जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट. हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या. अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला आणि तो धाडकन सेंटर टेबल वर आपटला. कपाळावर चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले. मंडळी हौशी होती, तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार केला नव्हता. जर तो विचार केला असता, तर नाटक अर्ध्यावर संपले नसते.
सिनेमात आपण पहिले आहे, दुष्ट खलनायक, नायकांच्या आप्तांना अधिकांश वेळी नायिकेला फासावर लटकवतो, नायिका तडफडू लागते. नायक येतो, खलनायकाला यमसदनी पाठवितो, आणि फासावर लटकलेल्या नायिकेला सोडवितो. सिनेमात कित्येक मिनिटे फासावर लटकलेली नायिका जिवंत राहते.
आपले राजनैतिक हित साधण्यासाठी, दिल्लीच्या नौटंकी बाज पार्टीला शेतकर्यांचा पुळका आला. नौटंकी सुरु झाली. राजनीतिक महत्वाकांशा असलेल्या एक व्यक्ती झाडू घेऊन झाडावर चढला त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता. त्या आधी त्यांनी घरच्यांना ही फोन केला होता. बहुतेक नौटंकी सुरु झाली हेच सांगितले असेल. आपल्याला काही होणार नाही याची त्याला खात्री होती. जोरदार नारे बाजी करत त्याने गळफास लावला, कार्यकर्ता टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते. सावधानी म्हणून त्याने, दोन्ही हातानी झाडाच्या फांदीला पकडून ठेवले, होते. ब्रेकिंग न्यूज मिडीयाने या दृश्याचे चित्रीकरण सुरु केले. मंचावर बसलेल्या नौटंकीचे सूत्रधार ही यावर बारीक लक्ष ठेवून होते. आता हा मनुष्य फासावर लटकेल. आपण शेतकरी (?) फासावर लटकला याचा दोष सत्ताधारी पार्टीवर लाऊ, आपल्या कार्यकर्तानां त्याला वाचविण्याची विनंती करू. नंतर त्या माणसाला जिवंत शहीदचा दर्जा देऊ. राजस्थान मध्ये त्याच्या मार्फत आपल्या पार्टीला पुढे वाढवू. बहुतेक त्याला ही तिकिटाचे आश्वासन दिले असेल.
नौटंकीची तैयारी व्यवस्थित होती. सर्व मना प्रमाणे घडत होत. पण एक तकनिकी चूक राहून गेली, हे कुणाच्याच लक्ष्यात आले नाही. गळफास या विषयावर तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतला नव्हता. जर घेतला असता तर नाटकाचा योग्य परिणाम साधला असता. या घोड्चुकी मुळे एका अति आत्मविश्वासी आणि महत्वाकांशी व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.
आता या फसलेल्या नौटंकीच्या सूत्रधारांच्या विरुद्ध काही कार्रवाई होईल का? हाच यक्ष प्रश्न आहे.
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 9:10 am | पैसा
सुनंदा पुष्करच्या खुन्यांवर कारवाई होईल असं आम्हाला उगीच वाटलं होतं. पण काही लोकांना केरळमधे उपयोगी पडू शकतील या हिशेबाने फाईली पुन्हा आत गेल्या असाव्यात.
26 Apr 2015 - 9:34 am | नूतन सावंत
पैसाताईशी सहमत.
26 Apr 2015 - 9:43 am | नूतन सावंत
करायला गेलो एक आणि झाले भलतेच.तशातली गत.
26 Apr 2015 - 12:43 pm | एक एकटा एकटाच
मेलेल्या मढ्याच्या टाळुवरचे लोणीही चाटून पुसून खातील ते लोक.
26 Apr 2015 - 4:42 pm | पॉइंट ब्लँक
औकादीपेक्षा जास्ती शानपना केला कि असं होतं
26 Apr 2015 - 5:06 pm | संदीप डांगे
मस्त लेख. अगदी संयत.
26 Apr 2015 - 6:30 pm | पैसा
आपण नाटकात काम करतो आहोत अशी त्याची समजूत करून दिली गेली असेल, मात्र प्रत्यक्षात काय होणार आहे याची दिग्दर्शकाला कल्पना असावी.
28 Apr 2015 - 8:08 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. हा एक अपघात होता असे दिल्ली पोलिसांचा निष्कर्ष आहे.
29 Apr 2015 - 10:18 am | स्पंदना
अपघात म्हणजे "नाटक" फसल अस म्हणन आहे का देल्ही पुलिसांच?
पण मग त्या नाटकाचा सुत्रधार्कोण हे ही माहित असेल. नाही का?
29 Apr 2015 - 10:12 am | तुषार काळभोर
हे सगळं राजकारण, चिखल, घाण क्षणभर बाजूला ठेवू/नजरेआड करू.
अॅज ए दिल्लीकर नागरिक, तुम्हाला रोजच्या आयुष्यात काही फरक जाणवतो का? प्रशासनात काही फरक आहे का?
(सध्याच्या घटनांनंतर, समजा, आता जर निवडणुका झाल्या तर, तुम्ही आपला मतदान करताल का? जर अशा घटना घडल्या नसत्या, तर आतापर्यंतच्या परफॉर्मन्सवरून तुम्ही आपला मतदान केले असते का?)
(मी कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश/बायस/तिरका अर्थ न ठेवता अत्यंत सरळ मनाने विचारतोय.)