दमलेल्या बापाची एक कहाणी...भाग-१

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
13 Aug 2015 - 7:39 pm

दमलेल्या बापाची एक कहाणी...भाग-१

रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये बसुन निघुन गेली आणि अरविंदने आपल्या डोळ्यांबाहेर येऊ पाहणार्या अश्रुंना मोकळी वाट करुन दिली.काही वेळेपुर्वी असणारा गोंगाट,गर्दी आता कमी होतं होती.इतक्यात अरविंदच्या पाठीवर कोणितरी हात ठेवला.
"आई,आता मी एकटा काय करु..." त्याने आपल्या लाडक्या आईला मिठी मारली.
"अरे असं काय लहान मुलांसारखं रडतोस.मुलगी म्हटल्यावर सासरी जाणारच की.तरी चांगलंच वाढवलंस तू तिला.चांगले संस्कार दिलेस आणि विशेष म्हणजे मुलगा तिच्याच पसंतीचा केलास.अरे,अनघाची आई नसताना तू तिला इतकं चांगल वाढवलंस तुझं जीवन सार्थ झालं.चल आता मी निघते तुझे पप्पा वाट पाहत असतील.”
असं म्हणत त्याची आई निघुन गेली.आता अरविंद आपल्या बंगल्यात एकटाच होता.फक्त एकटाच.रात्री न जेवताच तो बेडरूम मध्ये झोपायला गेला.कसबसं झोपायचा प्रयत्न केला पण झोपही येत नव्ह्ती.शेवटी कधीतरी पहाटेच त्याचा डोळा लागला.थोड्याच वेळात त्याला जाग आली ती घड्याळ्याच्या आलार्ममुळे.
" अनघा,अगं इतक्या लवकर आलार्म नको ठेवत जाऊस.मला अजुन झोपायचंय." असे उद्गार अरविंदच्या तोंडुन आले पण त्याची अनघा तिथे नव्हती.कदाचित ती परत येणारही नव्हती.
अरविंद झोपेतुन जागा झाला तेव्हा त्याला आठवले की आज त्याने ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती.अरविंद एका नामांकीत कंपनीमध्ये मॅनजरच्या पदावर होता.आज त्याला आठवत होते तो की कशी त्याची छकुली त्याची वाट पाहत शाळेबाहेर उभी होती आणि पहिल्यांदाच त्याला अनघाला आणण्यासाठी खुप उशीर झाला होता.
अनघा त्याची वाट पाहत उभी होती.अचानक पप्पांची गाडी तिला येताना दिसली.अनघाचा हिसमुरलेला चेहरा अचानक खुलला.पण लगेच तिने नाकावर लटका राग आणला.अरविंदची गाडी तिच्यासमोर येउन उभी राहिली आणि अनघाने लगेच गाडीकडे पाठ फिरवली.लांबुनच अरविंदने ते हेरले होते.त्याने हळूच गाडीचा दरवाजा उघडला.
"हाय बाळा,खुप वेळ वाट पाहावी लागली ना माझी??? अगं सॉरी माझी खुप महत्वाची मिटींग होती."
त्यावर अनघा काहीच बोलली नाही.
"अगं सॉरी बोलतोय ना...." अरविंद कान पकडत म्हणाला.
"तुमचं नेहमीचं असतं बाबा,रोज दहा पंधरा मिनीट उशीर करत होते आणि आज तुम्ही चक्क अर्धा तास लेट? ते काही नाही मी नाही येणार."
" अशी कशी तु नाही येणार चल आपण आज मस्त बगीचात जाऊत तुझ्या आवडीच आईस्क्रीम खाऊत."
खायचं आमिष दाखवल्यावर अनघा लगेच पिघळली आणि खुदकन हसली.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सतोंष महाजन's picture

13 Aug 2015 - 10:19 pm | सतोंष महाजन

सुरवात तर छान आहे.

संजय पाटिल's picture

14 Aug 2015 - 12:46 pm | संजय पाटिल

छान!

संजय पाटिल's picture

14 Aug 2015 - 12:46 pm | संजय पाटिल

छान!
पुढिल भाग टाका लवकर..

प्रिशू's picture

14 Aug 2015 - 3:33 pm | प्रिशू

सुरूवात आवडली.

एक एकटा एकटाच's picture

16 Aug 2015 - 11:38 pm | एक एकटा एकटाच

एक विनंती

पुढिल भाग थोडा मोठा टाका

जडभरत's picture

16 Aug 2015 - 11:47 pm | जडभरत

हं मस्त आहे सुरूवात!!!

त्या बोवाची आई अशी नातीचे लग्न झाल्याझाल्या कशीकाय घरी गेली? आणि आजोबा का नाही आले? आजारी आहेत काय? मान्य आहे की बायको स्वर्गवासी झालीये पण नंतरची आवरा आवर करायला/ घर मोकळे वाटू नये म्हणून कोणी थांबू नये याची गंमत वाटतिये. कदाचित पुढील लेखन तसे असेल अशी आशा आहे.
सासरच्या लोकांचं मन सांभाळ
तुझेही मन ते सांभाळतात यावर लक्ष ठेव असेही सांगायला हवे ना? ;) कारण मनं सांभाळणे ही सोपी गोष्ट नव्हे.

ती बुवाची आई अशी लगेच निघुन गेली....घर आवरायला कुणी थांबले नाही...याचं उत्तर मिळण्यासाठी कथेच्या शेवटपर्यंत थांबावे लागेल..

शित्रेउमेश's picture

19 Aug 2015 - 10:40 am | शित्रेउमेश

पुढचा भाग कधि????