झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय...
:झाडं जोमानं वाढू लागतात तेव्हा
मुळांना जमिनीत किती खोल शिरावं लागतं?
:झाडांना हिरवी पानं फुटत असतात
हे मुळांना समजतं तरी का कधी?
:फांदीवर पक्षी जे गाणं म्हणतात
ते मुळांना कधी येतं का ऐकू?
:झाड फुलांनी बहरतं
तो सुगंध मुळांना श्वासात भरुन घेता येतो का?
:झाड प्रकाशात न्हात असतं तेव्हा
मुळांच्या अंधारायुष्यात कवडसा तरी पडतो का?
:झाडं मोठी झाल्यावर मुळांचं अस्तित्वच नाकारतात
तेव्हा मुळांनाही फुटतात का हुंदके?
झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय...
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
20 Aug 2008 - 9:15 pm | खादाड_बोका
बढीया....कालच मुळ्याची भाजी खाल्ली..... ;)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
20 Aug 2008 - 10:25 pm | धनंजय
सगळ्यात महत्त्वाचे असे शेवटचे कडवे पटले नाही.
बाकी सर्व कडव्यांतल्या चित्रदर्शी गोष्टी आहेत - म्हणजे झाड फुलांनी बहरते, त्यावर बसून पक्षी गातात वगैरे. पण "झाड मुळांचे अस्तित्व नकारते", यातून काहीच चित्रदर्शी उपमा समजत नाही. "मुले आईवडलांना नकारतात" वगैरे काहीतरी म्हणायचे असेल, पण झाडाचे चित्र समांतर वाटत नाही.
28 Aug 2008 - 9:11 am | चिंतामणराव
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
झाडाना, पानाना, फुलांना कधीतरी हे जाणवतंच.....
मग त्यांची एक कविता...........
टाकीन "माझे लेखन मधे लवकरच
आ़ज टाकली कविता..........
कांही अक्षरं अजुन सापडत नाहीत.....असो