नमस्कार ’मिपा’कर!
Nuclear Deception या एड्रियन लेव्ही व कॅथरीन स्कॉट-क्लार्क लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर मी एक मालिकेच्या रूपाने लिहिताना ’नैवेद्याचा मान’ म्हणून प्रत्येक पुष्प मी सर्वात प्रथम ’मिसळपाव’वरच प्रसिद्ध करत असे. इथल्या वाचकांनी त्या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले व त्यापैकी २-३ वाचकांनी तर स्वयंस्फूर्तीने त्यातील चुका मा़या निदर्शनास आणणे व मला सुधारणा सुचविणे अशा पद्धतीचे अमोल सहाय्यही केले. या सुधारणा केल्यानंतरच मी ते ’ई-सकाळ’वर पोस्ट करत असे. हे सारे मालिकास्वरूपातील लिखाण नुकतेच पुस्तकरूपाने "पाकिस्तानी अणुबाँब: एक घोर फसवणूक" या शीर्षकासह 'मॅजेस्टिक पब्लिकेशन'तर्फे प्रकाशित झाले आहे. पुस्तकरूपात आणताना 'ई-सकाळ'वर प्रकाशित झालेल्या मजकुरात मी खूपच सुधारणा केलेल्या असल्याने ते जास्तच रोचक झाले आहे. तरी ते मिसळपाव’वरील वाचकांनी जरूर वाचावे अशी मी विनंती करतो!
'Know Thy Enemy' किंवा 'Know Thy Neighbour' या तत्वानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक अवश्य वाचायला हवे असे माझी खात्री झाल्यावर मी मराठीपासून सुरुवात केलेली असून ते प्रकाशित झाल्यावर आता हिंदी भाषेत रूपांतर करण्याचा प्रकल्प मी हाती घेतला असून त्यासाठी मूळ लेखकद्वयीतर्फे जरूर ती अनुमतिसुद्धा मी मिळविलेली आहे! आता लेखनास सुरुवातही केलेली आहे.
मला ’मिसळपाव’सारख्या हिंदी भाषेतील संस्थळाची माहिती हवी आहे जिथे मी ते प्रथम प्रकाशित करू शकेन. एक तर्हेची ’नेट प्रॅक्टीस’च म्हणा ना! तसेच कुठल्या हिंदी वृत्तपत्रात मी ती मालिकेच्या रूपात प्रकाशित करू शकतो त्याबद्दलही मला माहिती येथील वाचकमित्रांकडून हवी आहे. ती इथे प्रतिसादाच्या रूपात किंवा मला माझ्या sbkay@hotmail.com या ईमेल पत्त्यावर दिल्यास मी ऋणी राहीन.
मूळ इंग्रजी पुस्तक प्रत्येक पाकिस्तानी व अमेरिकन नागरिकाने वाचल्यास त्याला आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्याचा प्रत्यय येईल.
धन्यवाद,
सुधीर काळे
प्रतिक्रिया
17 May 2015 - 5:24 am | श्रीरंग_जोशी
प्रथम पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त हार्दिक अभिनंदन. २६ जाने २०१० ते ११ ऑगस्ट २०१० दरम्यान न्युक्लिअर डिसेप्शन (फसवणुक) या लेखमालिकेचे सर्व भाग मिपा सदस्य नसतानाही मी नियमीतपणे वाचले होते.
ज्यांनी ही लेखमालिका वाचली नसेल त्यांच्यासाठी सर्व भागांचे दुवे.
काळेसाहेबांना नम्र विनंती आहे की अनिवासी व पर्यावरणवादी मराठी वाचकांसाठी या पुस्तकाची इ-आवॄत्ती खरेदीसाठी उपलब्ध करून द्यावी. यासाठी बुकगंगा किंवा अॅमेझॉन सद्यस्थितीत चांगले पर्याय आहेत.
हिंदी आवृत्तीच्या कामासाठी शुभेच्छा.
21 May 2015 - 10:29 pm | मुक्त विहारि
आमचा दुवा स्वीकारावा...
17 May 2015 - 5:33 am | सुधीर काळे
हा पर्याय मी मा़झ्या प्रकाशकांना सुचविला होत पण का कुणास ठाऊक तो त्यांना रुचला नाहीं.
17 May 2015 - 5:40 am | श्रीरंग_जोशी
दुर्दैवी बाब आहे. परमेश्वर अशा सर्व प्रकाशकांना सद्बुद्धी देवो.
आपल्या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन आहेत का?
17 May 2015 - 6:20 am | सुधीर काळे
फक्त प्रथमावृत्तीचे!
17 May 2015 - 6:21 am | श्रीरंग_जोशी
प्रथम आवॄत्ती लौकरात लौकर संपो ही सदीच्छा.
17 May 2015 - 6:26 am | सुधीर काळे
But I am really keen to find a good Hindi website like Misalpav is in Marathi and then a Hindi e-newspaper who has space on its web edition like Sakal has in the form of e-Sakal & its various tabs. (I use 'Pailateer') ! I would be grateful if you could ask your Hindi-speaking friends & let me know.
17 May 2015 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
17 May 2015 - 12:28 pm | आदूबाळ
अभिनंदन!
17 May 2015 - 1:03 pm | वेताळ
प्रकाशनासाठी शुभेच्छा....
17 May 2015 - 7:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन !
17 May 2015 - 9:09 pm | अमोल खरे
काळेकाकांचा मी पुर्वीपासुनच पंखा आहे. हिंदीतील साईट्स मिळाल्या तर लगेच कळवेन.
17 May 2015 - 9:21 pm | सानिकास्वप्निल
अभिनंदन व शुभेच्छा!!
18 May 2015 - 8:17 am | सुधीर काळे
सर्व मिपा सभासदांना धन्यवाद. अमोल, मी तुझ्या हिंदी संस्थळांबाबतच्या माहितीची वाट पहात आहे.
18 May 2015 - 10:50 am | चिमी
अभिनंदन व शुभेच्छा!!
hindisamay.com हे एक चांगले संस्थळ आहे. ह्या संस्थळावर "संपर्क" ही लिंक आहे. तिथे दिलेल्या इ-मेल आय डी वर संपर्क करुन पहा.
18 May 2015 - 5:38 pm | मदनबाण
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
इथेही परत लेखन चालु राहु दे ही आग्रहाची विनंती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma
18 May 2015 - 11:08 pm | सुधीर काळे
चिमी-जि,
आपण सांगितल्यानुसार मी त्या संस्थळावर गेलो व लिहिले आहे. उत्तर आल्याबरोबर माझा अनुभव काय आहे हे कळवीनच.
धन्यवाद,
सुधीर काळे
19 May 2015 - 4:40 am | सुधीर काळे
चिमी-जी,
मी त्या पत्त्यावर मेल पाठविली पण ती Boxbe नावाच्या दानवापलीकडे जाऊ शकली नाहीं! त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न पडला आहे.
20 May 2015 - 11:57 am | चिमी
hindisamay.com हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा उपक्रम आहे. तिथे आत्ता फोन करुन विचारले. वेब साइट वर scroll down केल्यास उजव्या बाजुस संपादक मंडळींचे contact details आहेत.
त्यांन्ना संपर्क करावयास सांगितला आहे....
19 May 2015 - 8:37 am | पैसा
अभिनंदन आणि शुभेच्छा!
19 May 2015 - 1:55 pm | गणेशा
अभिनंदन... आणि शुभेच्छा !
19 May 2015 - 1:58 pm | llपुण्याचे पेशवेll
काळेकाका, बरेच दिवसानी मिपावर बघून आनंद झाला. :)
पुस्तक आणून वाचेनच.
20 May 2015 - 5:38 pm | यमगर्निकर
काळे सर आम्हाला घरि वाचन करायला वेळ नसतो, वाचना साठि ऑफिस मध्येच वेळ मिळतो आणि ऑफिसमध्ये पुस्तक आणुन वाचु शकत नाहि, त्यामुळे ह्याचि ई बुक आव्रुत्ति काढाच अशि आमचि विनंति आहे.
21 May 2015 - 12:22 am | श्रीरंग_जोशी
किमान साडेपाच वर्षांपासून तुम्ही या पुस्तकावर अन या विषयावर खूप काम करत आहात. माझ्याप्रमाणे बहुतांश वाचकांच्या मनात सुधीर काळे म्हंटलं की मराठीतल्या न्युक्लिअर डिसेप्शनचे लेखक हीच प्रतिमा उमटत असावी. तुम्ही पाकीस्तानातील घडामोडींचाही सतत अभ्यास करुन त्यावर वृत्तपत्रांमध्येही स्तंभलेखन करता.
आता या पुस्तकाच्या हिंदी अनुवादावर तुम्ही स्वतःच काम करण्यापेक्षा दुसर्या पुस्तकावर किंवा विषयावर काम करावेसे नाही वाटत का?
21 May 2015 - 2:23 am | सुधीर काळे
हेन्री किसिंजर लि़खित "On China" या पुस्तकावर असेच काम करायचे आहे. त्यासाठी कॉपीराईटवाल्यांकडे धडपड चालू आहे. पण दोनदा लिहूनही अद्याप त्यांच्याकडून होयही नाहीं अन नाहींहीं नाहीं. हे पुस्तक पेन्ग्विन कंपनीचे प्रकाशन आहे. पण दाद ना फिर्याद! कुणी मदत करेल तर मजा येईल.
21 May 2015 - 2:28 am | श्रीरंग_जोशी
हे जाणुन आनंद झाला. चीनबाबत मराठी आंतरजालावर अन मराठी वृत्तपत्रांतही फारसं खोलात जाऊन कुणी लिहित नाही.
प्रकाशकांकडून परवानगी मिळण्यासाठी शुभेच्छा.
21 May 2015 - 3:25 am | सुधीर काळे
या अनुमतीसाठी बरोबर व्यक्ती किंवा अधिकारी कोण हे शोधण्यातच बराच कालापव्यय होतो! कुणाची ओऴख असल्यास उपयोग होईल.
21 May 2015 - 10:37 pm | श्रीरंग_जोशी
मिपावरील काही सदस्य ज्यांची पुस्तकं गेल्या काही काळात प्रकाशित झाली आहे ते कदाचित काही मदत करू शकतील.
21 May 2015 - 11:24 pm | सुधीर काळे
मी इंग्रजी भाषेतील पुस्तके अनुवादित करतो म्हणून वेळ लागतो. एरवी लागला नसता!
21 May 2015 - 3:21 am | सुधीर काळे
चिमी-जी,
मला तिथे फक्त एवढीच माहिती मिळाली: हमारा पता है : संपादक, हिंदीसमयडॉटकॉम , महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, गांधी हिल्स, वर्धा - 442005 (महाराष्ट्र)
ईमेल : hindeesamay@gmail.com
कुठेही फोन नं मिळाला नाहीं.
21 May 2015 - 5:30 am | सुधीर काळे
चिमी-जी, मला हवी होती ती माहिती मिळाली. मी दुसर्या पानावर पहात होतो. एक पान मागे गेल्यावर ते फोन नं. मिळाले! धन्यवाद.
21 May 2015 - 10:29 pm | मुक्त विहारि
अभिनंदन
28 May 2015 - 5:28 am | सुधीर काळे
चिमी-जी,
दोघांना दोन दोन वेळा लिहून आणि एकीला (हेमा गोडबोले) एकदा लिहूनही कांहींही उत्तर लाभले नाहीं. आणखी एकदा लिहून कुठल्यातरी नव्या संकेतस्थळामागे जावे लागणार असे दिसते!