शायद कभी ख्वाबोंमे मिले..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 11:27 am

अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती.

गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता.

फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत. इतर अनेक प्रसिद्ध शायरांच्या मानाने हा अगदी अलीकडेपर्यंत सक्रिय होता असं म्हणता येईल.

ये क्या के सबसे बयाँ दिलकी हालते करनी
फराझ तुझको न आयी मोहोब्बते करनी

उच्चारी, खासकरुन गुलाम अलीच्या आवाजात :

ये किया के सबसे बयाँ दिलकी हालतें करनी
फराज तुझको नयायीं मुहोब्बते करनी.

या त्याच्या ओळींनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी कॉलेजात असताना फराझ येऊन डोक्यात बसला.

त्याच गजलेत आणखी एक शेर आहे..

मिलें जब उनसे तो मुबहमसी गुफ्तगू करना
फिर अपने आपसे सौ सौ वजाहतें करनी

तिला अगदी समोरासमोर, रुबरु भेटल्यावर गोलगोल, मुद्द्याजवळ किंचितही न भटकणारं काहीतरी बडबडायचं किंवा पुटपुटायचं.. आणि नंतर म्हणजे ती गेली की स्वतःलाच "मुद्दा" समजावून देण्याची शेकडो निरर्थक सेशन्स घ्यायची..

रोजरोज हम सोचता यही, के आज हमको वो अगर मिल जायें कहीं..
तो ऐसा बोलेगा, साला वैसा बोलेगा.. खुल्लमखुल्ला अपने दिल का राज हम खोलेगा.
वो सामने चमकती है तो सांस ही अटकती है और ये जुबान जाती है फिसल..

साउंड्ज टू फॅमिलियर?!

-------------------

पण आज "ये क्या के सबसे बयाँ"चा दिवस नाहीये. आज दुसरी एक गजल.. "अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिले". तिच्यातले निवडक शेर. कारण प्रत्येक गजलेतले सर्वच शेर पुरते जमून येतातच असं नाही. एखादीच गजल याला अपवाद असेल.

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमें मिले

ही तर सुरुवात आहे. तिचा अर्थ वेगळा लावण्याची गरज नाही. केवळ आकार लक्षात येण्यासाठी या ओळी..
एकंदरीत गजलेतले सर्व शेर एकमेकांशी थेट एका सीरीजमधे बांधलेले असतीलच असं नाही.

ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

खरंय.. निष्ठा, कशावरतरी वेड्यासारखी निष्ठा, इमानदार श्रद्धा म्हणावी अशी निष्ठा असणारे बरेच लोक "खराबां"तच ढकलले गेलेले असतात..तिथेच त्या सो कॉल्ड कचर्‍यात मोती मिळून जाईल..हेड स्ट्रेट टु द डंपिंग ग्राउंड ऑफ धिस बॅरन सोसायटी.

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले?

क्या नजरिया है फराजसाहब.. त्या उगीच ईश्वरपातळीवर नेऊन ठेवलेल्या "तिला" आणि त्यानिमित्ताने त्याच पातळीवर चढवून ठेवलेल्या "इश्का"ला आपल्यासारखं इन्सान बनवून एकदम दोस्तखात्यात आणून बसवलंत. अरे तू खुदा नाहीस आणि माझंही प्रेम तसं उदात्त एंजललाईक नाही, तर मग इतके शरमेने, इतकं आडपडद्याने कशाला भेटायचं. आ.. गले मिल..!!

मला यावरुन सहज कुसुमाग्रजांच्या "वगैरे" कवितेतल्या या ओळी आठवतात..

कधी शिवालय पांघरुनी तू
समोर येता विरती हेतू
मनात उरते मात्र समर्पण
मी नसतो पण भक्त वगैरे!

....

....

पुढे..

...

आज हम दारपे खींचे गये जिन बातोंपर
क्या अजब कल वो जमानेको निसाबोंमें मिले

दार म्हणजे इथे घराचं दार नव्हे. तिच्या घराचं दार, अशी रोमँटिक कल्पना इथे नाही. इथे वधस्तंभ, बळीची वेदी, फाशीगेट असा अर्थ आहे. आज ज्या श्रद्धेपायी अन ज्या रुढाशी द्रोहसदृश असलेल्या विचारांपायी जमाना आपलं शिर उडवण्यासाठी घेऊन आला, तेच विचार, त्याच श्रद्धा कोण जाणे, उद्या अगदी याच दुनियेच्या चक्क अभ्यासक्रमात शिकवल्या जातील.. कोणीतरी लिहिलेल्या, सर्व देश जिला मानेल अशा राज्यघटनेत सामील होतील..अगदी धर्मग्रंथातही..कदाचित.

असं शेकडोवेळा झालेलंही आहे.. त्यासाठी शेकडो वर्षं का लागलेली असेनात.

शेवटचा शेर रचनेच्या बाजूने विलक्षण आहे.

अब न वो मैं, न वो तू है, न वो माजी है फराज
जैसे दो शख्स तमन्नाके सराबों मे मिले

तो, त्यावेळचा मी.. तो त्यावेळचा तू.. आणि तो त्यावेळचा भूतकाळ.. हे कोणीच आता नाहीत.. म्हणजे ते आता "ते" उरले नाहीत..

आत्ता, आजरोजी मात्र, त्या वेळच्या "त्यांच्या" सर्व इच्छा आकांक्षांच्या मृगजळात, भासात, कोणीतरी दोन वेगळ्याच व्यक्ती भेटताहेत. व्यक्ती फक्त खर्‍या, बाकी सर्व इल्युजन..मिराज..आभास..

इट्स अ व्हर्च्युअल रियालिटी..

...................

मैफिलीत शरीक लोकहो, आपले अर्थ आणि इंटरप्रिटेशन्स सांगून खर्‍या अर्थाने रंग भरा.. तीच इथली शराब...

मांडणीविचार

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 11:51 am | विशाल कुलकर्णी

जियो गविशेठ !
या लेखाबद्दल तुमच्यासाठी एक पार्टी लागू झाली आमच्यावर. _/\_

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 11:58 am | वेल्लाभट

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले?

हा माझा अत्यंतिक आवडीचा शेर आहे....प्रेम वगैरे तर 'टॉप नोट' झाली याची. ती आहेच. पण मानवाच्या नातेसंबंधातलं मर्म हा शेर सांगून गेलाय. पर्यायाने अहमद फराज़ सांगून गेलेत. नातेसंबंधातली जी हायरारकी म्हणजेच लहानमोठेपणा, त्याबरोबर येणारे मान (अनेकदा ऑब्लिगेशन बनणारे) हे सगळं सोल टू सोल संबंधांसाठी प्रतिकूल आहे. आपण जखडून टाकतो स्वतःला या अशा गोष्टींमधे अनेकदा, विनाकारण. आणि मग मनासाठी, भावनांसाठी त्यांच्या व्यक्त होण्यासाठी सगळं कठीण होतं.

मेहदी हसन साहेबांचा आवाज कानात ऐकू येतोय...

तू खु़दा है न मेरा इश्क फरिश्तो जैसा
दोनो इन्सां है.... या इथे अंगावर काटा आलाच.....लिहीताना सुद्धा. तो क्यूं इतने हिजाबों मे मिले... हिजाब चा साधा अर्थ बुरखा. पण इथे अभिप्रेत अर्थ असा की धर्माने, समाजाने, लादलेली बंधनं, आखून दिलेल्या हद्दी... इत्यादी. थोडक्यात; औपचारिकता, फॉर्मॅलिटीज.

साध्या सरळ गोष्टी विनाकारण क्लिष्ट करून ठेवल्यात मानवाने.

फार फार फार फार आवडीची ग़ज़ल....
धन्यवाद गवि! हे नवीन सुरू केलंत त्याबद्दल.

आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज! :-)

अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ माझे अतिशय आवडते शायर. त्यांचे कितीतरी अशआर, नकळत पण योग्य वेलेस तोंदात आपोआपच येतात. कॉलेजमध्ये गुलाम अली आणि मेहदी हसन ह्यांच्या भक्तीने अशा कित्येक कवींनी जे मनात घर केले, ते कायमचेच!!!

करू न याद मगर किस तरह भुलाऊ उसे,
ग़ज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊ उसे|

रंजीश ही सही ही मेहदी हसनची गाजलेली गज़ल ह्यांचीच. शिवाय गुलाम अलीच्या आवाजातली 'शायद' -

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़
फिर भी तू कर इंतजार, शायद....

आणि गुलाम अलीच्याच आवजातली ही -

ढूँढता फिरता हूँ लोगों में शबाहत उसकी
के वो ख्वाबों में लगती है ख़यालों जैसी

उसकी आखों को कभी गौर से देखा है 'फ़राज़'
सोने वालों की तरह जागने वालों जैसी

खूप आहेत आवडत्या....अहमद फराज़ वारले तेंव्हा मी मिपावर हा छोटा लेख लिहिला होता, बघा आवडतोय का!

अद्द्या's picture

26 Jun 2015 - 12:11 pm | अद्द्या

मस्तच .

पावसाचा परिणाम दिसाया लागलाय .

मस्तच . .

सुंदर लेख गवि साहेब..अजून येऊ द्या..
वेल्लाभटांचा प्रतिसाद ही मस्तच !

ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

याचा अर्थ थोडा आणखी उलगडून सांगावा

शायरी आणि गाझ्हाल प्रेमींसाठी एक चांगली वेबसाईट गवसली आहे
rekhta.org

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 12:53 pm | वेल्लाभट

ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती......

प्रेम, निष्ठा या मोत्यासारख्या नाजुक भावना असलेली लोकं कधी ना कधी मनाने तुटतातच. (अशी नाजुक गोष्ट जमिनीवर (समाजात) पडली की तुटायचीच) म्हणून...

ढूंढ 'उजडे' हुए लोगो में वफा़ के मोती...
ये खज़ाने तुम्हे, मुमकिन है, खराबों मे मिले...

वफ़ा, निष्ठा, या गोष्टी प्रेशियसच म्हणायला हव्यात. कारण त्या दुर्मिळ आहेत. ते खजिने आहेत जे अशा काही तुटलेल्या ह्रदयांत बंद झालेले आहेत. आणि ही अशी माणसं समाजाच्या प्रवाहात तुला मिळणार नाहीत. दे आर स्पॉइल्ट. वो ख़राब है, लोगों की नज़र में. और इन ख़राबोंमेंही मुमकिन है, तुम्हे वफा मिले.

ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 1:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आधी तो विशाल, आता गवि - काय जगू देत नाही आज!

मनातल बोल्लात मनिषजी...
भंकार या अत्यंत कमी गायल्या जाणार्‍या रागातली ही रचना.. फराज बद्दल बोलायची माझी अजुन हिंमत नाही होत.. पण मेहंदी हसन ने या गझलेत जान ओतलेत, अत्यंत नाजूक आणि चमत्कृतीपूर्ण मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी तसे काहीतरी..

गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो
नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले..

या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 1:19 pm | वेल्लाभट

गम-ए-दुनिया मे गम-ए-यार शामिल कर लो
नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले..

या सारखा कातिल आणि करंट शेर कुठेच नाही ऐकायला मिळणार फराज च्या लेखनीशिवाय....

क्या बात कही है ! क्या बात कही है ! वाह. मनातलं बोललात.

गम-ए-दुनिया में गम-ए-यार भी शामिल कर लो
नशा बढता है शराबे जो शराबोमे मिले..
(भी विसरलेलात)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Jun 2015 - 1:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एका छोट्याश्या 'भी' ने किती खतरनाक फरक पडतो नाई?

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 2:14 pm | वेल्लाभट

मीटर तर आहेच, अर्थ, अन्वयार्थ, संदर्भ बदलू शकतात.

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 2:19 pm | वेल्लाभट

'भी' वगळता ग़म-ए-यार च महत्व कमी झाल्यासारखं वाटतं.

अश्फाक's picture

29 Jun 2015 - 8:15 pm | अश्फाक

Gam e duniya bhi gam e yaar me shaamil kar lo
Nashaa badhata hai sharaabo jo sharaabo me mile

यसवायजी's picture

26 Jun 2015 - 2:10 pm | यसवायजी

वाचतोय.आवडतंय. शिकतोय.
धन्यवाद.

सूड's picture

26 Jun 2015 - 2:15 pm | सूड

वाचतोय.

अजया's picture

26 Jun 2015 - 2:24 pm | अजया

मजा येतेय वाचायला.वेल्लाभटांचा प्रतिसादपण आवडला.
आयत्या यु ट्युब लिंका दिल्याबद्दल धन्यवाद!त्यामुळे धाग्याला चार चाँद लागले!

प्यारे१'s picture

26 Jun 2015 - 3:04 pm | प्यारे१

वाह गवि.
गविंना लेटेस्ट दोन धाग्यांसाठी डाएट लंच पार्टी (हलके घ्यावे म्हणून)

पैसा's picture

27 Jun 2015 - 3:46 pm | पैसा

मस्त! छान वाटतंय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2015 - 1:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर...!

ये क्या के सबसे बयाँ दिलकी हालते करनी
फराझ तुझको न आयी मोहोब्बते करनी

मजा आली ऐकायला.

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले ?

मला हे आवडलं. अनेक कवींनी प्रेयसीला अनेक उपमा दिल्यात. पण इंसानच्या पातळीवर नातं निभावणं केवळ कधीही चांगलं. ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. अतिशय वास्तव शेर. जे काय होईल ते तुझ्या माझ्या नात्यात दोघंही माणुसपणाच्या पातळीवर असू तर प्रेमासाठी ती चांगली गोष्ट.

मोमीन म्हणतो -

यू बना कर हाले दिल कहना न था
बा्त बिगडी मेरीही तकदीर से.

नशीबापेक्षा तुला माझे काय हाल करायचे ते बोलून चालुन कर..तुझ्या माझ्या नात्यात जे काय असेल ते सहज असेल तु कोणी वेगळी नाही आणि मीही कोणी वेगळा नाही. मला सहज बोलता यावं तुझ्याशी, तू खुदा झालीस देवांचा दूत झालो तर अंतर पडेल. केवळ क्लास शेर....असो.

गविशेठ, अजून लिहा. सालं संक्षीला मिस करतो अशा मस्त धाग्याच्या वेळी. संक्षीसेठ भांडण हलवायाशी असलं पाहिजे त्याच्या मिठाईशी नाही.

-दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ's picture

28 Jun 2015 - 3:20 pm | शब्दबम्बाळ

"ती कोणीतरी वेगळी असली की मग त्यात अंतर पडायला लागतं. "

अगदी बरोबर! :)
बशीर बद्र याची एक गझल आहे
"सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा
इतना मत चाहो उसे, वो बेवफ़ा हो जाएगा"

शब्दबम्बाळ's picture

28 Jun 2015 - 3:22 pm | शब्दबम्बाळ

क्या बात! :)
खूप आभार्स, सध्या मेजवानी सुरु आहे!
अजून येत राहूद्यात!

महासंग्राम's picture

29 Jun 2015 - 3:54 pm | महासंग्राम

हाथ उठाए हैं मगर लब पे दुआ कोई नहीं
की इबादत भी तो वो जिस की जज़ा कोई नहीं

ये भी वक़्त आना था अब तू गोश-बर- आवाज़ है
और मेरे बरबते-दिल में सदा कोई नहीं

आ के अब तस्लीम कर लें तू नहीं तो मैं सही
कौन मानेगा के हम में बेवफ़ा कोई नहीं

वक़्त ने वो ख़ाक उड़ाई है के दिल के दश्त से
क़ाफ़िले गुज़रे हैं फिर भी नक़्शे-पा कोई नहीं

ख़ुद को यूँ महसूर कर बैठा हूँ अपनी ज़ात में
मंज़िलें चारों तरफ़ है रास्ता कोई नहीं

कैसे रस्तों से चले और किस जगह पहुँचे "फ़राज़"
या हुजूम-ए-दोस्ताँ था साथ या कोई नहीं

अहमद फराज

अश्फाक's picture

29 Jun 2015 - 8:06 pm | अश्फाक

Aur kitni mohabbate tuz ko chahiye faraz
Maao ne tere naam per bachchho ka naam rakh diya

अश्फाक's picture

29 Jun 2015 - 8:09 pm | अश्फाक

Shiddat e tishnagi me bhi gairat e maikashi rahi
Us ne jo pher li nazar maine bhi jaam rakh diya

अजिंक्यराव पाटील's picture

30 Jan 2020 - 7:06 pm | अजिंक्यराव पाटील

दिल भी पागल है कि उस शख़्स से वाबस्ता है

जो किसी और का होने दे न अपना रक्खे

अजिंक्यराव पाटील's picture

30 Jan 2020 - 7:08 pm | अजिंक्यराव पाटील

आणि papon ने फराझच्या या गझलेत ओतलेला त्याचा जीव..

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ

आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2020 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं गविसेठचं नवं लेखन आलं की काय. पण जुनं लेखन वाचूनही छान वाटलं.
नवं लिहा सेठ काही तरी.

०दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

30 Jan 2020 - 11:50 pm | श्वेता२४

गझल हा वीक पॉईंट. मस्त स्मरणरंजन झाले

सूक्ष्मजीव's picture

16 Feb 2020 - 1:04 pm | सूक्ष्मजीव

मेहदी हसन यानी गायिलेली ही चाल माझ्यासाठी नवीन होती. मैफालीमधे ते वेगळी गात असत.
त्यांच्यांच एका गझल चा शेर मला खूप भावतो

मोहब्बत करने वाले कम न होंगे
तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे

ज़माने भर के ग़म या इक तिरा ग़म
ये ग़म होगा तो कितने ग़म न होंगे
हफ़ीज़ होशियारपुरी

सूक्ष्मजीव's picture

16 Feb 2020 - 1:08 pm | सूक्ष्मजीव