कमरेला लटकावत तलवार
ऐटीत फिरे छोटू सरदार ..
समोर दिसता माशा झुरळे
म्यानातून निघे तलवार ..
सपासप होती हवेत वार
माशा झुरळे मरती चार ..
हा हा हसे छोटू सरदार
कौतुक करी सारे घरदार ..
"भो भो" आवाज येता कानी
गडबडतसे छोटू सरदार ..
फेकुन देत हातची तलवार
आईच्या पदराआड पसार ..
.
प्रतिक्रिया
15 May 2015 - 8:34 am | विवेकपटाईत
मस्त आवडली
15 May 2015 - 10:15 am | विदेश
विवेकपटाईत ..
प्रतिसादासाठी आभार !
15 May 2015 - 3:54 pm | गणेशा
मस्त आहे बालकविता.. आवडली
15 May 2015 - 8:50 pm | जेपी
चांगलय..
15 May 2015 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
छान
16 May 2015 - 1:33 pm | विदेश
गणेशा, जेपी, अत्रुप्त ..
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार !
17 May 2015 - 9:42 pm | पाषाणभेद
विदेशसाहेब एकदम झकास आहे बघा कविता.
अवांतर: आजकाल आम्हाला अजिबात वेळ नसल्याने कविता वाचणे अन लिहीणे या छंदाकडे दुर्लक्ष होते. त्याबाबत वैषम्य जाणवते. असो. याबाबत येथे थोडे मनमोकळे केले. क्षमस्व.
20 May 2015 - 12:28 pm | विदेश
पाषाणभेद -
एकेकाळी आपण मला इथेच बालकवी म्हणून संबोधले ..
धन्यवाद !