्वरूपाची असल्याने त्यांचे सण नेहमीच केश केले जातात. होळी अजून एक उदाहरण!
29 Aug 2015 - 8:03 pm | श्रीनिवास टिळक
१९६९ सालापासून दर वर्षी श्रावण पूर्णिमा विश्व संस्कृत दिवस म्हणून साजरी करावी असा आदेश श्रीमती इंदिरा गांधी यांनी श्री करण सिंग यांच्या विनंतीला मान देऊन काढला असं मागे कुठेतरी वाचलं होतं. योगायोगाने ह्याच दिवशी रक्षा बंधन पण असते. हे औचित्य साधून संस्कृत भाषेला बहिण मानून तिच्या उत्तरोत्तर उन्नतीला आणि प्रगतीला हातभार लावावा ही विनंती.
29 Aug 2015 - 8:19 pm | हेमंत लाटकर
बरोबर. राजस्थान मध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. रजपूत राजे जेव्हा लढाईवर जात तेव्हा त्याच्यां राण्या विजय मिळावा म्हणून हातावर धागा बांधत. तसेच रजपूत वचनाला पक्के असत. एखाद्या स्त्रीने जर राखी बांधली तर तिचे रक्षण करण्यासाठी प्राण द्यायला तयार होत. आपल्या क़डे नारळी पेार्णिमा म्हणून साजरी करतात. पण आपल्या महाराष्ट्रात दुसर्या प्रातांतील सण, खाण्याचे पदार्थाचे प्रस्थ वाढत आहे.
31 Aug 2015 - 6:51 pm | दिव्यश्री
31 Aug 2015 - 9:19 pm | मांत्रिक
हो पण पुढे काय ते सांगा ना ताई! :)
31 Aug 2015 - 10:19 pm | दिव्यश्री
लै मोट्टा म्य्यासेज है...कै झाले कै मैत... :( अर्धवट च येतोय... :(
31 Aug 2015 - 10:38 pm | एस
हाहा! हहपुवा!
1 Sep 2015 - 11:26 am | नाव आडनाव
प्रतिसादात "चांगदेव महाराजांनी ज्ञानदेव महाराजांना लिहिलेलं पत्र" चोप्य पस्ते केलं होतं का?
(ते पत्तुर कोरं व्हतं आणि एक्दम शेम तुमच्या परतिसादावानी व्हतं :) ).
31 Aug 2015 - 10:44 pm | प्यारे१
मांत्रिक और swaps का घर ऊन में बांधो|
31 Aug 2015 - 10:59 pm | मांत्रिक
:)
1 Sep 2015 - 12:00 pm | दिव्यश्री
असा मेसेज येतोय मला...काय ब्रे क्रावे?
गुर्जी शाण्ती करा ब्र या मिपाची / माझ्या सदस्यत्वाची... :(