आशुची राउंड - भाग १

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
23 Aug 2015 - 3:06 pm

आशु आज भलताच खुशीत होता . नुकतीच त्याच्या बाबांनी एका प्रसिद्ध कंपनीची अलिकडेच लाँच झालेली फोर व्हीलर घेतली होती . आज रविवारचा सुट्टीचा दिवस . त्यामुळे आशुने हट्ट धरला होता 'आज मी नव्या गाडीवरुन एक राउंड मारुन येणार '. अखेर आई बाबांनी त्याला परवानगी दिली. तरीही निघताना आईने त्याला बजावले ' आशु , गाडी जपुन चालव . आणि फार लांब जाउ नकोस'. आशुनेही प्रॉमिस दिले 'हो आई .मी विजय चौकापर्यंत जाउन परत येईन.'
आशुच्या कॉलेजमधले बरेच व काही खास क्लासमेटस विजय चौक परिसरात राहात होते. त्यामुळेच आशुने तिकडे जाउन यायचे ठरवले होते . विजय चौकापर्यंत येउन आशुने आता घरी परतण्यासाठी गाडी वळवली. तेवढ्यात त्याला त्याच्या कॉलेजमधले देशमुख सर दिसले . ते कुठेतरी घाईने चालले होते . आशुने गाडी त्यांच्या किंचीत पुढे नेउन थांबविली. तो गाडीतून उतरला व सरांना म्हणाला 'सर , तुम्हाला कुठे सोडू का ?'
सरांना त्याची ओळख पटायला काही सेकंद लागले 'अरे नाही . मी इथे एका नातेवाईकांकडे आलो होतो. आता घरी चाललो आहे .माझी गाडी दुरुस्तीला दिली आहे .म्हणून आज जरा चालत चाललो आहे . बाकी तु काय म्हणतोस ? '
सरांच्या गुड बुकमध्ये जायची हि एक नामी संधी आली आहे हे आशुच्या लक्षात आले . तो एकदम आदराने सरांना म्हणाला 'सर , तुम्ही अमरबागेपाशी राहता ना ? मी सुद्धा त्याच भागातुन घरी जाणार आहे . बसा ना . मी तुम्हाला अमरबागेपाशी सोडतो .'
अखेर हो ना करत सर त्याच्या गाडीमध्ये बसले . गाडी सुरु झाल्यावर सहज काहितरी विचारायचे म्हणुन त्यांनी विचारले ' काय नवी गाडी घेतली वाटतं ?' आशु मात्र त्यांच्या प्रश्नाने एकदम खुलला .
'हो सर . एकदम लेटेस्ट मॉडेल आहे . या गाडीसाठी खूप क्यू आहे . पण आम्हाला काकांच्या ओळखीने लगेच मिळाली. त्यांचीच डिलरशीप आहे'. सरांनी आपली मान हलविली व बोलले 'बरं बरं , छान '. पण आशु आता सुसाट सुटला होता . तो सरांना उत्साहाने या गाडीची ईंजिन टेक्नॉलॉजी , अ‍ॅव्हरेज , पिकअप , कुलींग सिस्टीम यांबद्दल माहिती सांगु लागला .सारखे 'बरं बरं , छान ' असे बोलुन व मान हलवुन हलवुन सरही वैतागुन गेले . पण आशुला याचा पत्ताच नव्हता . तो आता सरांना गाडीतील सस्पेनशन , गिअरींग , स्पीड कंट्रोलींग युनीट यांचे धडे देउ लागला . सरांना आता कधी एकदा आपण बाहेर पडतो असे वाटु लागले .
अखेर अमरबागेपाशी आल्यावर आशुने गाडी थांबविली . सरांनी त्याचे आभार मानले व लगेच बाहेर पडुन सुटकेचा निश्वास सोडला . दोघांनीही एकमेकांना हात केले व मग आशुची स्वारी घराकडे निघाली .

भाग १ समाप्त . क्रमशः.

कथालेख

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

23 Aug 2015 - 3:13 pm | मांत्रिक

चांगले लिहिलेय.
पण मला वाटते, शीर्षक आशुचा राऊंड असे पाहिजे होते!

जेपी's picture

23 Aug 2015 - 3:19 pm | जेपी

वाचतोय.पुभाप्र.

(आमिनलेउस.अ )-जेपी

gogglya's picture

23 Aug 2015 - 3:50 pm | gogglya

पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

सिरुसेरि's picture

23 Aug 2015 - 7:05 pm | सिरुसेरि

धन्यवाद !

द-बाहुबली's picture

23 Aug 2015 - 7:08 pm | द-बाहुबली

बरेच दिवसात इतके रोचक मी काहीच वाचले नाही. सगळे भाग असेच येउद्या. रोचक्ता जरासुध्दा कमी होणार नाही याची काळजी घ्या. गुड.

सिरुसेरि's picture

24 Aug 2015 - 11:47 am | सिरुसेरि

भाग २ ची लिंक - http://misalpav.com/node/32511