पुर्वाध- स्वतिक ,माझा एक मित्र घरी भांडुन घर सोडुन जातो. रात्र्ी स्वताःच पुन्हा पुण्याहुन परततो. मी त्याच्या खिशातुन एक चिठठी हस्तगत करतो ज्यावर माझे नाव असते.
--------------------------------------
ती चिठ्ठी अोलसर झालेली होती. त्यामुळेच
मला माझ्या नावाची अक्षरे वाचता आली होती. आता सगळ्यांसमोर ती उघडुन वाचत बसलो असतो तर अनर्थ झाला असता. मी ती चिठ्ठी
हळुच खिशात ठेवली.
स्वस्तिकची आई थोड्यावेळाने बाहेर आली. रडुन रडुन त्या माऊलीने डोळे सुजवुन घेतले होते. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावले. या एवढ्या घोर प्रसंगातही त्यांनी जेवण बनवले होते अगदी स्वस्तिकच्या नावाचेही! जणू तो आज येणार हे माहितच होते.
स्वस्तिक स्वताः आम्हाला वाढत होता, आग्रह करत होता. आत जाऊन नवे नवे पदार्थ आणत होता. शेवटी स्वस्तिकला आम्ही मधे बसवले आणि चक्क आमच्या हातांनी भरवले. सगळ्यात पुढे अर्थातच क्ष होता. भरवल्यावर क्षनेे माझ्याकडे पाहुन हळुच डोळे मिचकावले.
मला मात्र मी ती चिठ्ठी कधी उघडुन पाहतो असे झाले होते. जेवल्यावर मी स्वस्तिकला बाथरुम कुठे असल्याचे विचारले. क्ष माझ्याकडे पाहत होता. मगाशिच आम्ही मोकळे झालो होतो त्यामुळे कदाचित त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शेवटी "दिवसातुन चारदा पळतय ह्यानं " असा एक टोमणा मारुन तो बाहेर निघाला.आत जाऊन मी ती चिठ्ठी आत अलगद उघडु लागलो.
ती माझीच एक कविता होती. मॅगझिनमद्दये मागे एकदा छापुन आली होती.माझ्या त्या कागदावर चार कविता होत्या. मला काहिच अर्थबोध होईना.
मी नजर फिरवू लागलो तेव्हा शेवटची कवितेकडे लक्ष गेले. ती विरहाची कविता होती ताटातुट झालेल्या पियकराची.
मी बाहेर आलो. क्षने मला बाजुला अोढले आणि सकाळपासुन फालतु चेष्टा करणारा हा आता ढसाढसा रडु लागला. आता अशा परिस्थितीत त्याला स्वस्तिकचे प्रताप कसे सांगणार? तो कसाबसा शेवटी शांत झाला. माझे मात्र क्षणाक्षणाला टेंशन वाढु लागले.
हळूहळू सगळे पांगले. मी मुद्दाम मागे राहलो. आता फक्त मी आणि स्वस्तिक मागे राहिलो. मी त्याला चिठ्ठी दाखवली. तो ती पाहुन हसु लागला. मी विचारल " स्वस्तिक काय अर्थ लावायचा याचा ? " "अरे मी रेल्वेने जाणार होतो ना मग बर्थ पुसायला कागद पाहिजे म्हणुन मी मॅगझिनचा एक कागद फाडला तर तो नेमका तुझा निघाला. "
" मग त्यावर धुळ का नाही? आणि ती अोली कशी झाली?"
" अरे जाताना जागाच मिळाली नाही आणि पुण्यात पाऊस लागला तेव्हा तो कागद भिजला असेल."
मी घराकडे निघालो. माझ्याच पानांनी माझ्याच तोंडाला पाने पुसली होती कमीतकमी धूळ तरी पुसायला पाहिजे होती असा मनाचा धूळधाण उडवणारा विचार मनात आला. 'हिमालया मी येतोय बाबा तुझ्याकडे' असा अोरडा करत मी झोपी गेलो.
क्रमशः
प्रतिक्रिया
26 May 2015 - 9:48 pm | श्रीरंग_जोशी
बाउन्सर गेला :-( .
काही तरी नेहमीपेक्षा वेगळे आहे हे जाणवले.
पुभाप्र.
26 May 2015 - 10:56 pm | लालगरूड
आवडले पुभालये
27 May 2015 - 6:22 am | उगा काहितरीच
काहीच कळंना
27 May 2015 - 9:04 am | शब्दानुज
स्वस्तिक पळाला कारण-घरच्यांशी भांडण
स्वस्तिक परततो आणि त्याच्याकडुन अोली चिठ्ठी मला सापडते
त्या चिठ्ठीवर माझ्या कविता असतात.हा कागद स्वस्तिक पुण्याला का घेऊन गेला हा माझ्यापुढचा प्रश्न
आणि कागदावर विरहाची कविता
हेच स्वस्तिकचे निघून जाण्याचे कारण हा माझा समज
स्वस्तिककडुन यास अमान्यता. हा सर्व योगायोग इति स्वस्तिक. ती कविता भिजण्याचे कारण पुण्यात पडलेला पाऊस.
आता पुन्हा वाचुन पहा
27 May 2015 - 6:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमच्या आयडीचं नावं खुप आवडल शब्दानुज.
27 May 2015 - 9:05 am | शब्दानुज
मी नाही समजलो
27 May 2015 - 9:04 am | शब्दानुज
स्वस्तिक पळाला कारण-घरच्यांशी भांडण
स्वस्तिक परततो आणि त्याच्याकडुन अोली चिठ्ठी मला सापडते
त्या चिठ्ठीवर माझ्या कविता असतात.हा कागद स्वस्तिक पुण्याला का घेऊन गेला हा माझ्यापुढचा प्रश्न
आणि कागदावर विरहाची कविता
हेच स्वस्तिकचे निघून जाण्याचे कारण हा माझा समज
स्वस्तिककडुन यास अमान्यता. हा सर्व योगायोग इति स्वस्तिक. ती कविता भिजण्याचे कारण पुण्यात पडलेला पाऊस.
आता पुन्हा वाचुन पहा
27 May 2015 - 9:13 am | पाटील हो
आज जरा उसात पाणी ढव जाला …. उद्या ३ र्या भागात बहुतेक धाक्याला लागेल ,.