म्युन्स्टर (जर्मनी)दि. १८.०८.०८ (प्रतिनिधी) : जर्मनीतील मिपाकरांची बैठक शनिवार दि. १६ .०८.०८ रोजी श्री. लिखाळ यांच्या म्युन्स्टर ,जर्मनी येथील सदनिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत मिसळपाव भ्रमणमंडळ,जर्मनी शाखेची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ह्या आनंदाच्या क्षणी विडंबनाचार्य केशवसुमार, स्वाती ,दिनेश ,सौ व श्री लिखाळ उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.विपिन चिंचाळकर हे मिपाचे पाहुणेही ह्या ऐतिहासिक प्रसंगास साक्षी होते. सौ. लिखाळ ह्यांनी केलेल्या सुग्रास आणि स्वादिष्ट भोजनाने हा विशेष निर्णय साजरा केला गेला.
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले.
सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत लवकरच देण्यात येईल.
प्रतिक्रिया
19 Aug 2008 - 3:00 am | मुक्तसुनीत
विडंबनाचार्य केशवसुमार म्हणजे भ्रमणमंडळातील कोचरेकर मास्तर काय ?? =)) =))
ईस्त केसु डर ग्लैचेन कोचरेकर मास्तर केर्ल ? ;-)
19 Aug 2008 - 3:03 am | प्रियाली
मिसळपाव भ्रमणमंडळ नेमकं काय काय करणार आहे? (खादाडी सोडून ;) - स्वाती असल्याने हा अजेंड्यातील महत्त्वाचा प्वाईंट असावा असा कयास आहे.)
हम्म! येऊ दे.
अवांतरः निवृत्त विडंबनाचार्य केशवसुमार असे हवे होते काय?
19 Aug 2008 - 12:56 pm | केशवसुमार
अवांतरः निवृत्त विडंबनाचार्य केशवसुमार असे हवे होते काय?
भयाली धारप #:S यांच्याशी सहमत.. :P
(सहमत निवृत्त)केशवसुमार
स्वतःशी वेड्यासारखी बडबड : केश्या ह्यला म्हणतात खुट्टा हलवून बळकट करणे.. :B उगाच हा बाबा परत आलातर काय.. :W
19 Aug 2008 - 8:05 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां: हुश्श्..रंग्या, किती बरं वाटलं म्हणून सांगू? #:S म्हणलं हा बाबा परत आल्यामुळे नरसोबाच्या वाडीला बोललेला नवस वाया जातोय की काय? :T :O )
चतुरंग
19 Aug 2008 - 3:50 am | रेवती
स्वातीताई,
सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे.
रेवती
19 Aug 2008 - 7:02 am | सखाराम_गटणे™
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले.
सुरवातीपासुन लिहा, कुठे कुठे जायचे ठरले.
सुरवातीला ऐकदम, चीन ओलंपिक पहायला. मग व्हीसा काय मिळेल असे वाटे ना. मग पैरीसला जायचा विचार आला....................
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
19 Aug 2008 - 8:03 am | प्राजु
हे भ्रमणमंडळ कुठे कुठे भ्रमण करणार आहे?? स्वातीताई, लवकर लिही गं वृतांत, फोटोही टाक.
सविस्तर वृतांतासाठी वाट पहात आहे. भ्रमणमंडळाचे भ्रमण झाले की लगेच वृत्तांत येऊद्या... नाहीतर वृत्तांताची वाट पहाता पहाता आमची अवस्था भ्रमिष्टासारखी व्हायची :)
ह.घ्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Aug 2008 - 8:19 am | विसोबा खेचर
मिसळधर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा!
हे संत तात्याबांचे स्वप्न आता पुरे होताना दिसते आहे! :)
स्वाती, भ्रमणमंडळाच्या स्थापनेबद्दल आपणा सर्व भ्रमणमंडळकारांचे हारिदिक अभिनंदन... !
सौ. लिखाळ ह्यांनी केलेल्या सुग्रास आणि स्वादिष्ट भोजनाने हा विशेष निर्णय साजरा केला गेला.
हो, पण काय मेनू केला होता ते तर सांग की स्वाती! आम्ही किमान वाचून तरी समाधान मानू! :)
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले.
सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत लवकरच देण्यात येईल.
वाट पाहतो आहे... लवकर येऊ द्या... :)
तात्या.
19 Aug 2008 - 10:04 am | चतुरंग
छान छान!
भ्रमणमंडळाच्या स्थापनेच्या कट्ट्याचा सचित्र वृत्तांत जोडीला असता तर बहार आली असती, अजूनही यायला हवा!
आपल्या भ्रमणमंडळाच्या सहलींचा वृत्तांतही येत राहूदेत.
(खुद के साथ बातां : सगळीकडे फिरणार ना हे? मग हे भ्रमणमंडळ नाहीये रंगा, 'भ्रमरमंडळ' आहे! जर्मन भाषेत भुंग्याला काय म्हणतात कोण जाणे? :? :W )
चतुरंग
19 Aug 2008 - 10:17 am | ऋषिकेश
लै भारी!!!!
डॉईशकर कुठे कुठे भटकले/ भटकणार आहेत आणि मुख्य म्हणजे काय काय खादाडी केली याचा सविस्तर वृतांत येऊ दे :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Aug 2008 - 2:34 pm | लिखाळ
ताबडतोब लेख लिहिलास सुद्धा ! मस्त ! सकाळी सकाळी वाचून आनंद झाला.
--लिखाळ.
19 Aug 2008 - 2:45 pm | मनस्वी
भ्रमणमंडळाचे भ्रभ्ररून अभिनंदन!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
19 Aug 2008 - 9:25 pm | विश्वजीत
भ्रमणगाथा लवकर येऊ द्या.
19 Aug 2008 - 11:13 pm | विकास
छान कल्पना! भ्रमणमंडळाच्या स्थापनेबद्दल आपणा सर्व भ्रमणमंडळकारांचे हार्दीक अभिनंदन!
छायाचित्रे पहायला आवडतील... वर प्रियालीने म्हणल्याप्रमाणे खाण्यासाठी "पाकक्रीया" शोधण्याची गरज भासणार नाही :-)
बाकी भ्रमणमंडळ (जपान सोडून)कुठे कुठे भ्रमणार :D ;) (स्वाती: ह.घे. हो!)
19 Aug 2008 - 11:29 pm | दिनेश
विकास,
फक्त स्वातीच नाही..पण सौ. लिखाळ पण काही कमी समजू नकोस्...दोघी जणी तोडीस तोड आहेत....एक झाकावी आणी दुसरी काढावी.
दिनेश
स्वगत : मिपावर बहुतेक इतक्या वैराग्यांनंतर 'खादाडी वैराग्य' येणार की काय ?
20 Aug 2008 - 12:51 am | विकास
स्वगत : मिपावर बहुतेक इतक्या वैराग्यांनंतर 'खादाडी वैराग्य' येणार की काय ?
सध्या सर्वांनी वैराग्याचा धसकाच घेतलेला दिसतोय... :-)