कुठे कुणाच्या घरात होतो
सखी तुझ्या अंतरात होतो
दहाजणींतून देखणी तू
तसाच मी शंभरात होतो
जिथे तिथे गाय लंगडी अन
सदैव मी वासरात होतो
अता जमीनीवरी परंतु
कधीतरी अंबरात होतो
उन्हात मी जन्म काढला पण
तुझ्यासवे एक रात होतो
डॉ.सुनील अहिरराव
----------------
धागा संपादित केला आहे
प्रतिक्रिया
22 Jun 2015 - 11:09 am | वेल्लाभट
वाह ! सुरेख !
22 Jun 2015 - 10:16 pm | एक एकटा एकटाच
ह्या ओळी विशेष रिलेट झाल्या
दहाजणींतून देखणी तू
तसाच मी शंभरात होतो
वाह!!!!
25 Jun 2015 - 12:16 pm | drsunilahirrao
खूप खूप आभार वेल्लाभट आणि एक एकटा एकटाच
26 Jun 2015 - 11:56 am | पैसा
सुरेख कविता!
26 Jun 2015 - 9:30 pm | धनावडे
१ नंबर