नजरेत तीर गालात खळी
जीव जातो इशा-यात बळी
चालण्याचा डौल गजगामिनी
फुले मन्मनी गुलाबीच धुंदी
उधळीत जा ग फुले मोग-याची
त्याचा गंध मना मधे दरवळू दे
हवेमधे फेकता दुपट्टा रेशमी
ढळे विश्वामित्री माझी समाधी
वाटे जणू तू अप्सरा स्वर्गीची
तपोभंग माझा सहजी करीशी
नजरेतून देशी मदिरेचे प्याले
नशा बघ कशी ध्यानात चढते