भात
हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " .
'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला भात ... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु ! लगेच वेटर कडुन माहीती कळाली की हा "इंद्रायणी" आहे , गणेशा आधी म्हणालाच होता की इथे अप्रतिम भात मिळतो म्हणुन ! खरेतर मी अजिबात म्हणजे अजिबात भात न खाणारा माणुस पण चक्क मागुन मागुन भात खल्ला !
घरी येवुन विचारले की आपण कोणता भात खातो तर उत्तर आले "आपण ? तु तर हातही लावत नाहीस भाताला :-\ "
मी : ":-\ बरं तुम्ही कोणता भात खाता ? "
" बासमती आणि आंबेमोहोर "
माझ्या डोक्यात एकदम ट्युब पेटली !!
हायला , आपण ह्या बासमतीच्या नादाने भाताच्या कित्येक व्हरायटीज ला मुकतोय ! इंद्रायणी सारख्याच अशा कित्येक व्हरायटीज असतील वेगवेगळ्या चवीच्या ! इथेच मावळातच कित्येक व्हरायटीज आसतील !! एकदा तेजस होटेल ला खल्ला होता तोही हातसडीचा भात अप्रतिम लागला होता !
तुम्हाला भाताच्या अशा अजुन व्हरायटीज माहीत आहेत का ?
त्या चवीला अॅपीयरंसला स्वादाला कशा असतात ?
विकत कूठे मिळतील ?
इंटरनेटवर आणि आजुबाजुला चिंचवडात माहीती शोधत आहेच मी , पण मिपाकरांच्या माहीतीत असे काही खास असेल तर सांगा !
अवांतर :
१)गणेशाने त्या हॉटेल मालकाला तो इंद्रायणी तांदुळ मागितला पण त्याने ह्याना त्या निमित्ताने टाळले ...ल्ल्ल्लूऊऊऊउ
२) मुंबईत असताना , हेल्ठ कॉन्शस असल्याने ब्राऊन राईस खायचो पण त्याला भात म्हणवत नाही हो .
३) आणि ह्यावरुन आठवले , आमच्या सातार्यातील तांदुळाअळी मधील एका दुकानातील पाटी "एकदा घेतलेला माल कोणत्याही सबबीवर ताबडतोब बदलुन मिळेल ! "आता एकदा तांदुळ आळीत चक्कर टाकायलाच हवी !!
४)https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/c...
प्रतिक्रिया
5 Dec 2021 - 1:07 pm | कर्नलतपस्वी
नसरापुर, भोर येथील जुना आबेमोहोर खुप आवडतो कारण आजोबांच्या शेतातला. पुढे उत्तर भारतात काली मुंछ,शक्करचिनी सारख्या तांदूळाच्या जाती खायला मिळाल्या. आता पुन्हा एकदा आंबेमोहोर, केशरी भात याचा छान बनतो साखर कमी लागते. बाकी बिर्यानी, पुलाव करता बासमती.
5 Dec 2021 - 3:08 pm | जेम्स वांड
श्रीमंत श्री रोमाधिपती, श्री मार्कस ऑरेलीयस महाराज
एकदा पावशेर जिरेसाळी/ जिरासर तांदूळ आणून ट्राय करा बरं तुम्ही, महाराष्ट्र / गुजरात राज्यातील प्रॉडक्ट आहे, जिऱ्याच्या दाण्यासारखा बारीक अन नाजूक पण सुबक दाणा असतो, बेताचे पाणी घालून शिजवला तर एकदम गुरगुट्या नाही अन अगदी मोकळं शित नाही अश्या कंसिस्टंसीचा तयार होतो, तुफान लागतो एकदम, अंगभूत सुगंध आणि चव अतिशय लाईट असते, तूप मेतकूट भात, तूप मीठ भात लिंबाचे गोड/ तिखट लोणचे / रसलिंबू इत्यादी पेयरिंग मस्त होते, तांबड्या रश्यासोबत सुद्धा उत्तम पेयरिंग व्हावं (अनुभव नाही) शक्यतो अन-पॉलिश जिरेसाळी बघावा.
6 Dec 2021 - 5:07 pm | प्रसाद गोडबोले
जिरेसाळ ट्राय केलेला आहे पण काही खास वाटला नाही. नुकताच आजरा घनसाळ देखील ट्राय केला आहे , तो छान वाटलं टेस्ट एकदम मस्त आहे !
पण आपले खरे प्रेम जडले आहे ते इंद्रायणीवरच ! आता लवकरच आमच्या पिंचिं मित्रमंडळासोबत मावळात चक्कर टाकु भात गिरण्यावर , गावांमध्ये जाऊन इंद्रायणीचे सॅम्पल्स आणणार आहे .
पण तुर्तासतरी कोल्हापुरच्या काळभैरव ब्रॅन्ड चा इंद्रायणी अफलातुन आहे हे आवर्जुन सांगत आहे. . आय मीन इतका अफलातुन की मी मला भेटलेल्या प्रत्येक भातप्रेमी व्तक्तीला न विसरता सुचवत आहे तो !
इंद्रायणी म्हणजे खरेतर मावळातील भात , पण त्याचा बेस्ट , मला आवडलेला बेस्ट ब्रँड कोल्हापुरचा आहे हे खरेच आश्चर्य आहे !
5 Dec 2021 - 9:21 pm | Bhakti
भाताच्या बाबतीत अगदी ढ आहे,तरी घरी बदलून बदलून तांदूळ आणला जातो.सध्या काली मूंछ आहे, मस्त आहे.मला इंडिया गेटचा बासमती आवडला होता.
11 Dec 2021 - 7:28 pm | सुबोध खरे
परवाच यु ट्यूब वर एक व्हिडीओ पाहत होतो तेलंगणाच्या खाद्यसंस्कृती बद्दल. त्यात भात तूप आणि मलगापुडी चटणी घालून खाताना दाखवले होते. ते पाहून मला पण असेच करावे अशी जोरदार इच्छा झाली.
सुदैवाने बायकोने त्याच दिवशी इंद्रायणी भात केला होता. मी फारसा भात खात नाही. पण दुपारचं लग्नाचं जेवण जास्त झालं होतं तेंव्हा फार काही खाण्याची इच्छा नव्हती
त्या दिवशी गरम गरम भात, त्यात घरचं छान कढवलेलं साजूक तूप आणि मुलुंड मध्ये असलेलया एका मद्रासी दुकानातून ( सेल्वा विनायगर) आणलेली मलगापुडी चटणी असे घालून खाऊन पाहिला.
अत्यंत अप्रतिम असे हे मिश्रण आहे.
इंद्रायणी भाताची चव छानच होती पण लोकांनी वर्णन केला आहे तसा घट्ट गोळा झालेला नव्हता बऱ्यापैकी सुटा होता( बासमती सारखा नव्हे).
आता परत कधी जेवण जास्तझाले तर हा बेत नक्की करणार.
22 Dec 2021 - 11:27 am | धर्मराजमुटके
नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. माझ्या मामेभावाने त्यांची काही दिवसापुर्वी भेट घेतली होती तेव्हा त्याला सगळा जुना खजिना बघायला मिळाला.
22 Dec 2021 - 11:58 am | मदनबाण
नगर जिल्हा अकोले तालुका येथे राहिबाई पोपरे या देखील देशी वाणांच्या जपणूकीचे मोठे काम करत आहेत. त्यांना लोक प्रेमाने "बीजमाता" म्हणतात. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.
होय. असे पुरस्कार सोहळ्यांचे क्षण पाहताना देखील मन उचंबळुन येते. असेच काही वेगळे क्षण इथे पाहता येतील.
जाता जाता :- अॅमेझॉनवर सोना मसुरी महाग मिळत असल्याने यावेळी प्रथमच बिग बास्केट वरुन सोना मसुरी मागवला आहे. आत्ता पर्यंत अॅमेझॉनवरुन ३ वेगळ्या उत्पादकां कडुन तांदुळ मागुन पाहिले होते त्यातल्या २ उत्पादकांनी दिलेला तांदुळ सोना मसुरी होता, एकाने जो दिला तो सोना मसुरीच्या नावाखाली विकला तो तसा नव्हता. आता बिग बास्केटचा अनुभव काय येतो ते पहायचे आहे.ऑनलाईन रास्त दरात मागवण्याचा इतर कोणता उपाय / पर्याय माहित असल्यास इथे जरुर कळवावे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Jaisa Mukhda To Pehle Kahin Dekha Nahin... :- Pyar Ke Kabil