बिहार सरकार चे नवे धोरण पौष्टीक अन्न उंदीर खा. उपासमारी टाळा. सकाळ मधील ही बातमी वाचा http://esakal.com/esakal/08202008/Sampadakiya83E73329AB.htm
बिहारचे आदिवासी कल्याणमंत्री जितन राम मांझी यांनी राज्यातील जनतेला उंदीर खाण्याचे आवाहन केले आहे बिहारी जनतेला सरकारमधील मंत्र्याने अशा प्रकारचे आवाहन करावे हे प्रशासनाचा कारभार किती बेअकलीपणे चालविला जात आहे हे दिसुन येते. देशात लोक पुरेसे अन्नधान्य मिळत नसल्याने अर्धपोटी, उपाशी राहत आहेत. धान्यटंचाईवर नियंत्रणासाठी उपाय योजले जातात.
बिहारच्या धान्य गुदामांमध्ये होणाऱ्या साठ्याची नासाडी उंदरांमुळे अधिक होते आहे. या उंदरांचा उपद्रव इतका वाढला आहे, की त्यावर उपाय म्हणून उंदीरच खाण्याची टूम राज्य सरकारने काढली आहे
भारत हा एक दरीद्री देश आहे की अकलेचे दारिद्र्य आहे हाच प्रश्न आहे फीर भी मेरा बीहार महान
प्रतिक्रिया
20 Aug 2008 - 10:20 am | शेखर
अकलेचे दारिद्र आहे दुसरे काय. खरतर बिहार इतके नैसर्गिक दृष्ट्या संपन्न राज्य भारतात दुसरे कुठले नाही...
दैव देते , कर्म नेते हेच खरे
शेखर
20 Aug 2008 - 10:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरतर बिहार इतके नैसर्गिक दृष्ट्या संपन्न राज्य भारतात दुसरे कुठले नाही...
झारखंड तुटण्यापूर्वी! आता बराचसा मलिदा झारखंडकडे गेला.
बाकी शेखरभौंशी सहमत, अकलेचे दारिद्र्य!
20 Aug 2008 - 11:06 am | एकलव्य
वाटावा अशी धक्कादायक बातमी
(अशा मंत्र्यांना कायद्याने शिक्षा का होऊ शकत नाही हा प्रश्न पडलेला) एकलव्य
20 Aug 2008 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते
थांबा...
डिसक्लेमर : मी बिहार सरकारचे कुठलेही समर्थन करत नाहिये. फक्त बातमीची दुसरी बाजू समोर आणत आहे.
या बातमीवर बहुतेक सगळ्यांनाच संताप वाटला आहे. पण बिहारात मूसाहार जातीच्या लोकांचे उंदिर हे पक्वान्न आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. अरुणाचल प्रदेशात पण बर्याच ठिकाणी उंदिर आवडीने खाल्ले जातात.
हे पहा...
http://www.freshnews.in/bihar-to-uplift-musahar-community-by-commerciali...
http://www.hinduonnet.com/mp/2002/07/18/stories/2002071800290100.htm
बिपिन.
20 Aug 2008 - 9:42 pm | लिखाळ
या चित्रपटातसुद्धा उंदीर खाणारे ठाकर दाखवले आहेत.
--लिखाळ.
20 Aug 2008 - 12:06 pm | नंदन
फ्रान्सच्या मारी आंत्वानेत राणीने गरीबीवर तोडगा म्हणून 'लेट देम इट केक' असे उद्गार काढले होते, असे म्हणतात - जे फ्रेंच राज्यक्रांतीला कारणीभूत झाले. प्रस्तुत विधान हे त्याचीच तीनशे वर्षांनंतरची आवृत्ती आहे, असे म्हणता येईल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Aug 2008 - 7:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग राबडीदेवींचीपण मारी अँतोनेट होणार? :?
20 Aug 2008 - 3:46 pm | विनायक प्रभू
योग्य. डिफरंट स्ट्रोक्स फॉर डिफरंट फोक्स.
विनायक प्रभु
20 Aug 2008 - 9:39 pm | डॉ.प्रसाद दाढे
आता बिहारी राज्य क्रा॑ती कधी होणार? :)
20 Aug 2008 - 9:53 pm | रेवती
महोदयाना म्हणावं उंदीर खायला आधी त्यांनीच सुरुवात करावी (नाहितरी सारखं काहितरी खायची सवय असतेच).
रेवती
20 Aug 2008 - 11:58 pm | मुक्तसुनीत
23 Aug 2008 - 3:52 am | अनिता
झकास...
23 Aug 2008 - 8:58 am | शितल
मुक्तसुनीतजी,
मस्तच प्रतिसाद.
महाराष्ट्राला वाचवायचे असेल तर त्यांना खरंच अशा एका बोटीतुन मुद्दाम सोडुन द्यावे जी हमखास बुडेल ;)
23 Aug 2008 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरा...
जबराच आहे जोक... कटू असलं तरी सत्य आहे.
बिपिन.
23 Aug 2008 - 7:51 pm | स्वाती दिनेश
कविता महाजन यांच्या 'ब्र ' ह्या पुस्तकातही आदिवासी बेडकाचा रस्सा (कंबरदुखीवर उपयोगी म्हणून) तसेच उंदीर,घुशींचे मांस,लाल मुंग्यांची चटणी खातात असा उल्लेख आहे.
स्वाती
3 Sep 2008 - 7:05 pm | विजुभाऊ
आयुर्वेदात मांसाहार हा आरोग्यउपचार म्हणुन सांगितला आहे.
उदा : गुढगेदुखीवर शुभ्र कपोताचे मांस खावे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Sep 2008 - 8:00 pm | देवदत्त
आयुर्वेदात मांसाहार हा आरोग्यउपचार म्हणुन सांगितला आहे
ही तर माझ्याकरीता नवीनच माहिती आहे :?
3 Sep 2008 - 9:44 pm | प्रभाकर पेठकर
मध्ये एकदा जालावर, उंदरावर प्रक्रिया करून फायनली गिर्हाईकाच्या टेबलावर तो 'टेक्सास फ्राईड चिकन' सदृष पदार्थ म्हणुन येतो असे वाचले होते. फोटोही दिले होते. फायनल पदार्थ ओळखू येणार नाही इतका 'चिकन लेग' वाटतो.