आनंदाचा क्षण आणि ....

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
4 Aug 2015 - 7:50 pm

त्याच्या आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. ही आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्‍या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटलवर पोहोचला.

त्याला बघताच बायकोच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. "असे हसता काय?" बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला, "कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्यासारखी. आता तुला मैत्रीण मिळाली, तुम्ही दोघी मिळून माझ्या डोक्यावर किती मिरे वाटणार या कल्पनेनेच मला हसू आले." बायको म्हणाली, "तुमच्या जिभेला काही हाड..." 'नाहीच आहे, हो न परी', म्हणत तो जोरात खळखळून हसला. त्याचा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण.

तो बेंचवर वॉर्डच्या बाहेर बसला होता. एक वयस्क बाई त्याच्या शेजारी येऊन बसली. तिने त्याला विचारले, क्या हुआ 'काके'? 'लक्ष्मी आयी है घर में', तो उत्तरला. ते ऐकून तिचा चेहरा काळवंडला, त्याच्या पाठीवर हात फिरवत सांत्वन करत म्हणाली, चिंता मत कर काके, अगली बार लड़का होगा. तिचे सांत्वन करणारे शब्द ऐकून त्याचे डोके सटकले 'मला मुलगी झाली, मी खूश आहे, हिला कशाचे दुःख'. चांगले सुनावले पाहिजे हिला. पण तो थबकला. दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्यापही सासरहून कुणीही भेटायला आले नव्हते, तिचा नवरासुद्धा.. ..

काके = पोरा (मुलगा)

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

4 Aug 2015 - 7:54 pm | श्रीरंग_जोशी

कटू वास्तव मांडण्याची पद्धत आवडली.
कधी तरी अशा कथा लिहिण्याची वेळ न येवो हा आशावाद अजुन तरी जीवंत आहे.

विवेकपटाईत's picture

4 Aug 2015 - 9:14 pm | विवेकपटाईत

दिनांक २३.९.१९८८, स्थान बी एल कपूर हॉस्पिटल, घडलेली खरी घटना

अमृत's picture

5 Aug 2015 - 9:18 am | अमृत

तुमचा अधिक मास स्पेशल पाकृमुळे थोडी लिंक लागली काका.

जडभरत's picture

4 Aug 2015 - 9:29 pm | जडभरत

अर्र.
कटु सत्य!

अमृत's picture

5 Aug 2015 - 9:19 am | अमृत

कटू सत्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 3:12 am | डॉ सुहास म्हात्रे

दुर्दैवी सत्य !

कथा आवडली हेवेसान.

पुण्याची दीपी's picture

6 Aug 2015 - 4:02 am | पुण्याची दीपी

दोन दिवस अगोदरच त्या बाईच्या मुलीला, मुलगी झाली होती. अद्यापही सासरहून कुणीही भेटायला आले नव्हते, तिचा नवरासुद्धा.. .

त्याच्यासारखा कमनशिबी तोच!

पुण्याची दीपी's picture

6 Aug 2015 - 4:06 am | पुण्याची दीपी

'लक्ष्मी आयी है घर में'
हे खूप भावलं. तुम्ही खरे नशिबवान

हे आपल्याकडे बरेचदा घडतं. लोक वेडे असतात. कश्याला महत्व द्यावं हे समजत नाही.

दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे!

रातराणी's picture

7 Aug 2015 - 11:19 am | रातराणी

हेच मनात आले. वर्षामागून वर्षे गेली तरी काही समजुती रक्तात भिनल्यासारख्या भिनल्या आहेत समाजमनात.