सुट्टी म्हणजे -[बालकविता]

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
17 May 2015 - 2:03 pm

सुट्टी म्हणजे नुसती धमाल
पर्यटनाची भलती कमाल ..

गडावर जाऊ शिकू इतिहास
भुगोलातले प्रदेश खास ..

बसू घरात ऊन असल्यावर
पत्ते क्यारम गार फरशीवर ..

टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी
डोरेमोन भीम बीनची मस्करी ..

अधूनमधून भेंड्या नि गाणी
आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..

पुस्तकं वाचू खूप छान छान
माहितीची करू देवाणघेवाण ..

संध्याकाळी खेळू बागेत खेळ
खेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..

सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे
अभ्यासाशी गट्टी फू करणे ..
.

बालसाहित्यबालगीतमौजमजा

प्रतिक्रिया

अर्व's picture

20 May 2015 - 3:09 pm | अर्व

काव्यातला सर्वात दुर्गम प्रकार कोणता तर तो बालकवितांचा..
कारण आपल्याला त्या वयास जावे लागते..

कविता आवडली...
कविता जितकी साधी तितकी ती बोलकी... साधं समीकरण

नेहमी प्रमाणे छान कविता.. आवडली...

विदेश's picture

23 May 2015 - 11:00 am | विदेश

अर्व,
गणेशा ..
प्रतिसादाबद्दल आभार !