नमस्कार
आपण सर्वा मराठीप्रेमी नेहमी अभिमानाने सांगत असतो की आम्ही हे आणि आम्ही ते.
पंण आपल्या बाबतीत हिंदी भाषा बोलण्याच्या बाबतीत मात्र आपण काहीवेळा मार खातो (अर्थात याला अपवाद असतात)
आज सकाळी गाडी मध्ये एक-दोन किस्से ऍकायला मिळाले... तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही सांगा...
गीता नावाच्य मैत्रिणीने सांगितलेला किस्सा लै भारी होता...
तिच्या येथे एका वाड्याचे इमारती मध्ये रुपांतर झाले होते. पण तिकडचे मालक मात्र एकदम साधेसुधे होते.त्यांचा रखवालदार एकदा आल्याआल्या झोपा काढत होता. तेव्हा ते त्याला बघुन चिडुन म्हणाले की "तुम आया बरोबर क्यो सोया था "...... =))
रखवालदार हडबड्ला......!!!
तो म्हणाला नही मै अकेले सोय था....!!!!!
तुमच्याकडे असतील तर सांगा..!!!
प्रतिक्रिया
27 Aug 2008 - 11:39 am | सुचेल तसं
मराठी: मी पायी पायी आलो
हिंदी: मैं पांव पांव आया...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
27 Aug 2008 - 11:42 am | नंदन
ऐकीव विनोद -
१. सरळ जाके डावीकडे वळो.
२. हमारे यहाँ, दूल्हा दूल्हन को घास खिलाता है.
इतर ठंडी लगी च्या ऐवजी ठंडी बजी (वाजलीचे भाषांतर) इ. लहानसहान चुका तर होतच असाव्यात.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Aug 2008 - 12:09 pm | वैद्य (not verified)
उस गल्लीसे जरा हळू जाव, हां ! उधर बाळू पसरा हुवा है !
- प्रभात रोड , गल्ली क्रमांक ९.
-- वैद्य
27 Aug 2008 - 11:50 am | मराठी_माणूस
अन्यभाषिक पण मराठी बोलताना खुप चुका करतात फक्त त्याना आपण न हसता समजुन घेतो.
27 Aug 2008 - 12:27 pm | चतुरंग
नवर्यामुलीकडे हिंदीचे वारे लागलेले फारसे कोणी नाही. मुलीची आई आणि तिचा भावी जावई (हिंदीभाषावाले) ह्यातला संवाद
सासूबाई - पूजा के लिए रखे नारळ कहां है?
जावई - नारल?? हां हां ..नारियल! वो क्या आपके बगल में रख्खे हैं! :P
(इथे सासूबाईंचा चेहेरा गोरामोरा की आपल्या बगलेत नसलेला नारळ भावी जावयाला कसा दिसतोय!!? :O आता विचारायचं तरी कसं आणि शोधायचं तरी कुठे?!! :T शेवटी एकदाचे जमिनीवरचे पाटाशेजारचे नारळ कोणीतरी दाखवले आणी पूजा मार्गी लागली!) B)
चतुरंग
27 Aug 2008 - 12:38 pm | मनस्वी
आनंदयात्री : मैं नदीमे शिरा फीर पोहा. पोहते पोहते भीज गया. फीर कपडे खंगाळके पीळके घर गया. सायकल चालवते चालवते पड्या. घर जाके साबुदाणे की खिचडी खाया.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
27 Aug 2008 - 12:45 pm | आनंदयात्री
मनस्वी: मेरुकु बीट की कोशिंबीर किसणी पे किसके बनानी थी पण हुवा ऐसा की वो बीट जरा जास्तच कच्च्चा निघाला अन किसते किसते आमची किसणीच चेप्या !
27 Aug 2008 - 6:11 pm | शितल
आंद्या, मनस्वी
दोघे ही मस्त हिंदीत ठार मारले आहे एकमेकांना. :=))
27 Aug 2008 - 12:46 pm | मिंटी
माझ्या मैत्रिणीचा भाऊ लहान असताना कामवाल्या बाईला म्हणाला होता....
बाई आईने कहा है पाच मिनीटं थांबो...हम जेवण कर रहे है...... :)
27 Aug 2008 - 1:50 pm | नितीनमहाजन
गणपतींच्या दिवसांमध्ये एकदा शेजारच्या हिंदीभाषिक भगिनीला समजावून सांगितलेला हा सणः
हमारे यहां ना गौरी होतीहै वो खडी नही होती है. वो सामनेवाले है ना उनके यहां खडी होती है. हमारे यहां गौरी खडेकी होती है.
अजून एक किस्सा:
ए भैया पानीपुरी टेस्ट के लिये दे दो आवड्या तो और लेंगे.
नितीन
27 Aug 2008 - 5:02 pm | काळूराम
ऑर्कूटावर एकाने धाडलेला स्क्रॅप आठवला.
घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
सरबत मे लिंबु पिळा क्या!!
इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!
कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!
अरे बाबा गाडी सावली मे लगा!!
ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!
केस एकदम बारीक कापो भैया!!
खाओ पोटभर खाओ लाजो मत!!
धावते धावते गिर्या तो काडकन हात का हाड मोड्या!!
27 Aug 2008 - 10:48 pm | भाग्यश्री
माझ्या काकूचं हिंदी : टाकीका पानी संपा ! :)
माझेही बरेच किस्से आहेत अगाध हिंदीमुळे आठवत नाही आता.. :)
पुलंचं(च? आहे न?) एक वाक्य : उंच जिने के उप्पर्से धाप्पकन पड्या और हाड मोड्या ! :)
27 Aug 2008 - 11:56 pm | मनीषा
एका हिंदी भाषक गृहस्था कडे एक मराठी माणूस पाहूणा येतो.
त्याचे स्वागत करुन हिंदी भाषक गृहस्थ त्याला सांगतो कि "तुम्ही येथे कसलाही संकोच करु नका ."
मराठी माणूस त्याला म्हणतो , " तुम काळजी मत करो, हमको कुछ शर्म नहीं है | "
28 Aug 2008 - 4:48 am | कोलबेर
हिंदी भाषीक लोकांसोबत राहताना मी, 'आज मै पोहे करु क्या?', 'मैने आज चिकन किया है' अश्या माझ्या वाक्यांना ने एकमेकाकडे बघून चेकाळल्या सारखे हसायचे. एकदा बरेच मागे लागल्यावर मला त्यांनी त्यातली गंमत सांगीतली.
28 Aug 2008 - 11:49 pm | छोटा डॉन
आम्हालाही सांगा की मगं ती गंमत ...
ठार अडाणी - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Aug 2008 - 8:59 am | रेवती
माझ्या सासूबाई राजस्थानी सुताराला सांगत होत्या: वो सागवान के दांडू पडे है, वापरो.
माझी आई हिंदी भाषिक किराणा दुकानदाराला मोहोरी मागत होती व त्याला समजत नाही हे पाहून म्हणाली: जो गरम तेल मे डालने के बाद तडक फडक करता है वो दे दो.
रेवती
28 Aug 2008 - 8:15 pm | सहज
रेवतीजी तुम्ही दोघींना [आई व सासू] यांना रामगोपाल वर्माच्या "फुंक" सिनेमाचे वेगवेगळ्या शो चे टिकीट काढून द्या [संदर्भ - http://www.misalpav.com/node/3250]
हिंदी अच्छाकेपैकी येताच नही तो समझेगाचभी नही, फिर बैठे बैठेच मस्तच के पैकी १० लाख मिळेंग्या.
:-)
तडक फडक करता है वर प्रचंड हसलो!
एक मित्र जिथे रहायचा त्याच्या घराच्या मागच्या बाजुला त्याच्या आजीचे घर होते. बर्याचदा तो तिकडे असला, आम्ही त्याच्या घरी गेलो की त्याच्या घरचे म्हणायचे "तो पलिकडे आहे" म्हणजे आजीच्या घरी. एकदा बहुतेक कन्नड का तेलगू भाषीक मोलकरीण घरी होती, मित्राला हाक मारल्यावर ती बाहेर येउन म्हणाली "ओ पलीके पास गया"
29 Aug 2008 - 1:43 am | रेवती
सहज,
१० लाख मिळाल्यावर सागवान के दांडू घेऊन त्या राम गोपाल वर्मा च्या डोक्यात घालतील वेगवेगळ्या कारणांसाठी. सासूबाई म्हणतीलः अरे गाढवा असे पैसे वाटत फीरलास तर संसार रे कसा करशील? (पण रामू साठी संसार हा असार!)
आई म्हणेलः गधड्या, लेकरा बाळांना घाबरवण्यासाठी हे असले (म्हणजे समजत नसलेले) सिनेमे काढतोस मेल्या, हा धे रट्टा (किंवा ही घे राईची फोडणी)!!
रेवती
28 Aug 2008 - 9:50 am | स्नेहश्री
जो गरम तेल मे डालने के बाद तडक फडक करता है वो दे दो.
हे सॉलिडच होत.
वाण सामान वाल्यची काय हालत झाली असेल नुसत्या कल्पनेने पण हसुन हसुन वाट लगत आहे.प्रत्यक्ष ऐकणार्यचे तर .....
पण मला एकदा तस मागुन बघयला जास्त आवडेल.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
28 Aug 2008 - 10:10 am | रेवती
माझ्या मामेबहीणीच्या हिंदी भाषिक सासरी तिच्या सासूबाई सकाळी म्हणत होत्या: कितना कोहरा पडा है. तर माझी मामेबहीण कोहरा म्हणजे कोहळा समजून म्हणाली: पूना में भी बडे बडे कोहळे मिलते है, साऊथ इंडियन्स तो गृहप्रवेश के दिन कोहळे तोडते है. त्यावर घरातले सर्वजण एकमेकांकडे बघतच राहिले.
रेवती
28 Aug 2008 - 10:50 am | किर्ति
माझ्या बहिणीची मुलगी एकदा नळावर पाणी भरत होती
तिची बादली कुणी तरि काढली ति लहान च होती
ति म्हणलि ''मेरी बादली ईधर क्यु ठओई
ते एकुन मी खुप हसले होते
28 Aug 2008 - 12:02 pm | मराठी_माणूस
ईतके विनोद (?) निर्माण करण्या पेक्षा टेचात मराठीत बोलावे आणि समोरच्याला समजले नाहि तर हा त्याचा दोष समजावा आणि त्याना हसावे (आपल्या लोकावर हसण्या पेक्षा हे बरे)
29 Aug 2008 - 1:07 am | टारझन
इथे येवुन वाचुन आणि टाइप करून प्रतिसाद देण्यापेक्षा तुम्ही धागा न उधडलेलाच बरा ना ...
आमचं स्वताचं हिदी :
कॉलेजात रिझल्ट लागला की आम्ही एक मेकांना विचारायचो " ए तेरे को कितने मार्क गिरे "
एक जण क्लास मधे हेल्मेट विसरलेला, नेक्स्ट डे सरांनी विचारलं .. काल परत का आला होतास ?
तर भाउ म्हणे " सर कल हेल्मेट विसरा था .. तो लेने को आया था "
जगण्यात प्रत्येक क्षणी विनोद शोधणारा, आनंदी
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
28 Aug 2008 - 10:57 pm | १.५ शहाणा
आपण मराठी शब्द वापरल्यास चुक म्हणुन हासतो पण इंग्रजी वापर ल्यास उच्च्य समजतो
उदा. मेरी वाइफ आज आ रही है वाइफ हा इंग्रजी शब्द
मेरी बायको आज आ रही है बायको हा मराठी शब्द याला सर्व हासतात पण १ ले हे सुशिक्षीत समजतात
28 Aug 2008 - 11:10 pm | देवदत्त
मस्त एकदम :)
फक्त एक फरक वाटला. वरील बहुतेक उदाहरणांमध्ये काही मराठी शब्द हिंदीत वापरण्याकरीता बदललेले दिसतात. पण इंग्रजी शब्द आपण तसेच वापरतो. जरी त्यात काही क्रियापदे असली तरी. उदा. सेव्ह करणे.
28 Aug 2008 - 11:50 pm | कोलबेर
ऐकणारा हिंदी भाषीक असेल तर त्याला वरिल पैकी कोणते वाक्य कळण्याची शक्यता अधिक?
28 Aug 2008 - 11:39 pm | पिवळा डांबिस
हमको आज लवकर घरी जानेका है, हमारे आत्या के मुलगीका बारसं है....
28 Aug 2008 - 11:45 pm | कोलबेर
क्या डांबीसकाका? आत्या के मुलगी को आतेबहिण बोलते है! येवढा भी हिंदी नही येता? ;)
29 Aug 2008 - 12:13 am | पिवळा डांबिस
अरे हम मुंबईमे जन्म्या आउर मोठा हुवा....
हिंदी किधरसे शिकेगा?
:)
28 Aug 2008 - 11:56 pm | कोलबेर
आमच्या मित्राच्या एका वयस्कर आत्याचा 'ताट' ह्या शब्दाला हिंदीत 'टट्टी' म्हणतात असा (गैर)समज आहे.
त्यातुन अनेक प्रसंगी विनोद घडतात. उदा - 'रेल्वेमे खाना अच्छा नही मिलता, हात मे टट्टी ला के देते है!' वगैरे वगैरे...
29 Aug 2008 - 1:16 am | मुक्तसुनीत
'रेल्वेमे खाना अच्छा नही मिलता, हात मे टट्टी ला के देते है!' वगैरे वगैरे...
=)) =)) ठो !!ठो !!ठो !!
या टट्टी शब्दावरून आठवले... कॉलेजातल्या हिंदी भाषिक मुलींनाच एकदा "टट्टा" या पंजाबी-प्रणित दिल्लीकडील हिंदी शब्दाचा अर्थ समजावून सांगायची पाळी आली होती एकदा ! आम्ही समजावयाच्या आधी मुलींना असे वाटत असे की "टट्टा" चा अर्थ "मेल जेंडर्ड शिट्" आहे (अर्थात् , 'टट्टी' चे पुल्लिंग !) ...
29 Aug 2008 - 1:35 am | धनंजय
पंजाबीत लहान मुलांना "अआइई..." शिकवताना "कखग" वर गाडी आली येता जरा गंमत करतात.
"कक्का खख्खा गग्गा..." असे शिकवतात.
मात्र "टठड"साठी
"टेंका ठ्ठ्ठा, डड्डा..." असे शिकवतात.
कारण मेल जेंडर्ड शिटेबद्दल त्या वयातल्या बालकांना फार हसू येते.
गोव्यातील कोंकणीत मात्र त्याच अर्थाने लहान मुळे "कक्का" शब्द वापरतात. (बहुधा पोर्तुगिजोद्भव). त्यामुळे गोव्यातील मुलांनी पंजाबी शिकताना फिदीफिदी हसणे टाळाता येणार नाही.
29 Aug 2008 - 1:58 am | कोलबेर
...आणि मराठी बालकांची अशीच कुचंबणा 'गोट्या' मालिका बघताना व्हायची
29 Aug 2008 - 4:33 am | एक
तुम्हि ऍ आय एस एस अम एस मधे होतात का हो?
अस्साच प्रसंग आमच्या कॉलेज मधे घडला. मुलीं मधे फेवरेट असलेल्या एका मुलाला आम्हि देढ टट्टेवाला म्हणत असू ;)
29 Aug 2008 - 2:01 am | रेवती
माझा भाऊ लहान असताना (वय वर्षे ६) त्याच्या हिंदी बोलणार्या मित्राला चिडवत होता : भित्रीभागुबाई पळ गयी .
रेवती