पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जनातलं, मनातलं
9 Aug 2015 - 10:26 am

(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र
क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत)

रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!
चला मग काय फाटाफट तयारी करून , ठाणे स्टेशनात शिरलो , खोपोली लोकल (ह्याला खपलो लोकल म्हणायला पाहिजे खर तर) डॉक्टर मुलुंड हून , कंजूस आणि मूवी डोंबिवली हून आणि मी आणि मामलेदारचा पंखा (माप ) ठाण्याहून अस ठरलं होत.

ठाणे प्लाटफार्म आणि गर्दी ह्यांची फ्रेन्डशिप डे ला पण पक्की दोस्ती होती , तितक्यात मापचा फोन आला , त्याला कधीही पाहिलं नव्हत म्हणून फलाटावर एका ठिकाणी भेटायचं ठरलं , कानाला फोन लावून एक किडकिडीत बांध्याचा युवक जवळ येताना दिसला अर्थात तो माप नव्हता , त्याच्या मागे एक दमदार व्यक्तिमत्व उंच-पुरा आणि भारदस्त माणूस म्हणजे माप होता , ओळख झाल्यावर , खोपोली लोकल स्टेशनात आगमन झाल , मोजून शून्य लोकांना चढायला जागा असताना आम्ही बरेच जण लोकल मध्ये कोचाकले गेलो , गर्दी मध्ये जवळपास संपूर्ण अंग अगदी चेपून मिळाल. एकाच डब्ब्यात असून आम्ही एक्मेंकांना संपर्क शून्य अवस्था अनुभवली

platform

पळसधरी फलाटावर सर्व मिपा कर भेटले (मी एकटाच टी -शर्टात होतो बाकी चारी शर्टात :) ) मग जुन्या जाणत्या (अनुभवी ) मिपा करांनी आपण सर्व समूहाच्या मागे धबधब्यावर न जाता एका ओढ्या शेजारी आणि झाडाखाली गप्पांचा फड मांडला , गप्पा मारता मारता खादाडी ला पण सुरुवात झाली सुरुवातीलाच डॉक्टरांनी गुलाब जांम , कंजूस ह्यांनी आणलेलं फरसाण केळी , चविष्ट गप्पा आणि खादाडी नंतर पळसदरी धरण आणि श्री स्वामि सर्माथांचा आश्रम पाहिला , मठात एक फक्कड (खरतर टुकार पण कट्ट्यासाठी सगळ चं छान छान लिहाव लागत) चहा मारला , मठाच्या बाहेर एका हुरहुन्नरी मिपा नावाशी साधर्म असलेला बोर्ड पाऊन सगळे चकित झाले

(काहीच्या) काही क्षणचित्रे

जाणते कट्टेकरी

kattekari

आजु बाजुचे काही फोटो

mashroom

vel

muvi

Doc

asmadik

maap

आलेल्या मिपा करांविषयी मला काही गोष्टी नव्याने जाणवल्या त्या म्हणजे त्यांना प्रचंड ज्ञान आणि अनुभव , कंजूस , डॉक्टर , माप आणि मुवी ह्यांची अनुभवाची शिदोरी एवढी आहे कि संपूर्ण दिवस कमी पडेल , डॉक्टर आणि त्यांचा प्रत्येक बाबतीत प्रचंड उत्साह अफलातून आहे.
अनेक वेग वेगळ्या विषयांवर चर्चा , कंजूस यांनी आणलेले वांग्याचे काप आणि पोळ्या , एकदम टिपिकल छायाचित्र ह्या सर्वात दिवस दुपार कडे झुकला हे कळल चा नाही

पळसधरी (पुण्यनगरी) :- हे कर्जत पुढील खोपोलि मार्गावरच एका दिवसात सहज बघून होणारे सुटसुटीत ठिकाण आहे , तिथे बघण्यासारख म्हणजे धरण , मठ आणि धबधबा आहे

वावरलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

9 Aug 2015 - 10:53 am | टवाळ कार्टा

पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात?
मठातल्या पाटीचा फोटो?
बाकी मी हा कट्टा मिसला :(
मुवि (प्रत्येक फोटोत) असे का बस्लेत? का त्यांचे बाबा (गुरु या अर्थाने) मध्ये मध्ये सूक्ष्म देहाने मुविंच्या अंगात येउन जायचे आणि मग लगेच तु क्लिकवायचा =))

पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात?
मठातल्या पाटीचा फोटो?

हेच. बाकी कट्टा छान! वृत्तांत खूपच त्रोटक आहे.

ह्याचा खुलासा "पेठकर-काकां" बरोबर होणार्‍या कट्ट्याच्या वेळी नक्कीच करण्यात येईल.

टवाळ कार्टा's picture

9 Aug 2015 - 12:19 pm | टवाळ कार्टा

खिक्क...ते तर दोन दोन कट्टे करायचा प्लान करत आहेत :)

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 12:27 pm | मुक्त विहारि

आपण दोन्ही कट्ट्याला हजेरी लावू या.

(आयला, ही शतशब्द स्पर्धा, कधी संपणार कोण जाणे.आत्ता धागे काढणे म्हणजे, धाग्यांचे विसर्जनच.)

नाखु's picture

10 Aug 2015 - 8:58 am | नाखु

+१११ अति अवांतरला

आता पहीली गोष्ट : "मुवी" ज्या झाडाखाली बसतात तोच अजानवृक्ष होतो असे समजले आहे ! (संदर्भ ज्ञानेश्वर माउली)

सूक्ष्म अवांतर : अता "बाबा महाराज" कथा अपेक्षीत

बाबाप्रवचन्नितवाचक नाखु

मुक्त विहारि's picture

10 Aug 2015 - 9:06 am | मुक्त विहारि

बाबांच्या कृपेने, ह्यावेळी ३-१३ ग्रहावर बर्‍याच काल वास्तव्य केले होते.

तिथल्या अनुभवांचे कथा-सार लवकरच प्रकाशीत करीन.

माझीही शॅम्पेन's picture

10 Aug 2015 - 2:48 pm | माझीही शॅम्पेन

पळसदरी पुण्यात कधीपासून धरतात?

थांबा ... थांबा सांगतो

पळसधरी म्हणजेच पुण्यनगरी , कदाचित जून नाव किंवा ज्या प्रभागात आम्ही गेलो होतो त्याला पुण्यनगरी म्हणत असावेत , खालील डॉक्टरांनी टाकलेला फोटो (श्री दादा दरेकर उल्लेख असलेला)

रच्याकाने पुण्यालाच पुण्यनगरी अस का म्हणत असावेत ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Aug 2015 - 11:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश. :)

मुक्त विहारि's picture

9 Aug 2015 - 11:16 am | मुक्त विहारि

थोडी भर.....

कंजूस ह्यांनी सुचना केल्या प्रमाणे, डोंबोलीहून "खोपोली" लोकल न पकडता, तीच लोकल कर्जत हून पकडाची ठरवली.

आम्हाला पण कर्जत लोकल मध्ये गर्दी जाणवली, पण सुदैवाने, कल्याण पासून बसायला जागा मिळाली.

कंजूस ह्यांच्या बरोबर गप्पा मारता-मारता समजले की, शनिवार-रविवार, घराबाहेर पडू नये.तसा पण "कासव- महोत्स्वाच्या वेळी आणि "कास-पठाराच्या" वेळी शनिवार-रविवारच्या गर्दीचा अनुभव घेतला होताच.

आम्हाला जरी वर्षातून ५-६ महिने सुट्टी असली तरी, इतर बरेच मिपाकर अशा सलग सुट्ट्यांचे धनी नसतात.त्यामुळे त्यांच्या सोईने कट्टा ठरवणे भाग पडते.

कर्जतला उतरलो आणि आधी मिपा-परंपरे नुसार, पोट-पुजा केली.(अर्थातच मिसळ-पाव आणि बटाते-वडे.)

कर्जतला "खोपोली" लोकल पकडली आणि गर्दीत माझी आणि कंजुस ह्यांची चुकामुक झाली.सुदैवाने सगळेजण एकाच डब्यात असल्याने, पळसदरीला उतरल्या-उतरल्या, सगळ्या मिपाकरांची गाठ-भेट झाली.

ह्या वेळी लक्षांत आलेल्या गोष्टी......

१. शनिवार-रविवार घरीच बसावे.

२. तरूण पिढी आपल्या पेक्षा बरीच पाऊले पुढे असल्याने, ह्या पिढीशी जुळवून घेता येत नसेल तर, आपला वेगळा मार्ग आधीच आखून घ्यावा.

३. सुबोध खरे बरोबर असतील तर, आपला कॅमेरा नेवू नये. (परत एकदा न्यूनगंडाची भावना निर्माण होते.)

४. कंजूस प्रवासा-बाबत जे काही ठरवतील, त्याला मान्यता देणे.प्रवास सुखकर होतो.

५. बर्‍याच मिपाकरांचा उत्साह, कट्याला नक्की येणार, इतपतच असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2015 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

कट्टा रंगलेला दिसतोय ! मग टाका की अजून किस्से आणि फटु :)

माशेचा वृत्तांत आणि मुविंचा उपवृतांत दोन्ही मस्तच.
फोटो अजून हवे होते.

पळसदरी कट्टा, क्षणचित्रे.
१)

२)

३)

४)

४)

पैसा's picture

9 Aug 2015 - 12:31 pm | पैसा

मस्त कट्टा आणि वृत्तांत! मुविंचा उपवृत्तांतही आवडला. फटु बघून डॉक्टरांकडचे फटु अजून किती छान असतील याची कल्पना करत आहे.

शि बि आय's picture

9 Aug 2015 - 12:57 pm | शि बि आय

कट्टा वृतांत छानच ..यायची खूपच इच्छा हाेती पण नाही जमू शकले.अजून गमती जमती येऊ द्या

दिपक.कुवेत's picture

9 Aug 2015 - 1:34 pm | दिपक.कुवेत

ईथल्या अश्या तळपत्या उन्हात असे सुखद गारव्याचे फोटो / व्रुत्तांत टाकू. छोटेखानी कट्टा फर्मास झालेला दिसतोय. अर्थात डॉक आणि कंजूस असल्यावर विषयांची कमी पडत नाहि. आपण शांत बसून निमुट एकावे हे अनुभवांती सांगतोय. बाकि मुवि म्हणतात त्या प्रमाणे "कंजूस प्रवासा-बाबत जे काही ठरवतील, त्याला मान्यता देणे.प्रवास सुखकर होतो." ह्याच्याशी प्रचंड बाडिस.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Aug 2015 - 2:13 pm | माम्लेदारचा पन्खा

कट्ट्याची आकर्षणस्थळे-
१. खोपोली लोकलची न भूतो न भविष्यति अशी गर्दी ( मसाज छानच मिळाला आपसूक... )

२. पळसदरी स्टेशनशेजारचा ओढा आणि झाडाची थंडगार सावली...

३. डॉकनी आणलेले जंबो साईझ गुलाबजाम....

४. धरणाचे स्वच्छ आणि गार वाहते पाणी.....

५. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर मठ...( इथून माचू पिचूची डोंगर रांग दिसते...समोरच !)
६. धरणाच्या काठाने वार्‍याच्या प्रचंड झोतात मारलेला फेरफटका.....

७. कंजूस ( हे नाव का घेतलं असावं बुवा) या नावाला न शोभणारा आणलेला खूपसा खाऊ आणि वांग्याचे अप्रतिम काप....( तों पा सू......!!)

८. आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भेटल्यापासून निघेपर्यंत मारलेल्या बेहिशोब आणि चौफेर गफ्फा.....!!

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 2:51 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 2:56 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 2:59 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:00 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:00 pm | सुबोध खरे

.

.
मठावर लावलेली पाटी बुचकळ्यात टाकणारी होती

प्रचेतस's picture

9 Aug 2015 - 3:56 pm | प्रचेतस

अगागागागागा.
कहर आहे. =))

वरच्या दोन ओळी तर फारच
__/\__

नाखु's picture

10 Aug 2015 - 9:03 am | नाखु

मिपावर अब्रुनुस्कानीचा दावा ठोकेल काय? या नावाचा इथे फारसा आदरार्थी+समंजस वापर होत नाही म्हून!

किरकोळ वाचक नाखु

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2015 - 10:11 am | टवाळ कार्टा

ठोSSSSSSS
अग्गाग्गाग्गा....डायरेक्ट पोचवले की

पैसा's picture

10 Aug 2015 - 11:54 am | पैसा

खपले! वारले! साक्षात निर्वाणप्राप्ती.

प्यारे१'s picture

10 Aug 2015 - 12:48 pm | प्यारे१

दादा दरेकर यांना विनम्र श्रद्धांजलि.

दादा दरेकर यांच्या नावाचा वापर करुन विकृत गरळ ओकणाऱ्या आयडीचा तीव्र निषेध. (एकच व्यक्ति आहे का या नावाची असा प्रतिसाद येणार आहे हे ठाऊक असलं तरी अल्लाताला मुआफ़ नहीं करेगा)
इथे मिपा आयडी बद्दल हसणाऱ्या पण प्रत्यक्षात खऱ्या मृत व्यक्तीची टर उडवणाऱ्या आयडिंबाबत अपेक्षित कृती म्हणून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
माणूस मेलं आहे आणि ज्येष्ठ लोकांना विनोद सुचतात. चान चान

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:07 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:07 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:08 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:09 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

9 Aug 2015 - 3:10 pm | सुबोध खरे

.

मस्त फोटो.मागच्या वर्षीचा कट्टा आठवला!

सुधांशुनूलकर's picture

10 Aug 2015 - 6:26 pm | सुधांशुनूलकर

मागच्या वर्षीच्या कट्ट्यात मुविंनी परदेशातून आणलेली (बादलीभर) चॉकलेट्स...

बाबा योगिराज's picture

9 Aug 2015 - 3:40 pm | बाबा योगिराज

फोटु आवडले.....

कट्टा वृत्तांत, मुविंचा उप वृत्तांत आणि कंजूस काका आणि डॉक्टरांचे फोटो मस्तच!
कट्टयाचा धागा शुक्रवारी रात्री उशीरा आला. शनिवार रविवार मी कर्जतमध्येच असल्याने मिपावर यायला मिळाले नाही. त्यामुळे या कट्टयाला यायला जमले नाही. आधी समजले असते तर किमान रविवारी कर्जत स्टेशनवर मिपाकरांना भेटता आले असते.

गेल्याच वर्षी इथे येऊन गेलो असल्याने जास्त वाईट वाटले नाही. आता धरणातल्या पाण्याची बरीच वाढलेली जाणवली. बाकी तो टेबलवर गप्पा मारत जेवतानाचा फोटो टाकायला हवा होता.

बहारदार अन निवांत कट्टा झालेला दिसतोय.

थोडक्यात वर्णन व फटु आवडले.

माच्चू पिच्चू ,रिओ बद्दल माझीही शँपेनकडून बरेच ऐकायचे आहे.
मापंशी क्रिमिनॅालजी ,इंडिअन पीनल कोड बद्दल चर्चा अशाच एका झाडाखालच्या कट्टयावर करायची आहे.
( झाबवाला यांची पुस्तके वाचून कायदाची आवड उत्पन्न झालेला.)
))७. कंजूस ( हे नाव का घेतलं असावं बुवा) ))------ज्यास मी काटकसर म्हणतो त्यास लोक कंजूसगिरी म्हणतात.

वृत्तांत आणि फोटो आवडले!

फरसाण केळी हा नविन खाद्यप्रकार आहे का? म्हणजे फरसाण फ्लेवर असलेली केळी का केळी फ्लेवर असलेलं फरसाण्??...खुलासा करा बुवा!!!

मुक्त विहारि's picture

10 Aug 2015 - 12:11 pm | मुक्त विहारि

फरसाण + केळी

दा विन्ची's picture

10 Aug 2015 - 12:27 pm | दा विन्ची

कट्टा वृतांत आवडला. पण जर फोटो खाली नावे असती तर नवीन लोकांना ओळख झाली असती

अहो,

मग या की एखाद्या कट्ट्याला.

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 12:35 pm | विशाल कुलकर्णी

हायला भारीच..
पावसाळा आहे तोवर एक दौरा कोदिवड्याचा पण करायचा का?

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2015 - 12:51 pm | टवाळ कार्टा

कोंदिवडे का? मला चालेल

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा वा, मस्त कट्टा ! सुंदर फोटोंमुळे अजून बहार आली !

नूतन सावंत's picture

10 Aug 2015 - 3:26 pm | नूतन सावंत

कट्ट्याचे वर्णन आणि फोटो सुरेख.

खटपट्या's picture

11 Aug 2015 - 4:17 pm | खटपट्या

ज ब री ही !
कंजूष यांनी डकवलेले फोटो दीसत नाहीयेत.
घरी गेल्यावर दीसतात का बघतो. कट्टा मीस केल्याची प्रचंड हळ्हळ वगैरे वाटतेय.. :(