प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे
मुळ कविता : तू ये...
अरे द्यायचेच असेल तर दे
आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती
शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर बंदिशी मिलनाचे...
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
हळव्या कोपर्याचे .. असेच हे हळवेच गाणे
अर्थ न पुसता फक्त याचे ओझेच वाहने
वाह्यचेच असेन फुल तरी
समर्पणाचे भाव वाह तु
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
न ला एक काना , ह ला दुसरी वेलांटी
हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही
तु दास भावनांचा .. ओंजळीत भीक वाही
द्यायचेच असेल तर दे
ललाटी चांदण्यांचे गोंदन
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
--- शब्दमेघ ( २९/०४/२०१५)
प्रतिक्रिया
29 Apr 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा
आयला...भारी
आवडेश :)
29 Apr 2015 - 5:44 pm | प्रचेतस
जबरीच रे गणेशा.
यू रॉक माय वर्ल्ड.
झक्कास कविता एकदम.
लिहित रहा, वाचत आहे.
29 Apr 2015 - 5:45 pm | पगला गजोधर
मल्हारबारी मोतियाने द्यावी भरून… न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून … ची आठवण झाली.
इथे देवाकडे शाहीर लटक्या रागाने मागणे मागतो की, द्यायचेच असेल तर बारी मोत्याने ओतप्रोत भरून दे , अथवा (तुला (देवाला) हे कधी जमणारच नसेल) तर मी (शाहीर) काही दर्शनाला येणार नाही.
29 Apr 2015 - 10:45 pm | सतिश गावडे
छान लिहिली कविता गणेशा.
एका खरडवहीतील (की प्रतिसादातील ते आठवत नाही) "तू ये, तुला फुकट देईन" ही ओळ उचलून, निव्वळ टैम्पास करण्याच्या उद्देशाने जमवलेली यमके इतक्या सुंदर कवितेची प्रेरणा ठरतील असे वाटल नव्हते.
30 Apr 2015 - 9:05 am | गणेशा
सर्वांचे आभार !
धन्या, वल्ली नंतर आता मी ही तुझ्या कवितेंचा चाहता झालो आहे... काल तुझ्या जुन्या कविता वाचल्या मस्त आहेत, रिप्लाय केले नाही, नाहि तर तुझ्या कविता सगळ्या वर आल्या असत्या :)
30 Apr 2015 - 12:08 am | किसन शिंदे
धन्यासारखेच म्हणतो. कविता खरेच खूप सुंदर आहे.
30 Apr 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी
सुंदर आहे ही कविता. गणेशास कविता करण्यास प्रवृत्त करणार्या सर्वांचे आभार.
30 Apr 2015 - 9:46 am | पैसा
अशाच तुला प्रेरणा देण्याची प्रेरणा धन्याला मिळो!
3 May 2015 - 11:05 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त मस्त मस्त.
वाचताक्षणीच आवडली.
तुम्ही लिहीत रहा गणेशराव, थांबू नका.
पैजारबुवा,
4 May 2015 - 10:48 am | गणेशा
कविता तशी साधीच आहे, आणि मुळ कल्पना तर धन्याची आहे.
तरीही आपली प्रतिक्रिया कव्बितेला आली की अतिशय छान वाटते.. कारण माहीत नाही कदाचीत खुप जुने कविता वाचक आहात म्हनुन वाटत असेन
मनापासुन धन्यवाद..
सर्वांचे आभार
11 Sep 2015 - 7:06 pm | निनाव
खूप मिस केले हे सर्व इतके दिवस. आज वेळ मिळला , जुने पुस्तक पुन्हा वाचायला :)
11 Sep 2015 - 9:04 pm | पद्मावति
मस्तं!
सुरेख कवीता. फारच आवडली.
12 Sep 2015 - 10:27 am | ज्योति अळवणी
आवडली