होठोंपे मुहब्बत के फ़साने नहीं आते

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
3 Jul 2015 - 12:47 pm

गविशेटांनी जो सिलसिला सुरू केला, त्यात आपणही भर घालावी असा मोठ्या धैर्याने निर्धार करतो आहे.

अहमद फराज़, फैज़, हसरत झालेत. तेंव्हा एका आणखी वेगळ्या शायरची एक ग़ज़ल व जमेल तसा अर्थ इथे देतो आहे. :)

ते शायर म्हणजे बशीर बद्र. अयोध्येत जन्म झालेल्या या शायरने अनेक ग़ज़ल, नज़्म लिहिल्या. तशी सोपी भाषा आणि सामान्यतेतील असामान्यता टिपण्याची हातोटी यामुळे बशीर बद्र यांना लोकप्रियता मिळाली.

त्यांचे अनेक शेर म्हणजे मास्टरपीस आहेत. उदाहरणादाखलः

मुहब्बतो में दिखावे की दोस्ती न मिला
गर गले नही मिल सकता तो हाथ भी न मिला

हम भी दरिया है हमें अपना हुनर मालूम है
जिस तरफ भी चल दिए रास्ता हो जाएगा

सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा
इतना मत चाहो उसे वो बेवफ़ा हो जाएगा

...

मी जी ग़ज़ल इथे मांडू इच्छितो ती अशी आहे...

होठोंपे मुहब्बत के फ़साने नहीं आते
साहिल पे समंदर के खज़ाने नहीं आते

मन हे एखाद्या समुद्रासारखं आहे ज्यात खोलवर अनेक भावना दडलेल्या आहेत. आणि जशा समुद्रातल्या पोटातील गोष्टी किना-यावर येत नाहीत, तशाच माझ्या मनातील भावना माझ्या ओठांवर येत नाहीत.

पलके भी चमक उठती है सोते में हमारी
आखों को अभी ख्वाब छुपाने नही आते

तोंडावर ताबा ठेवता येईल पण डोळ्यांचं काय! आणि उघड्या डोळ्यांचं सोडा, इथे बंद डोळ्यांच्या पापण्याही त्यांतील स्वप्नांमुळे लकाकतात.

दिल उजडी हुई एक सराय की तरह है
अब लोग यहां रात जगाने नही आते

माझं ह्रदय, मन एखाद्या उध्वस्त निवा-यासारखं झालेलं आहे. इथे लोक आता रात्री जागवायला येत नाहीत. हा शब्दार्थ. अन्वयार्थाने शायर म्हणतो की आजकाल आठवणीही रात्री कमी त्रास देतात, कारण या मनातलं प्रेम, ओलावा आता आटलेला आहे.

उडने दो परिंदोंको अभी शोख हवा में
फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते

शोख़: चंचल, नटखट, बेधुंद

इस शहर के बादल तेरी ज़ुल्फोंकी तरह है
ये आग लगाते है बुझाने नही आते

आह! काय उपमा आहे. केवळ अप्रतिम. ये आग लगाते है बुझाने नही आते... जशी तू खिजवून जातेस पण भेटत नाहीस.

अहबाब भी ग़ैरोंकी अदा सीख गए है
आते है मगर दिल को दुखाने नही आते

अहबाब म्हणजे मित्र. मैत्रीतल्या नाजुकतेचं, आत्मीयतेचं, हक्काचं इतकं तरल वर्णन इथे केलेलं आहे की बास. बशीर बद्र ते अनेक ठिकाणी करतात, जसं की, मुहब्बत में दिखावेकी दोस्ती न मिला, गर गले नही मिल सकता तो हाथ भी न मिला. आता मित्रही परक्यासारखे वागू लागलेत. ते ति-हाइतासारखे येतात आणि जातात. मनाला (खोलवरच्या भावनांना हात घालून) दु:ख देऊन जात नाहीत. हे दु:ख हक्काने दिलं जातं, जे एक जिवलग मित्रच देऊ शकतो. तो अधिकार परक्याला नाही आणि परक्याने दिलेलं दु:ख हे परक्यासारखंच दृष्टीआड होतं.

मला जमलं की नाही, ठाऊक नाही. पण माझ्या परीने अर्थबोध सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मिपाकरांनी यात भर घालावी अशी विनंती करतो.

जाताजाता बशीर बद्र यांचे अजून काही अशार:- (अर्थाविना)

बस गई है मेरे अहसास में ये कैसी महक
कोई ख़ुशबू मैं लगाऊं, तेरी ख़ुशबू आए।

तुम्हें ज़रूर कोई चाहतों से देखेगा
मगर वो आंखें हमारी कहां से लाएगा।

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए।

जिस दिन से चला हूं मिरी मंज़िल पे नज़र है
आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा।

मकां से क्या मुझे लेना मकां तुमको मुबारक हो
मगर ये घास वाला रेशमी कालीन मेरा है।

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में।

हर धड़कते पत्थर को, लोग दिल समझते हैं
उम्र बीत जाती है, दिल को दिल बनाने में।

परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता
किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता।

कोई हाथ भी न मिलाएगा,जो गले मिलोगे तपाक से
ये नये मिज़ाज का शहर है,ज़रा फ़ासले से मिला करो।

सियासत की अपनी अलग इक ज़बां है
लिखा हो जो इक़रार, इनकार पढ़ना।

किसी की राह में दहलीज़ पर दिया न रखो
किवाड़ सूखी हुई लकड़ियों के होते हैं

मुझसे बिछड़ के ख़ुश रहते हो
मेरी तरह तुम भी झूठे हो
इक टहनी पर चांद टिका था
मैं ये समझा तुम बैठे हो

वो शाख है न फूल, अगर तितलियां न हों
वो घर भी कोई घर है जहां बच्चियां न हों

इजाज़त..

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

गणेश उमाजी पाजवे's picture

3 Jul 2015 - 1:08 pm | गणेश उमाजी पाजवे

खूप सुंदर गझल आहे. हि गझल कुणी गायली असल्यास त्याचा दुवा डकवावा हि विनंती. बाकी तुमचे विवेचन आवडले. अजून येउद्यात.

जगजितसिंगांनीच गायली आहे ही...

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2015 - 7:57 am | अत्रुप्त आत्मा

+१ आणि त्याच्यामुळेच बरेच शायर कळले.

फारएन्ड's picture

3 Jul 2015 - 7:35 pm | फारएन्ड

हा बद्र भन्नाट गजलकार दिसतो आहे. नीट वाचायला हवे हे सगळे. मला आत्तापर्यंत प्रामुख्याने चित्रपटगीतांतून माहीत झालेल्या गजला लक्षात आहेत. मधे फराज चे पुस्तक आणले आहे पण अजून मुहूर्त लागला नाही. या लेखाने पुन्हा इंटरेस्ट निर्माण झाला. याच्या गजल मधल्या कल्पनाही जबरी दिसत आहेत - आँखोंको ख्वाब छुपाने नहीं आते हे जबरी आहे.

यातील काही शेर थोडेफार बदलून किंवा कल्पना घेउन काही चित्रपटगीतांमधे आलेल्या दिसत आहेत
"मगर मेरी आँख कहाँ से लायेगा" वरून "ये तेरा घर, ये मेरा घर... तो पहले आ के माँग ले तेरी नजर, मेरी नजर" आठवले. तसेच त्या 'न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये' वरून 'यादोंके चरागों को जलाये हुए रखना, लंबा है सफर इसमे कहीं रात तो होगी' हे त्या निकाह मधल्या गाण्यातले वाक्य आठवले.

यशोधरा's picture

4 Jul 2015 - 6:35 am | यशोधरा

बशीर बद्र ह्यांच्या गझला सुरेख आहेत.

..वाह .. क्या खूब जनाब..!!!

शब्दबम्बाळ's picture

6 Jul 2015 - 10:48 pm | शब्दबम्बाळ

आवडत्या शायराची माहिती आणि गझल वाचून खूप आनंद झाला! हे सगळे लिहिल्याबद्दल धन्यवाद!
बशीर बद्र यांच्या गझल वाचूनच मला या प्रकारात रस निर्माण झाला!
अत्यंत चपखल अशा उपमा यांच्या गझलेत बघायला मिळतात.

पण शेवटी एकामागे एक दिलेले शेर रुचले नाहीत, घाऊक पणे आल्यामुळे त्यातली वैशिठ्ये झाकोळली जातात आणि चांगल्या शेर कडेही दुर्लक्ष्य होते असे वाटले.
मी ही जसे जमेल तसे त्यांच्या एक एक गझल इथेच टंकायचा प्रयत्न करेन!

वा! सुंदर गझल आहे. दुसरा शेर फारच आवडला.

विशाल कुलकर्णी's picture

7 Jul 2015 - 2:30 pm | विशाल कुलकर्णी

जियो...
अजून येवू द्या श्रेष्ठी !

पैसा's picture

7 Jul 2015 - 2:31 pm | पैसा

खूप छान लिहिलंय! अजून येऊ द्या!

वेल्लाभट's picture

8 Jul 2015 - 7:36 am | वेल्लाभट

सबका बहोत बहोत शुक्रिया... :)