७.२७ ची लोकल

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जनातलं, मनातलं
21 Aug 2008 - 4:58 pm

मी तिला प्रथम कधी पाहिले आठवत नाही, पन त्या लोकल ला ती नेहेमीच असायची, त्याच मधल्या लेडीज फर्स्ट क्लास मधे. एकटीच. होती साधीच. तिच्या कानाला लावलेल्या यंत्रावरुन समजत होत की की ती मूक-बधीर होती. ती खुप उदास आणि एकटी वाटायची.. आम्ही रोज समोरासमोर उभ्या असायचो पण हसण्यापलिकडे आम्ची ओळख नव्हती. वेळ लवकर ची असल्याने आणि ट्रेन डबल फास्ट असल्याने गर्दी जरा कमीच असायची..
काही दिवस असेच गेले आणि एकदा ती धावत पळत लोकल मधे चढली डोंबिवली ला आणि लेडीज्-जेंट्स डब्याच्या पार्टीशन जवळ उभी राहिली. २/३ मिनिटातच तिथुन एक मुलगा आला.. तिच्यासराखाच- मूक बधीर आणि तिच्या चेहेर्‍यावर हसु आलं.. मी प्रथमच तिला हसताना पाहिलं.. छान च वाटली ती..
ते खुणांनी बोलत होते.. भराभर.. जणु काही खुप बोलायच होतं आणि वेळ कमी होता..
तो १५/२० मिनिटातच गेला निघुन बहुधा उतरला असावा आणि ती पुन्हा रोजच्यासारखी उदास झाली...

समाजअनुभव