पुर्वाध - स्वस्तिककडुन सापडलेल्या अोल्या चिठ्ठीवर मला माझ्याच विरहाचा कविता दिसतात. हेच स्वस्तिकला विचारल्यावर त्याकडुन यास अमान्यता. पुण्यालत्या पावसामुळे कागद ओले झाल्याचे म्हणणे.
---------------------------------------
दुसर्या दिवशी माझ्या पुण्याच्या मावसभावाचा वाढदिवस होता.सकाळीच मावशिला मी फोन लावला. बाहेर बघितले तर पाऊस चालू झाला होता.
"काय ग तिकडे काल खुप पाऊस झाला का? इथेही आत्ता चालु झाला आहे" " पाऊस ? कसाच काय! इकडे आठवडा झाला आभाळ कोरडेच आहे."
त्याच क्षणी चिठ्ठी कशामुळे भिजली हे मला कळाले.
थोड्यावेळाने कॉलेजला गेलो. स्वस्तिकभोवती ही गर्दी जमलेली.स्वस्तिकभोवती ही गर्दी जमलेली.
स्वस्तिक समजावुन सांगत होता " काय नाही रे जरा भांडण झाल होतं घरी. मस्त पुणे फिरुन आलो. पुढच्यावेळी सगळे जाऊ." असे तो म्हणाला आणि पुन्हा एकवार सकळा वर्ग हसु लागला. फक्त मी त्यात सामील होऊ शकलो नाही.
मी स्वस्तिकला नंतर जाऊन म्हणालो " नाव काय आहे तिच ? " स्वस्तिकला मला सगळे कळाले आहे हे कळाले. तो फक्त हसु लागला. "जाऊदे सोड " एवढच बोलुन तो पळाला.
आत्तापर्यंत सगळ्यांनी आपल्याला फक्त आनंद वाटायलाच शिकवल दुःख नाही. सगळ्यांनाच इथे बोलण्याची गडबड ए्ेकायला मात्र कोणीच नाही.
आम्ही नेहमीच मैत्र्ीत वाहत जाणारे. स्वस्तिकला त्याच्या मर्यादा कळाल्या होत्या किंबहुना त्याने त्या स्वताः घातल्या होत्या. म्हणुनच अपेक्ष्ाभंगाचे प्रसंग त्याच्या वाट्याला कधिच आले नाहीत.
इकडे आमचे पदोपदी अपेक्ष्ाभंग झाले काही वेळा आयुष्यभरासाठी मित्र गमवण्याचिही पाळी आली. पण त्याचसोबत रडण्यासाठी मला खांदेही भेटले. त्याची किंमत मात्र जबर होती.
यात कोण बरोबर कोण चुकीच हे आजतागायत मला नाही उमजल. प्रत्येकाच्या मोकळ्या होण्याच्या जागा वेगवेगळ्या. मग ती जागा मित्र्ाचा खांदा असो की साधा कागद असो, ती जागा मिळणे महत्वाचे!
मी पुन्हा चिठ्ठी बाहेर काढुन पाहिली आणि सगळे स्वस्तिककडे पाहत आहेत हे पाहुन मीसुद्धा ती चिठ्ठी न पडलेल्या पावसात भिजवली.
(एकदाची)समाप्त!
प्रतिक्रिया
28 May 2015 - 9:01 am | श्रीरंग_जोशी
हा भाग वाचून झाल्यावर कथा उमगली.
भावस्पर्शी आहे कथा.
28 May 2015 - 11:25 am | शब्दानुज
पहिल्यांदाच मिपा कथा टाकली होती.टाईपिंमुळे काही मुद्दे सोडावे लागले त्यामुळे कथा काहीशी विस्कळित झाली आहे.