कधी सांगु शकलो नाही तुम्हाला......

चिंतामणराव's picture
चिंतामणराव in जे न देखे रवी...
28 Aug 2008 - 9:07 am

कधी सांगु शकलो नाही तुम्हाला
जाणीवा रुंदावत जातांना
तुम्हीच प्राम्टिंग करत होता
मी मिजाशित टाळ्या घेत होतो
विंगेत तुम्ही आनंदाश्रु पुशीत होता

कधी बोललो नाही तुम्हाला
तुम्हीच तर दिलंत मला
स्रुजन सारस्व्ताच भान
तुम्हीच ऍकवलंत मला
नव्या युगगीतांच उदगान

कधी सांगीतल नाही तुम्हाला
जीवन म्हणजे अपार श्रद्धा
प्रेम, सेवा, कर्तव्य आणि निश्ट्टा
खोचलेला पदर आणि यज्ञमग्न हात
तुमच जीवन हाच मुर्तिमंत पाट्ट

सांगायच राहिलंच तुम्हाला
तुम्हीच शिकवलंत, भिमसेनी धबधब्याखाली
सोबती गोळा करुन रंगवाव्यात मॅफली
झेलाव्यांत सुर तालांच्या आशाडी बरसाती
रंग्-रस-गंधांनी भिजवावी मनाची माती

कधी कसा आट्टवत नाही
पण तुम्हीच दाखवलांत एकदा
सुजाण कॅवल्याचा प्रदेश
फुंकरलीत राख अन उजळलांत
चिदानंदी भुकेचा निखारा

कबुल केलंच पाहिजे इथे
असते सतत खाली
तुमच्या आश्वस्त अस्तित्वाची जाळी
म्हणुनच करुन दाखवु शकतो
उंच पाळण्यावरच्या खेळी

अगदी मनापासुन सांगतो
जेंव्हा लवतें मान सांजवातीला
तर कुथे शेंदुरलेल्या मुर्तिला
तुमचेच पाय डोळ्यासमोर
कानांत तुमचाच स्वर ..."सुखी रहा....सुखी रहा...."

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

मनीषा's picture

28 Aug 2008 - 3:11 pm | मनीषा

आवडली ..

कबुल केलंच पाहिजे इथे
असते सतत खाली
तुमच्या आश्वस्त अस्तित्वाची जाळी
म्हणुनच करुन दाखवु शकतो
उंच पाळण्यावरच्या खेळी

अगदी मनापासुन सांगतो
जेंव्हा लवतें मान सांजवातीला
तर कुठे शेंदुरलेल्या मुर्तिला
तुमचेच पाय डोळ्यासमोर
कानांत तुमचाच स्वर ..."सुखी रहा....सुखी रहा...."

सुंदर आहे...