हरिद्वारची कावड यात्रा - एक उन्माद

दा विन्ची's picture
दा विन्ची in जनातलं, मनातलं
11 Aug 2015 - 11:27 pm

आज घडीला आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी आहे आणि त्यापैकी अंदाजे तीन कोटी हिंदू शिव भक्त १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या बारा दिवस चालणाऱ्या कावड यात्रेसाठी देवभूमी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये येवून गेले . एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक्स .
आपल्या सगळ्यांना आपल्या आषाढी वारी आणि त्या गर्दीचे भारी कौतिक . यावर्षी बहुधा ५ ते ६ लाख लोक विठू माउलीच्या दर्शनासाठी आले असतील . हि तुलना फ़क़्त या यात्रेची भव्यता समजावी म्हणून

पण मला एक फरक जाणवला. वारीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य, शिस्त आणि भक्तिभाव सहज जाणवतो .
या उलट कावड यात्रा म्हणजे एक गुर्मी , उन्माद , आक्रस्ताळेपणा. कोणीही, कसलीही शिस्त पाळत नाही. एकेका दुचाकीवर तीन-चार जण सोबत दनदणती डॉल्बी. उडत्या चालीच्या हिंदी चित्रपट गीतांवर बेतलेली शिव गाणी . भक्तांच्या हातात त्रिशूल व लाठ्या . आणि त्यांचा थोड्याही कारणासाठी वापर करायला उत्सुक असलेले भक्तगण . जवळपास सर्वत्र एक आठवडा सर्व शाळांना सुट्टी असते . कारण गर्दी . नवी दिल्ली , पंजाब , हरियाणा , उत्तर प्रदेश , हिमाचल प्रदेश, राजस्थान व संपूर्ण उत्तराखंड मधून हे लोक्स येतात .
स्थानिक लोकांशी चर्चा करताना असे जाणवले कि बरीच जनता दुसरे काही काम धाम नाही आणि शिवाय सार्वजनिक खर्चाने म्हणजे जवळपास बऱ्याचदा फुकट सहल म्हणून सध्या एवढी गर्दी असते .

पण मला तर हे सर्व बघताना आणि सहन करताना वारी सारखी पवित्र भावना काही वाटत नाही .
ही कावड यात्रा साधारण तीन प्रकारची असते . पहिली आपल्या वारी प्रमाणे हर की पौडी हरिद्वार मधून गंगाजल घेवून बऱ्यापैकी शांतपणे चालत आपापल्या गावी जाऊन तेथील शंकराला अभिषेक करणारे.
दुसरा प्रकार म्हणजे आपापल्या वाहनावरून हि यात्रा करणारे .
आणि तिसरा सर्वात रुद्र भीषण भीतीदायक प्रकार म्हणजे "डाक कावड यात्रा" यातला महत्वाचा नियम म्हणजे हे गंगाजल सतत हलते राहिले पाहिजे , (झोपले नाही पाहिजे ). यात एक तर ५० ते ६० जणांचा संघ असतो . गाड्यावर किवा टेम्पो ट्रक मध्ये, आणि बहुधा चिलीम, सिगारेट किंवा बिड्या ओढत बसलेले . धावण्याच्या रिले शर्यतीप्रमाणे यात गंगाजल घेवून लोक्स आळीपाळीने धावतात . वाटेत जर कुठली दुचाकी किंवा पादचारी आले तर सरळ धक्का देवून किंवा काठीने मारून बाजूला करतात . आणि यांची संख्या शेवटच्या दोन दिवसात (काल आणि आज ) जवळपास एक कोटी आहे. या दोन दिवसामध्ये डीझेल व पेट्रोलचा अतिप्रचंड अपव्यय तीस चाळीस अपघाती मृत्यू, शेकड्यांनी माणसे मुले हरवणे घडते. भुरटे चोर , मोबाईल चोर इत्यादी पण त्याच बरोबर प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा होते.
आजच्या दिवशी एखादा रुग्ण किंवा आपण आपले महत्वाचे काम आहे म्हणून उलट दिशेने म्हणजे दिल्लीकडून हरिद्वारला गाडी रस्त्याने येणार असू तर केवळ केवळ अशक्य .

मला विचाराल तर निव्वळ मनुष्य बलाचा केवळ गैरवापर . सोबत थोडे विडीवो देण्याचा प्रयत्न करतो
https://www.youtube.com/watch?v=TDVvPZE95ao

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

उन्माद ही भारतीय समाजजीवनाची ओळख बनत चालली आहे आजकाल.

सहमत! खरंच ही भक्ती आहे का? आणि असले प्रकार करून आणलेलं तथाकथित पवित्र जल खरंच देवाला प्रसन्न करेल?
बेजबाबदार पणे गाडी चालवणं, वाटेत येणार्‍यांना उडवणं हे काय गलिच्छ प्रकार आहेत? खरंच असं घडतंय का? दा विंचीजी कृपया अजून काही विश्वासार्ह संदर्भ / रिलायबल सोर्सेस असतील तर ते ही नमूद करावेत. कारण तुम्ही दिलेल्या तूनळी च्या व्हिडिओवरून बर्‍याचशा गोष्टींचा खुलासा होत नाही.

लाल टोपी's picture

12 Aug 2015 - 3:52 pm | लाल टोपी

ही मंडळी जेथे पोहोचतात तेथे गेले एक वर्ष रहात आहेत मुलांना शाळेत जा णे, दिवसभरातील इतरही कामांसाठी गंगापार करुन रामझुला, लक्ष्मणझुला या पुलांचा वापर करावा लागतो. दोन बाईक्स समोरा समोरुन जातील येवढा अरुंद पुल आहेत हे, गेले दोन आठवडे पूर्ण्पणे बंद आहेत. शाळांना सुट्टी आहे.

वेल्लाभट's picture

12 Aug 2015 - 3:53 pm | वेल्लाभट

एक नंबर बोललात! हे हे आणि हेच सत्य आहे.

तुडतुडी's picture

12 Aug 2015 - 1:24 pm | तुडतुडी

सहमत . हे UP , MP वाले खरंच हरामी असतात . आम्ही महाकालेश्वर च्या मंदिरात गेलो होतो तर सगळे लायनितून मधेच घुसत होते . म्हातारे सुधा अपवाद नवते . आणि कोणाला काही बोलायचा अवकाश , लगेच शिव्या द्यायला आणि भांडण करायला पुढे .हे लोक देवाचं दर्शन घेवून काय पुण्य
मिळवत असतील ? लहान लहान मुलं सुधा मोठ्यांना वाट्टेल ते बोलतात .

माहितगार's picture

12 Aug 2015 - 1:55 pm | माहितगार

मराठी विकिपीडियावर कावड नावाचा लेख अलिकडेच लिहिला गेला असून त्यात महाराष्ट्रातल्याही २-३ कावड यात्रा/जत्रांची माहिती आंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

दा विन्ची's picture

12 Aug 2015 - 3:10 pm | दा विन्ची

जडभरतजी, गेले सव्वा वर्ष मी आय आय टी रुरकी मध्ये पी एच डी साठी रहात आहे . मी लिहिलेला हा प्रत्यक्ष दर्शी अनुभव आहे . काल रात्री उशिराचे अजून दोन video मी घेतलेले आहेत . ते पण लवकरच डकवतो . पण खरच शहाणी माणसे हे दोन दिवस घराबाहेर पडत नाहीत. ही तथाकथित भक्ती अक्षरश: डोक्यात जाते

सांगलीकर दा विन्ची

तुमच्यावर अविश्वास नाही पण खरंच असं काही घडेल हे मान्य करायला मन तयार होत नाही. देवाच्या नावाखाली काय ही गुर्मी! बोलतीच बंद! :(

लाल टोपी's picture

12 Aug 2015 - 3:42 pm | लाल टोपी

कामानिमित्त सध्या मुक्काम ऋषिकेश् आहे गेल्या तीन आठवड्यापसून चालू असलेला हा उन्माद अनुभत आहे. अतिशय ओंगळ्वाणा अनुभव आहे कोठेही भक्ती, श्रध्देचा लवलेश नसलेला; जराही माणुसकी नसलेला प्रचंड गोंधळ घालणारा आणि कमालीच्या माजुर्ड्या लोकांचा घोळका. या लोकांबद्द्ल स्थानिक लोकांना जराही आपुलकी वाटत नाही, खास करुन हरियाणा मधून येणारे भाविक (?) येणा-या जाणा-या कोणत्याही वयाच्या स्त्रियांशी; विशेषतः विदेशी महिलांशी जे वर्तन करतांत ते अक्षरशः लाज आणणारे असते. वर लेखकाने म्हंटल्याप्रमाणे पंढरीच्या वारीशी खरोखरीच कोठेही तुलना नसलेला; विविध देवतांच्या नांवाने ओंगळ्वाण्या घोषणा देणारा हा अनिर्बंध लोंढा नकोसा झाला आहे पण अजुन काही दिवस सहन करण्यापलीकडे खरेच काहीच हातात नाही.

अरेरे काय घाणेरडे प्रकार! खड्ड्यात जाओ असले सण! परमेश्वरच भयानक शासन देवो, धर्माच्या नावाखाली असले ओंगळ वर्तन करणार्यांना!!!

अरेरे काय घाणेरडे प्रकार! खड्ड्यात जाओ असले सण! परमेश्वरच भयानक शासन देवो, धर्माच्या नावाखाली असले ओंगळ वर्तन करणार्यांना!!!

या असल्या लोकांच्यात भक्तीचा शाट्ट लवलेश नसतो. थेरं आहेत सगळी.

तथाकथित भक्त लोक, म्हणजे नुसता वैताग असतो.

जावू दे.

द-बाहुबली's picture

12 Aug 2015 - 8:56 pm | द-बाहुबली

काय झाले पुढे ? कर्णा थांबला का ? की अजुन त्रास आहेच ?

दा विन्ची's picture

12 Aug 2015 - 9:52 pm | दा विन्ची

आपल्याकडे जसं अनंत चतुर्दशीच्या दुसर्यादिवशी पण गणपती विसर्जनाचा थोडाफार त्रास असतो तसेच . बाकी आज दुपारपासून थंड आहे . मुलांची शाळा पण उद्यापासून सुरु होत आहे .

श्रीरंग_जोशी's picture

12 Aug 2015 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

माझा चुलतभाऊ २००२-०४ या काळात आयआयटी रुडकी येथे शिकत होता. तेव्हाही त्याच्याकडून असे सर्व 'बम भोले' प्रकार ऐकले होते.

संदीप डांगे's picture

12 Aug 2015 - 9:22 pm | संदीप डांगे

कावड यात्रा बालपणीच्या काही सुंदर आठवणींमधील एक आहे. अकोल्याच्या राजराजेश्वराला अभिषेक घालण्यासाठी वाघोलीवरून कावड भरून आणणे हा एक सोहळा असायचा. शिवभक्तीने ओथंबलेली स्वतः भक्त गात असलेली लोकगीते, तो विशिष्ट लोकवाद्यांचा नाद, त्यांच्या निखळ जुगलबंद्या, कावडस्पेशल लोकनृत्ये, सादरीकरण, अनवाणी पायाने आणि निष्पाप मनाने केली जाणारी शेकडो किमीची पायपीट, फक्त भारावूनच टाकणारं वातावरण आणि ही सगळी गरीब, गावकरी मंडळी. पोटापाण्यासाठी रोजंदारीवर मिळेल ते काम करणारी, त्यांच्यासोबत खांदा लावून श्रीमंत आणि उच्चवर्गीयही त्याच नादात.

लेखातले भयानक वर्णन वाचून हृदयातली ही चिरकाल टिकलेली आठवण अजून गच्च धरून ठेवावीशी वाटली. अकोल्यातली कावडयात्राही खूप बदलली आहे. बहुतेक आम्हालाच आमचे बालपण सांभाळता आलं नाही.