"खेळ खेळूया सारे आपण"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
27 Aug 2008 - 10:56 am

आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं.
मला म्हणाले,
"संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही."
मी म्हणालो,
"भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन."
भाऊसाहेब म्हणाले,
"आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे.
ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजीकच खूप वर्षानी मी त्याला पाहिलं होतं.
कोकणात आम्ही जिथे राहत होतो,त्यापासून दोन तीन वाड्या पुढे हा राहायचा.ह्याच्या लहानपणीच ह्याचे वडील निर्वतले होते आणि ह्याच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला होता.त्यामुळे ह्याच्या हंसण्याखेळण्याच्या दिवसात ह्याची खूप हेळसांड झाली होती.मित्र सवंगडी चांगले न मिळाल्याने हा बराचसा उनाड आणि बेजबाबदार झाला होता.

लहान वयात खेळण्या बागडण्याच्या दिवसात,अशा मुलांचा खेळात किवा तसल्या काही ऍक्टीव्हीटीझमधे वेळ गेला तर त्या समाजविघातक संवयी पासून ही मुलं बचावली जातात.
आणि अगदी हेच ह्या मुलाच्या बाबतीत झालं.माझा एक भाऊ मुंबईला श्रीमंत लोकांच्या मुलांच्या शाळेत फिझीकल ट्रेनींगचा शिक्षक होता. त्याला त्या शाळेने इंग्लंडला पाठवून प्ले थेरपीस्टचं पुर्ण ट्रेनींग देवून मग इकडे त्यांच्या मुलांच्या शाळेतल्या खेळाच्या विभागाचा मुख्य केलं होतं.

तो असाच एकदा कोकणात काही दिवसासाठी घरी आला होता.त्याचं ह्या मुलावर लक्ष गेलं.माझ्याकडे त्याने त्या मुलाबद्दल चौकशी केली.ते ऐकून मला म्हणाला,
"हा मुलगा जात्याच असा उनाड दिसत नाही.त्याच्यावर काही मानसिक आगाध झाले असावेत.दिसायला हा जरी आडदांड,रागीट आणि हट्टी दिसला तरी हे वय त्याचं हंसण्या खेळण्याचं आहे.त्याच्या ह्या असल्या संवयी त्याच्या आईच्या आजाराने आणि आईला सोडून म्हाताऱ्या आजीकडे पोरका म्हणून राहिल्याने त्याच्या ह्या संवयीत नकळत भर पडली आहे.माझ्या ह्या मुक्कामात मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो."

भाऊसाहेब पुढे म्हणाले,
"रोज हा माझा भाऊ त्याच्या घरी जायचा.त्यानेच मला सांगतलं,"
"ह्या मुलाला प्रथम मी प्ले थेरपीच्या नियमानुसार काही मर्यादा मला त्याला घालाव्या लागल्या.प्रथम त्याला मी म्हणालो,कुठल्या गोष्टींची जरूरी असते आणि कुठल्यांची नसते हे समजावून घे.मी चित्रकलेसाठी नाही,मला चित्रकला येत नाही.खेळणी तोडण्यासाठी नसतात.पुस्तकं खिडकीच्या बाहेर फेकून देण्यासाठी नसतात.माझ्या प्रत्येक सुचना त्याने
आदरपुर्वक मानल्या पण एकदा म्हणाला,"खिडकीतून फेकून देण्यासाठी काय असतं?"
मी त्याच्या बरोबर कागदाचे छोटे,छोटे तुकडे करून एक एक खिडकीच्या बाहेर टाकून देत म्हणालो आपण दोघानी मिळून हे ठरवलंय तसं करतोय.

हे त्याल सांगून काय मिळालं याचा मी विचार करीत होतो.तो पर्यंत तो एका अडगळीच्या जागी जावून लपला.मी त्याला बाहेर यायला सांगितलं.त्यावेळी तो मला ओरडून म्हणाला "मी शोधून काढण्यासाठी नाही"कोणत्या गोष्टीच्या काय मर्यादा असतात हे त्याला कमीत कमी कळलं,हे पाहून मला बरं वाटलं.

दोन दिवसानंतर हळू हळू तो माझं ऐकून लक्षात घेत होता हे माझ्या लक्षात आलं.त्याला माझा आधार वाटत होता आणि म्हणून तो माझ्याशी काहीतरी संबंध जुळवायला पहात होता. त्यानंतर आणखी काही दिवसानी असल्या त्याच्या माझ्या लहान लहान खेळामुळे तो स्वतःहून निर्णय घेवून स्वतःला आणि दुसऱ्याला आदर देवून वागायला लागला.मी त्याची किती कदर करतो आणि तो जे काय म्हणतो ते पण कसं समजावून घेतो हे शिकायला लागला.

द्दयायला आणि घ्यायला तो शिकला आणि स्वतःवर प्रेम करू लागला.त्याला समजलं की दुस्रऱ्यानी त्याच्यावर प्रेम करायच्या लायकीचा तो आहे आणि हे ज्ञान मनात ठेवून स्वतःत बदल करू शकला,वाढू लागला आणि नवीन प्रकारचं वागणं शिकू लागला."
नंतर माझा भाऊ मला पुढे म्हणाल्याचं आठवतं,
"मला त्या शाळेने ह्या शिक्षणासाठी परदेशी पाठवलं,त्यातून मी एक गोष्ट चागली शिकलो की ही लहान मूलं खेळणी वापरून आणि खेळ खेळत असताना त्याचा उपयोग एकमेकाशी दुवा वाढवण्यासाठी नकळत ही कला वापरत असतात.हे पण मला ठावूक झालं की काही तरी जादू होत असावी की ही मूलं आपलं अंतरमन वापरून काही तरी नजरेत येईल असं खेळ खेळताना दाखवतात.

तसं पाहिलं तर खेळ हा एक चालू पास टाईम आहे.खेळता खेळता पोक्तपणा येतो आणि शिकायला मिळतं,खेळत असताना स्वतः हजर असल्याने आपल्या अस्थित्वाची जाणीव होते.
त्या मुलाला काय किंवा आपल्या सर्वांना काय हा एक चान्स आहे की मनाच्या आतून काय हवंय आणि माणुसकीला धरून आपण ते किती आनंदाने घेतो."

हे सर्व सांगून प्रो.देसाई जरा स्तब्ध झाले.आणि मला पुढे म्हणाले,
"हा अलिकडेच दुकानात भेटलेला गृहस्थ हा तोच मुलगा होता हे आठवून मी क्षणभर अचंबीत झालो.माझ्या भावाची त्यावेळेला त्याला झालेली मदत,त्याच्या आयुष्यात एक परिवर्तन होण्यात झालं.तो लहानपणापासून त्याच्या आईला समजावून घेवू लागला.तिचा काहीच दोष नाही हे त्याला त्यानंतर लक्षात आलं असावं.एकदा माझा भाऊ मला भेटला होता,ह्याचा विषय आमच्या दोघांच्या बोलण्यात आला होता.मोठ्या विश्वासाने भाऊ सांगत होता की ती केस यशस्वी होणार याची त्याला खात्री होती."

मी भाऊसाहेबाना उठता उठता म्हणालो,
"तुम्ही जर मला ही गोष्ट सांगितली नसती तर खेळणी आणि खेळ हे मी सर्वसाधारण पास टाईमच समजलो असतो.त्याचं मला महत्व कळलं.भाऊसाहेब मला एक गाणं आठवतं

"जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळूया सारे आपण
मुलां संगती छान
खेळूया मुलां संगती छान
याला जीवन ऐसे नांव
दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नांव"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

5 Sep 2008 - 4:05 pm | लिखाळ

"ह्या मुलाला प्रथम मी प्ले थेरपीच्या नियमानुसार काही मर्यादा मला त्याला घालाव्या लागल्या.प्रथम त्याला मी म्हणालो,कुठल्या गोष्टींची जरूरी असते आणि कुठल्यांची नसते हे समजावून घे.मी चित्रकलेसाठी नाही,मला चित्रकला येत नाही.खेळणी तोडण्यासाठी नसतात.पुस्तकं खिडकीच्या बाहेर फेकून देण्यासाठी नसतात.माझ्या प्रत्येक सुचना त्याने
आदरपुर्वक मानल्या पण एकदा म्हणाला,"खिडकीतून फेकून देण्यासाठी काय असतं?"
मी त्याच्या बरोबर कागदाचे छोटे,छोटे तुकडे करून एक एक खिडकीच्या बाहेर टाकून देत म्हणालो आपण दोघानी मिळून हे ठरवलंय तसं करतोय.

हे त्याल सांगून काय मिळालं याचा मी विचार करीत होतो.तो पर्यंत तो एका अडगळीच्या जागी जावून लपला.मी त्याला बाहेर यायला सांगितलं.त्यावेळी तो मला ओरडून म्हणाला "मी शोधून काढण्यासाठी नाही"

हा संवाद मला आवडला.. समुपदेशनाचे मह्त्वच आपल्या लेखातून अधोरेखित होत आहे.
काय करु नये ते आपल्याला नेहमीच सांगितले जाते. त्याची प्रतिक्रिया म्हणून काय करावे हे अनेकदा सांगितले जात नाही. पण चांगले पालक ते सांगताना दिसतात. मुल पेनने भिंतीवर रेघा मारित असेल तर त्याला थपडा मारुन त्या पासून परावृत्त करण्याऐवजी रेघा मारण्यास योग्य असा भिंतीवरील फळा आणि खडु ते त्याला देतात आणि त्याला कशासाठी काय वापरायचे ते आपोआपच कळते.
--लिखाळ.