कोल्हापुरि मिसळ

झकासराव's picture
झकासराव in जनातलं, मनातलं
14 Nov 2007 - 11:57 pm

कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत.
नवीन घेतलेल्या कॅमेर्‍यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय.
आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो.
मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय.
मग दुसर्‍याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :)
मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ.
तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती.
अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो.
एक छोटी टपरी असावी आधी. मग नंतर वाढवलेला बिजनेस आहे हे दिसत होतच. त्याना विचारल की किती वर्ष झाले ह्या मिसळ ला. तर उत्तर आल की १७ वर्षे झाली. :)
मग त्याना विचारुन घेतल आणि फोटो काढले थोडे. तेच तुमच्या सेवेसी हजर करतो.
मिसळ पाव खावुन मन तृप्त करुन घेतलच. आता बघुन तुम्ही थोडस समाधान मानुन घ्या. :)

http://picasaweb.google.co.uk/zakasrao/FadatareMisal

इथे फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण नानाची टांग अडत आहे कुठेतरी. जमल नाय परत एकदा. :(

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

15 Nov 2007 - 12:02 am | प्राजु

हे बरं नाही..
एकतर आधी कोल्हापूरला जाऊन आलात.. आणि त्यात ती फडतरे ची मिसळही खाल्लीत...
मला तुम्ही चिडवताय असं वाटतंय..:)) (ह्.घ्या)

फडतरेची मिसळ......... .. देवा!! या झाकासरावाला क्षमा कर...
त्याला समजत नाहीये तो या कोल्हापूरी मिरचीला चिडवतो आहे....

प्राजु (कोल्हापूरची मिरची)

झकासराव's picture

15 Nov 2007 - 8:50 am | झकासराव

मी चिडवत नाही बरं. तुमच्या मनातल मिसळ प्रेम वाढवतोय :)

कोलबेर's picture

15 Nov 2007 - 12:05 am | कोलबेर

फडतरे वगैरे ही नंतर आलेली फ्याडं आहेत. त्याआधी अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळीचा कट चाखलात की नाहीत?

झकासराव's picture

15 Nov 2007 - 8:51 am | झकासराव

सांगा पुढच्या वेळी तिकडे जाइन :)
मला तर माझे बाबा बोलले की दत्त कॅफे ची मिसळ छान होती अस.
तुम्हाला त्याची काय माहिती आहे का?

सर्किट's picture

15 Nov 2007 - 12:06 am | सर्किट (not verified)

???

- सर्किट

झकासराव's picture

15 Nov 2007 - 9:06 am | झकासराव

दिसत नाहित??????/
छे हे एस्निप्स च आणि माझ गणित जमत नाहि वाटत :(
मला कोणी दुसरी साइट सांगेल का फोटो वेगवेगळे फोल्डर करुन अपलोड करुन मी अस पब्लिक मध्ये लिंक दिली तरी दिसेल अशी???
आणि इकडे फोटो कसे टाकायचे हे अजुन नाही कळाल मला. मागे एक दोघानी सांगितले होते पण जमलेच नाय. जरा डिटेल मध्ये सांगणार का कोणी???

आपलाच ,
नेट मध्ये कच्चा लिंबु असणारा
झकासराव

राजे's picture

15 Nov 2007 - 9:14 am | राजे (not verified)

माझे शब्द वर छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा आहे , विदेशी मदतीची गरजच काय जर घरीच सेवा उपलब्ध आहे ? ;}

दुवा : माझे शब्द....

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 12:07 am | विसोबा खेचर

मिसळीचा विजय असो,
फडतरेचा विजय असो,
झकासरावाचा विजय असो..!

कुणी 'अमूक अमूक ठिकानाहून उत्तम मिसळ खाऊन आलो' असं म्हटलं की संबंधित इसम जणू काही हरिद्वारच्या गंगेतच डुबकी मारून पावन होऊन आला आहे असं आम्हाला वाटत! :)

आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.

झकासराव's picture

15 Nov 2007 - 8:53 am | झकासराव

तात्यानु हरिद्वारच्या गंगेत की मिसळीच्या कटात. :)
पण मिसळ खायला मजा येते राव.

प्राजु's picture

15 Nov 2007 - 12:07 am | प्राजु

आता... खासबाग ही आलं का???
तुम्ही सगळे मलाच चिडवता आहात का?...:))))

माझी मिसळ... कधी मिळेल आता...???:(((

- प्राजु.

कोलबेर's picture

15 Nov 2007 - 12:10 am | कोलबेर

मिसळ = खासबाग!!
तात्यांनी लावलेल्या चित्रातले ते पाव बघुन मिसळीपेक्षा पावभाजीचीच आठवण येते! कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-)

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 12:33 am | विसोबा खेचर

कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-)

अगदी जरूर...

तात्या.

जुना अभिजित's picture

15 Nov 2007 - 9:48 am | जुना अभिजित

मिसल
ही बघा सिंहगड पायथ्याच्या हाटीलातली मिसल.

अभिजित

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 10:09 am | विसोबा खेचर

लगेच लावली आहे डाव्या कोपर्‍यावर! :)

छानच दिसत आहे. चवील झकास असणार!

तात्या.

जुना अभिजित's picture

15 Nov 2007 - 10:23 am | जुना अभिजित

एकदम रापचिक लागली होती.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु's picture

15 Nov 2007 - 12:31 am | प्राजु

आमच्या कोल्हापूरला....
असे लादीपाव नसतात हो मिसळी बरोबर.... ते असतात.. जाड कापलेले... ताजे बेकरीतले पाव...
तात्यांच्या मिसळीसोबत ते पाव पाहून ती पावभाजी असावी अशीच शंका येते हे खरे...

- प्राजु.

ध्रुव's picture

15 Nov 2007 - 11:01 am | ध्रुव

नुसता ताजा पाव नाही, तर सोबतीला हेल काढलेले बोलणे पण असते. कोल्हापूरातल्या लोकांना हेलकरी पण म्हणता येइल ;-)
--
(हेलकरी)ध्रुव

ध्रुव's picture

15 Nov 2007 - 10:59 am | ध्रुव

कोल्हापूर म्हणलं की मिसळीची आठवण नाही आली तर गुन्हा समजतात :)
मिसळीचे नाव काढल्यावर आज आता मिसळ खावी लागणार असे दिसते :)
--
(खासबाग व फडतरे दोन्ही मिसळ आवडणारा)ध्रुव

रम्या's picture

15 Nov 2007 - 12:08 pm | रम्या

अहो फोटो दिसत नाहीत!
झकासराव आधीच फक्त फोटोवर समाधान मानावं लागत होतं!. तेही नाही मिळाल्यावर लय वाईट वाटलं.
तुम्ही खल्लेल्या मिसळीच्या फक्त कल्पना करतोय.

(उदास) रम्या

झकासराव's picture

15 Nov 2007 - 6:13 pm | झकासराव

फोटो परत पिकासावर अपलोड केले आहेत.
रम्या दिसतील तुम्हाला :)

स्वाती राजेश's picture

15 Nov 2007 - 6:11 pm | स्वाती राजेश

मिसळ कोणतीही असो,
खासबाग,उद्यमनगर - फडतरे,बावड्याची किंवा चोरगेची महत्वाचे ती कोल्हापुरी मिसळ.
दिवाळीचे गोड खाऊन कंटाळा आला कि,आम्ही मिसळीची पार्टी करत असू.
पुर्वीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्द्ल आभारी.

आणि हो

खाताना आमची आठवण काढा. मग खा (हवी तेवढी).............